Goa Made liquor Seized In Pune Dainik Gomantak
गोवा

Pune: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोवा बनावटीच्या मद्याची पुण्यात तस्करी, 1 कोटींचे मद्य जप्त

पोलिसांच्या लक्षात येऊ नये यासाठी दुसऱ्या रंगातील बॉक्स समोरच्या बाजुला ठेवण्यात आले होते.

Pramod Yadav

Goa Made liquor Seized In Pune: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात एक कोटी रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 01 जानेवारी 2024 रोजी खेडशिवापूर जवळ ही कारवाई करण्यात आली.

गोव्यातून महाराष्ट्रात मद्य तस्करीबाबत खात्रीलायक माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. विभाग अधिकाऱ्यांनी तात्काळ खेडशिवापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला, दरम्यान एका ट्रकचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी ट्रकची तपासणी केली.

यामध्ये तब्बल 1000 हजार मद्याचे बॉक्स आढळून आले, पोलिसांच्या लक्षात येऊ नये यासाठी दुसऱ्या रंगातील बॉक्स समोरच्या बाजुला ठेवण्यात आले होते.

पथकाने मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एक कोटी किमतीचे मद्य जप्त केले आहे. ट्रक चालकाची चौकशी केली असता त्याच्याजवळ वाहतूक परवाना आणि इतर कागदपत्र आढळून आले नाहीत.

पथकाने याप्रकरणी चालकासह आणखी एकाला अटक केलीय, या मद्य तस्करी प्रकरणी अधिक तसार सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT