Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई प्रकरणाची तब्बल 3 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी; मुख्यमंत्री म्हणाले प्रवाह प्राधिकरण...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : न्यायालयात भक्कम बाजू मांडणार

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute म्हादई प्रवाह (प्रोग्रेसिव्ह रिव्हर अथॉरिटी फॉर वेल्फेअर अँड हार्मनी) प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याने याबाबतचे सर्व अधिकार या प्राधिकरणाला मिळावेत.

केंद्र सरकार कर्नाटकला म्हादई वळविण्याच्या प्रकल्पाला पुढे जाण्याची परवानगी देऊ शकत नाही, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केला.

म्हादई प्रकरणाची आज सोमवारी तब्बल 3 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. गोव्याचे महाधिवक्ता गोवा सरकारने नियुक्त केलेले इतर वकील आधीच दिल्लीत पोहचले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आमची बाजू जोरदारपणे मांडू. आमचा सर्वोच्च न्यायालयावर तसेच केंद्र सरकारने स्थापन केलेल्या म्हादई प्रवाह प्राधिकरणावर पूर्ण विश्वास आहे.

कर्नाटक कोणतेही दावे करेल व यासंबंधीच्या निविदा जाहीर करेल याचा पाणी वळवल्यावर कसलाच परिणाम होणार नाही. केंद्राने या वर्षी मे महिन्यात म्हादई - प्रवाह प्राधिकरणाला सूचित केले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जल आयोगाने कळसा भंडारा भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर आराखड्याला (डीपीआर) मंजुरी दिल्यानंतर राज्यात असंतोष उसळला होता.

त्यानंतर लगेचच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी करत म्हादई प्राधिकरणाची मागणी केली होती. याला धरून केंद्र सरकारने प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. आता या प्राधिकरणाकडे यासंबंधीचे सर्व अधिकार द्यावेत, अशी गोवा सरकारची मागणी आहे.

मूळ विषयावर सुनावणी

आज सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलविवाद लवादाने पाणी वाटपासंबंधी दिलेल्या निकालावर सुनावणी होत आहे. जल न्यायाधिकरणाचा आदेश आणि म्हादई नदी कळसा-भांडुरा प्रकल्पातून वळवण्याशी संबंधित ही प्रकरणे आहेत.

गोवा सरकारने कर्नाटक विरुद्ध आणि महाराष्ट्र सरकारने गोव्याविरुद्ध दाखल केलेल्या अर्जावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election Result 2025 Live Update: फेर मतमोजणीतून देखील भाजपच्या पदरी निराशा; दवर्लीत काँग्रेस उमेदवारच विजयी

Christmas In Goa: गोव्यात पूर्वी 'ख्रिसमस'चे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी गाव एकत्र येत असे, कडाक्याच्या थंडीतील परिचित उब

Oldest Christmas Tree: 1441 मध्ये उभारलेला युरोपातील पहिला 'ख्रिसमस ट्री', एस्टोनियाची राजधानी, टॅलिनमधील खास नाताळ

सुरांचा ताल की संकटांचा काळ? गोव्यात नाताळच्या हंगामात संगीतकारांची मोठी ओढाताण

Goa Opinion: लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी, नाईटक्लबमधील 25 मृत्यू; यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची निश्चिती ही काळाची गरज

SCROLL FOR NEXT