Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेस उमेदवारीचे गूढ अद्याप कायम

Goa Lok Sabha Election: नाव जाहीर करायला मुहूर्त मिळेना : आज-उद्या निर्णय शक्य : पाटकर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Lok Sabha Election: गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार ठरविण्यासाठी आज (बुधवारी) काँग्रेस नेत्यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली, हे जरी खरे असले तरी उमेदवार कोण, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे गोव्यातील उमेदवार कोण, हे गूढ कायम राहिले आहे.

आज दिल्लीत आमची काँग्रेस नेत्यांबरोबर बैठक झाली. उमेदवारीबाबत चर्चाही झाली; पण कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

कदाचित गुरुवारी किंवा शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

आज झालेल्या बैठकीस सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते.

गोव्याचे प्रतिनिधित्व प्रभारी माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि अमित पाटकर यांनी केले. या बैठकीत काय चर्चा झाली, असा प्रश्र्न विचारला असता हा तपशील आम्ही उद्याच जाहीर करू, असे सांगत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले.

‘या’ नावांवर झाला खल:-

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बैठकीत दक्षिण गोव्यासाठी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह गिरीश चोडणकर आणि कॅप्टन विरिएतो फर्नांडिस अशी तीन नावे चर्चेत आली.

मात्र, सार्दिन आणि चोडणकर यांच्या नावावर अधिक चर्चा झाली. उत्तर गोव्यात खलप आणि विजय भिके या दोन नावांची चर्चा झाल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT