गोवा प्रदेश काँग्रेसच्या आमदारांची मिरामार येथील हॉटेलमध्ये बैठक सुरू. दहा आमदारांची उपस्थिती
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस विधिमंडळाचा एक गट फुटून भाजपमध्ये जाणार असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. कामत गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये नाराज होते. तेच आता या फुटीरतावाद्यांचे नेतृत्व करत असून गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. यादरम्यान त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या पक्षाला हिरवा कंदील दाखवला आहे.
Goa Corona Update: मागील काही दिवसांपासून गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे
राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 111 नवे रुग्ण सापडले असून, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 812 इतकी झाली आहे. गोव्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 429 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 49 हजार 826 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.14 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 812 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1 मृत्यू झाला असल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 843 आहे. शुक्रवारी 1089 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 111 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनामुळे गोवा सरकारने आज एक दिवसाचा राजकीय शोक पाळत गोवा विधानसभेच्या संकुलात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला आहे.
कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सरकारी अधिकार्यांसह गुडी पारोडा येथील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि अतिवृष्टीमुळे ज्या पुलाची रेलिंग कोसळली आहे त्या पुलालाही भेट दिली.
काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर येऊन पाण्याच्या जबरदस्त प्रवाहामुळे पारोडा येथील पुलाचा एका बाजूचा कठडा वाहून गेल्याने सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. रहदारी सुरू ठेवण्यास मुख्यमंत्र्यांकडून परवानगी
वास्कोत एका इमारतीचा काही भाग शनिवारी खाली कोसळला. इमारतीखाली उभ्या असलेल्या कारचं या अपघातात मोठं नुकसान झालं. मात्र सुदैवाने या कारमधील महिला दुर्घटनेतून सुखरुप बचावली आहे.
गोव्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पूर आलेल्या दावकोण गावात भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान त्यांच्यासोबत सदानंद शेट तानावडे सुद्धा उपस्थित होते.
गोव्यात या महिन्याभरात 62 इंच पावसाची नोंद झाली आहे. (1 जून ते 9 जुलै)
उत्तर गोवा : 59 इंच
दक्षिण गोवा : 64 इंच
पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांसोबत मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे केपेमधील कुशावती नदीला पूर
पारोडा पूल पाण्याखाली गेला आणि परिणामी काल रात्री पुलाची रेलिंग वाहून गेली.
या पुलाचा वापर करणाऱ्या स्थानिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
कोंब मडगाव येथील अंडरपास पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे अजूनही मडगाव परिसरात ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. रेल्वे मार्गाखालून जाण्यासाठी बांधलेल्या अंडरपासमध्ये पाणी साचल्याने रेल्वे फाटक पडल्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
मडगावातील दामोदर कॉलेज जवळील सब-वे पाण्याने भरला; वाहतूक ठप्प
पेडण्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली
सांगेमध्ये ठिकठिकाणी झाडांची पडझड
एके ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकीवर झाड कोसळले, गाडीचे 80 हजारांचे नुकसान
काल गोव्यात मुसळधार पावसाने कहर केला होता. राज्यभरातील नद्या दुथडी भरून वाहत होते. शेते, पूल तसेच अनेक भागातील घरे पाण्याखाली गेली होती. हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुद्धा सज्ज झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.