ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी करा, अन्यथा 6 मार्चपासून साखळी उपोषण - एसटींचा इशारा

ST Reservation: केंद्र व राज्य सरकार एसटी समाजाला वारंवार आश्‍वासने देऊन गेल्या काही वर्षापासून झुलवत ठेवत आले आहे.

Ganeshprasad Gogate

ST Reservation: गोव्यातील अनुसूचित जमातीसाठीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाची अधिसूचना केंद्र सरकारने पुढील 48 तासात जारी न केल्यास पणजीतील आझाद मैदानावर येत्या 6 मार्चपासून उपोषण छेडण्याचा इशारा मिशन पॉलिटिकल फॉर एसटी रिझर्व्हेशन संघटनेचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी दिला.

केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार आश्‍वासने देऊन फसवणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पणजीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेळीप बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत एसटी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

त्यामध्ये रामकृष्ण जल्मी, रामा काणकोणकर, सिद्धार्थ बांदोडकर, राजू भगत, हर्षा वाडकर, हरिष गावडे, कमलाकर शिरवईकर यांचा समावेश होता.

लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एसटी समाजाला विधानसभेसाठी आरक्षण देण्यासंदर्भातील अधिसूचा जारी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकार एसटी समाजाला वारंवार आश्‍वासने देऊन गेल्या काही वर्षापासून झुलवत ठेवत आले आहे. या समाजाच्या शिष्टमंडळाला केंद्रातील नेत्यांची भेट देऊन फक्त आशा दाखवली जात आहे.

केंद्राने आरक्षण देण्यासंदर्भातची आवश्‍यक असलेली प्रक्रिया सुरू करण्याबाबतही काहीच हालचाली सुरु केलेल्या नाहीत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यावेळी फसवणूक करण्याचे षडयंत्र केल्‍याचा संशय नेत्याना वाटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT