Goa Postal Circulation Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Special Cancellation: "गोयेंच्या सायबाला" आदरांजली!! से कॅथेड्रलचे वैशिष्ट्य चित्रित करणारे रद्दीकरण चिन्ह

Saint Francis Xavier Goa Postal Circulation: गोवा आणि महाराष्ट्राने एक विशेष रद्दीकरण सादर करून अवशेष प्रदर्शनाचा समारोप साजरा केला

Akshata Chhatre

पणजी: गोयेंचो सायब किंवा संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचा प्रदर्शन सोहळा ४५ दिवसानंतर रविवारी( ५ जानेवारी ) रोजी संपन्न झाला. यानिमित्ताने गोव्यात देश-विदेशातील भाविकांनी हजेरी लावली होती. दर दहावर्षांनंतर होणाऱ्या या अवशेष प्रदर्शनाच्या निमिताने गोवा आणि महाराष्ट्राने एक विशेष रद्दीकरण सादर करून या अवशेष प्रदर्शनाचा समारोप साजरा केला. गोवा वेल्हा पोस्ट ऑफिस आणि पणजी येथील मुख्य पोस्ट ऑफिस अशा दोन ठिकाणी हे या विशेष रद्दीकरणाचे उद्घाटन झाले.

गोव्यात या समारंभाचे उद्घाटन पणजी मुख्यालयाचे वरिष्ठ पोस्टमास्तर प्रेमानंद नानोडकर यांच्या हस्ते झालं, शिवाय या कार्यक्रमात वेल्हा गोवा पोस्ट ऑफिसच्या सबपोस्टमास्टर प्रविता कारापूरकर या देखील या सहभागी झाल्या होत्या.

दर दहा वर्षांनी होणाऱ्या या अवशेष प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अवचित्य साधून जुन्या गोव्यातील से कॅथेड्रल चर्चच्या वैभवाचे प्रदर्शन करणारे चित्रीकरण या रद्दीकरणात सादर करण्यात आले आहे. हे अनोखे रद्दीकरण सेंट फ्रान्सिस झेवियर आणि जुन्या गोव्याच्या समृद्ध वारशाला एकार्थाने वाहिलेली आदरांजलीच ठरले. हा विशेष उपक्रम साजरा करण्यासाठी फिलाटलिस्ट, पोस्टल कर्मचारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

SCROLL FOR NEXT