Dainik Gomantak
गोवा

Goa News: मुख्यमंत्र्यांकडून कॅसिनोसाठी मुदतवाढ; गोव्यातील हवामानाचा तपशील आणि ठळक घडामोडी

Marathi Breaking News 18 December 2024: सनबर्न, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल, सुलेमान खानचे पलायन, यासह राज्यातील ठळक बातम्या.

Akshata Chhatre

मुख्यमंत्र्यांकडून कॅसिनोसाठी मुदतवाढ

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कॅसिनोसाठी मुदतवाढीची घोषणा केली, त्यांना मार्च 2027 पर्यंत कॅसिनो चालवण्याची परवानगी दिली आहे.

बनावट उत्पन्न दाखला प्रकरणात आता थेट फोंड्यातील नगरसेवकाचे नाव पुढे!

फोंडा पालिका बनावट उत्पन्न दाखला प्रकरण. नगरसेवक शिवानंद सावंतांनी बनावट दाखला दिल्याची पिडीत सदानंद प्रभुगावकरांची माहिती. तर दाखला मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरवठा केल्याने माझे नांव आले असल्याची शक्यता, नगरसेवक सावंतांचा दावा. पोलिस तपासात पूर्ण सहकार्याची सावंतांची हमी. मात्र पोलिस तपास संथ असल्याने लोकांमध्ये उलट सुलट चर्चा.

Goa Live Updates: चोर सरकारी कार्यालयांनाही सोडेना!! डिचोली PWD मध्ये दीड लाखांच्या वस्तूंची चोरी

PWD कार्यालय डिचोली येथे चोरीचा प्रकार घडला, सुमारे 1.50 लाख किंमतीचे पाणी मीटर आणि इतर साहित्य घेऊन चोरांनी पलायन केले. सध्या गोवा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

थँक यु अश्विन!! आंतराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा रामराम

रविचंद्रन अश्विनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बॉर्डर गावस्करच्या अनिर्णित कसोटीनंतर घेतला निर्णय.

ग्रीन गोवासाठी विद्यार्थ्यांनी घरी झाडे लावणे गरजेचे

गोव्याची नैसर्गिक संपन्नता राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात झाडे लावावी, तसेच स्वच्छता राखण्यासाठी प्लास्टिकचा अतिवापर टाळावा. तेव्हाच "ग्रीन व क्लीन गोवा"ची संकल्पना साध्य होईल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यात गोठणाऱ्या थंडीला सुरुवात

गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे पणजीत मंगळवारी (दि. 17 डिसेंबर) रोजी तापमानात किमान 18.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण झाली होती, हवामान खात्याच्या अंदाजप्रमाणे आणखीन दोन दिवस हे बदल कायम राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT