Goa Loksabha Result 2024
Goa Loksabha Result 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Result 2024: मतदान केंद्रावर थ्री टायर सुरक्षा, उत्सुकता शिगेला; सर्वांचे लक्ष निकालाकडे

Pramod Yadav

Goa Loksabha Result 2024

लोकसभा निवडणुकीत गोव्यातून कोण बाजी मारणार याचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक आहे. राज्यातील दोन जागांसाठी 76 टक्के मतदान झाले असून, दोन्ही पक्ष विजयाबाबत सकारात्मक आहेत.

मतमोजणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील मतदार केंद्रांवर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या परिसरात मोबाईल फोन आणि कॅमेरा वापरण्यास बंदी घालती आहे.

पणजीतील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, अल्तिनो येथे उत्तर गोव्यातील मतमोजणी होणार आहे. तर, दक्षिणेत दमोदर महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी केंद्रावर थ्री टायर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात बाहेरच्या लेयरमध्ये गोवा राज्य पोलिस, त्याच्या आत पोलिसांचे कडे असेल आणि केंद्रावर केंद्रीय सुरक्षा जवान तैनात असतील.

एक्झीट पोलच्या माध्यमातून समोर आलेल्या निकालात गोव्यात भाजप आणि काँग्रेसला एक - एका मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, ही जागा दक्षिण की उत्तर याचा सस्पेंस कायम असून, याबाबत सध्या गोमंतकीयांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दक्षिण गोव्याकडे लक्ष

दक्षिण गोव्यात यावेळी भाजपने महिला उमेदवार दिला असून, सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. दक्षिणेत उद्योजक पल्लवी धेंपे आणि विरियातो फर्नांडिस समोरासमोर आहेत. धेंपे देशातील एक सर्वांत श्रीमंत उमेदवार असल्याने गोवाच नव्हे तर देशभरातील लोकांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

तसेच, भाजपसह काँग्रेसने देखील या मतदारसंघात अधिक लक्ष घातल्याने या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

उत्तरेतील लढतही चुरशीची

उत्तरेत यावेळी काँग्रेसने माजी मंत्री रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात पाचवेळचे खासदार आणि मंत्री श्रीपाद नाईक उभे ठाकले आहेत. निवडणुकीत भाऊंच्या कार्यक्षमतेवर तर खलप यांच्या म्हापसा अर्बनच्या घोटाळ्यावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आले.

दोन्ही पक्षांनी या मुद्यांचे भांडवल करत मते मिळवण्याचा प्रयत्न केला, याचा कोणाला फायदा झाला याबाबत मंगळवारी चित्र स्पष्ट होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT