Dasharath Mahale Daiinik Gomantak
गोवा

Goa: मगोचे दशरथ महालेंचा भाजपात प्रवेश

माजी सरपंच तथा बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांचे मागच्या तीन निवडणुकीत त्यांच्या सोबत असलेले दशरथ महाले यांनी १५ रोजी भाजपात प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत तोरसे मतदार संघातून (Torres Constituency) मगो तर्फे दशरथ महाले (Dasharath Mahale) यांची सून निवडणुकीला उभी राहिली होती , त्या काळात दशरथ महाले यांनी मगो पक्षासाठी काम केले होते. मात्र मगो पक्षाला पराभूत करून भाजपचे उमेदवार सीमा खडपे विजयी ठरल्या होत्या , भाजपची कार्यपद्धतीवर आकर्षित होवून उगवे चे माजी सरपंच तथा बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांचे मागच्या तीन निवडणुकीत त्यांच्या सोबत असलेले दशरथ महाले यांनी १५ रोजी भाजपात प्रवेश केला.

पेडणे शाशकीय विश्राम धाम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , सरचिटणीस तथा पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर ,हसापुर सरपंच संतोष मळीक , पंच उदय पालयेकर , आबा तळकटकर ,माजी सरपंच सुर्यकांत तोरस्कर , उदय प्रभूदेसाई आदी उपस्थित होते . दशरथ महाले यांचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी गळ्यात पुष्पहार घालून स्वागत आणि पक्षात प्रवेश दिला.

कायमस्वरूपी भाजपात

दशरथ महाले याना पत्रकारांनी छेडले मागच्या निवडणुकीत तुम्ही आजगावकर यांच्यावर टीका करत होता आता त्याचा जयजयकार कसा करणार असा सवाल उपस्थित केला असता , मागच्या निवडणुकीत काही मतभेद होते ते आता दूर झाले आहेत ,मतदार संघाचा विकास केवळ बाबू आजगावकर करणार आहे ,आणि त्यांची काम करण्याची धमक आम्हाला माहित आहे बाबू आजगावकर यांचेही भाजपातील शेवटचे पक्षांतर असल्याने आपणही शेवटपर्यंत भाजपात असणार असल्याचे सांगितले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT