South Goa Lok Sabha Election Candidate Dainik Gomantak
गोवा

South Goa Election 2024: दक्षिण गोव्यात भाजपचाच विजय, सासष्टीवरील कॉंग्रेसचे वर्चस्व संपले- आलेक्स सिक्वेरा

South Goa Election 2024 News in Marathi: गत विधानसभा निवडणुकीत सासष्टीतील आठ पैकी केवळ तीन मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता- सिक्वेरा

Ganeshprasad Gogate

Goa Election 2024 News:

एकेकाळी सासष्टी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता तो राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत संपुर्ण दक्षिण गोव्यात भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येईल.

तसेच सासष्टीतही नुवे सह हा उमेदवार आघाडी घेईल असा विश्र्वास कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन पर्यावरण मंत्री झालेले आलेक्स सिक्वेरा यानी आज व्यक्त केला.

त्यानी सांगितले की गत विधानसभा निवडणुकीत सासष्टीतील आठ पैकी केवळ तीन मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता.

माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारतीत लोकांना भेटण्यासाठी आल्यावेळी त्यानी पत्रकारांशी बोलताना वरील विश्र्वास व्यक्त केला. त्यानी सांगितले की दक्षिण गोव्यातील भाजपचा उमेदवार लवकरच जाहीर होईल.

केवळ भाजपच्याच उमेदवाराबद्दल एवढी चिंता का इतर पक्षही आहेत. त्यांची चिंता करा. उमेदवार केव्हा जाहीर करावा हे पक्ष ठरवेल असे सिक्वेरा म्हणाले. वेळ बदललेला आहे.

लोकांना कोण चांगले काम करु शकतो याची जाणिव झाली आहे. पुर्वी कधीही विकास झाला नाही एवढा विकास गोव्यात स्वर्गीय मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यापासुन झालेला आहे व आता डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा चालू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गोव्याच्या विकासासाठी भरीव सहकार्य करीत आहे असेही त्यानी सांगितले. मी जवळ जवळ एक वर्ष मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या बरोबर वावरत आहे. त्यानी कधीही असे जाणवू दिले नाही की मी अल्पसंख्याक आहे.

मुख्यमंत्री कधीही धर्म किंवा जातीमध्ये भेदभाव करीत असलेले आपण अनुभवलेले नाही. पोर्तुगीज पासपोर्ट प्रश्र्न हा जास्तीत जास्त ख्रिस्ती बांधवाचा आहे. तरी सुद्धा हा प्रश्र्न सुटावा म्हणुन प्रयत्न करीत आहे.

या संदर्भात त्यानी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा मी पण उपस्थित होते व हा प्रश्र्न निश्र्चितच सुटेल असा विश्र्वास मंत्री सिक्वेरा यानी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

SCROLL FOR NEXT