Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : लोकसभेच्या दृष्टीने काँग्रेसची स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी

मणिक्कम टागोर ः कामाचा घेतला आढावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. गोवा प्रभारी मणिक्कम टागोर यांनी शनिवारी पक्षीय कार्यालयात ठाण मांडून पक्षाच्या मतदारसंघनियाह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि पक्षाच्या कामाचा आढावा घेतला.

लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाने हालचाली सुरू केलेल्या आहेत. गट समित्यांचे प्रमुख आणि जिल्हाध्यक्षांची मते जाणून घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम पक्षीय पातळीवर सर्वत्र सुरू झालेले आहे.

भाजपविरोधात सर्वपक्षीय विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याच्या हालचालींना जोर आला आहे. त्यात काँग्रेसची महत्त्वाची भूमिका असली, तरी या पक्षाने एक पाऊल मागे घेत इतरांनाही बरोबर घेऊन जाण्यासाठी पाऊल टाकले आहे.

त्यामुळे इतर विरोधी पक्षांची लोकसभेपूर्वी आघाडी झालीच, तर गोव्यातही इतर पक्षांना काँग्रेसबरोबर जावे लागणार आहे. त्यात आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा समावेश असेल. त्यादृष्टीने सर्वांची मते जाणून घेण्याबरोबच पक्ष बांधणी कशा पद्धतीने सुरू आहे याचा सर्व आढावा टागोर यांनी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT