Anmod Check Post Dainik Gomantak
गोवा

Anmod Check Post : दारु तस्करीसाठी लढवली शक्कल पण आली अंगलट, ट्रकच्या चेसीस मध्ये सापडला मद्यसाठा

अमनोड चेक पोस्टवर पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

Anmod Checkpost : गोवा राज्यातून अवैधरित्या परराज्यात दारु वाहतुकीवर बंदी आहे. परंतु बंदी असतानाही दारु वाहतूक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दारु वाहतूक करताना आरोपींकडून वेगवेगळ्या पध्दतींचा वापर केला जातो. अशातच गोवा राज्यातून कर्नाटकात अवैधरित्या दारुसाठा घेऊन जाणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयिताकडून गोवा बनावटीची 1 लाख 8 हजार रुपये किमतींची 54 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा येथून कर्नाटक राज्यात गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक आयचर ट्र्क करत होता. यावेळी सोमवारी पहाटे ट्रक अनमोड चेक पोस्ट जवळ आला असता अबकारी विभागाच्या पोलिसांनी तपासणीसाठी थांबविले.

यावेळी ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या खालील बाजूस चेसी मध्ये कंपार्टमेंट करुन गोवा बनावटीची दारु लपविल्याचे आढळून आले. गोवा बनावटीची 1 लाख 8 हजार रुपये किमतींची 54 लिटर दारु पोलिसांनी जप्त करीत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT