Goa Loksabha Result Voters in mandrem and pernem support Sripad Naik Ramakant Khalap disappointed Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election Result: मांद्रे, पेडणेत खलपांना अनपेक्षित धक्का; राजकीय जाणकारांचा अंदाजही ठरला चुकीचा!

Ramakant Khalap Disappointed: मांद्रे व पेडणे मतदारसंघात ॲड. रमाकांत खलप त्यांच्या संपर्काच्या आधारावर बाजी मारतील, असा राजकीय जाणकारांचा असलेला अंदाजही सायलेंट मतदारांनी चुकीचा ठरवला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result: पेडणे तालुक्यातील मांद्रे व पेडणे मतदारसंघातील मतदार सहाव्यांदा भाजपच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या श्रीपाद नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले. निवडणूक प्रचारावेळी त्यांच्यावर होणारे आरोप व टीका फोल ठरवून मांद्रे व पेडणे मतदारसंघात ॲड. रमाकांत खलप त्यांच्या संपर्काच्या आधारावर बाजी मारतील, असा राजकीय जाणकारांचा असलेला अंदाजही सायलेंट मतदारांनी चुकीचा ठरवला.

मोपा विमानतळ व आयुष इस्पितळ हे पेडणे तालुक्यातील मोठे प्रकल्प.या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात जमीन व बागायती गेली ,काही जणांच्या घरे पाडली, असे असताना स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार देण्यास मंत्री या नात्याने श्रीपाद नाईक यांना यश आले नाही.

पेडण्यात कॅसिनो येत असताना त्यावर ते बोलत नाहीत,म्हादई प्रश्नी ते गप्प राहिले, असे त्यांच्या विरोधात निवडणूक काळातील प्रचाराचे मुद्दे होते. यामुळे पेडणे मतदारसंघात खलप बाजी मारतील, असे वाटत होते.पण मतदारांनी हे अंदाज फोल ठरविले.

आमदार प्रवीण आर्लेकर यांची ही निवडणूक सत्वपरीक्षा होती. त्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन मतदारांची समजूत काढून आपले प्रचारकार्य सुरु ठेवले होते, त्याचा भाजप उमेदवाराला लाभ झाला. अनेक वर्षे मांद्रेचे आमदार असल्याने मांद्रेत खलपांचा चांगला संपर्क होता.

मांद्रे व पेडणे मतदारसंघातील अनेकांना रमाकांत खलपांमुळे विविध व्यवसायासाठी या बॅंकेचा चांगला लाभ झालेला आहे. त्यामुळे हा बॅंकेचा मुद्दा तसा मांद्रेत किंवा पेडणेतही चालणारा नव्हता. मांद्रेत आमदार जीत आरोलकर यांनी तसेच माजी आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे भाजप गट मंडळाला घेऊन नाईक यांच्यासाठी प्रचारकार्य केले. खलप यांना पेडणे तालुक्यातील मांद्रे व पेडणे मतदारसंघात मिळालेली मते अनपेक्षित अशी आहेत.

रमेश सावळ, माजी जि.पं. सदस्य

श्रीपाद नाईक यांच्या विजयाचे श्रेय पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी केलेल्या प्रचाराला तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक कार्याला जाते. त्यांनी केलेल्या विकासाची पावती म्हणून ते सहाव्यांदा विक्रमी मतांनी निवडून आले.

मिलिंद तळकर, केरी पंचायत

मांद्रे मतदारसंघात माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली मांद्रे भाजप मंडळातर्फे संघटनात्मक प्रचार कार्य सुरू केले. त्याचा आम्हाला या निवडणुकीत लाभ झाला आणि चांगल्या मताधिक्याने पक्षाचे ज्येष्ठ व अनुभवी, असे श्रीपाद नाईक हे निवडून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT