कर्नाटकात झालेल्या 18 व्या ISAAF इंडियन नॅशनल एरोबिक्स चँपियनशिप 2023 स्पर्धेत गोव्याने दुसरा क्रमांक पटकावला. गोवा संघाने एकूण 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई केली. केयान एम. कालसूर याने 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले.
बीच फुटबॉल स्पर्धेत गोव्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात केरळने गोव्यावर मात करत सुवर्णपदक पटकावले. गोव्याची एकूण पदकसंख्या ३२ झाली आहे.
यापुढे फेरी बोटीतून नियमित ये- जा करणाऱ्या दुचाकींनाही शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी पासची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून दुचाकींना १५० तर चारचाकींना ६०० रुपये मासिक शुल्क. ऑनलाईन काढता येणार पास. मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती.
गोव्यातील बिगर गोमंतकीयांनी कोंकणी भाषा शिकली, बोलली पाहिजे. त्यांची जन्मभूमी वेगळी असली तरी कर्मभूमी गोवा आहे. गोवेकरांनी कोंकणी भाषेचा प्रचार, प्रसार, दैनंदिन वापर करावा, असे मत माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
वास्को येथील टिळक मैदानावर ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला फुटबॉलमध्ये गोव्याने शेवटच्या साखळी सामन्यात चंडीगडवर ३-१ असा विजय नोंदविला, परंतु अगोदर दोन्ही सामने गमावल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गोव्याला यापूर्वी हरियाना व ओडिशाविरुद्ध हार पत्करावी लागली होती.
गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या वेळेत अचानक वाढ केल्याप्रकरणी एनएसयूआयच्या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलेल्या याचिकेवर काही वेळ सुनावणी झाल्यानंतर उद्यापर्यंत ती पुढील सुनावणीसाठी तहकूब करण्यात आली आहे.
गिरकरवाडा - हरमल येथील पर्यावरण संवेदनशील सीआरझेड क्षेत्रातील बेकायदा बांधकाम प्रकरणी हरमल सरपंच बर्नाड फर्नांडिसला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा दणका. त्याच्या वडिलाच्या व काकाच्या नावावर असलेली बेकायदा गेस्ट हाऊस इमारत बाधकाम ४८ तासात सील करा. गिरकरवाडा - दांडो पेडणे भागातील सर्व बेकायदा बांधकामांचा सविस्तर अहवाल ७ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचा गोवा खंडपीठाचा सरपंचांना आदेश.
वाळपई नगरपालिका सभागृहात आज ओल गोवा शासकीय कर्मचारी संघटनेची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वेळी सत्तरी तालुका शासकीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रुपेश गावस यांची बिनविरोध निवड आली आहे.
बैठकीत गोवा शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर, सचिव समीर नागवेकर, सहसचिव रुपेश म्हापसेकर, सदस्य रुपाली गाड, चंद्रू सावंत, संज्योत देसाई आदींची उपस्थिती होती.
खोब्रावाडा-कळंगुटमध्ये परप्रांतीय विवाहितेची आत्महत्या. दोन महिन्यांपूर्वी नवरा-बायको पळून गोव्यात येऊन भाड्याच्या घरात राहत होते. नवरा कामाला गेला असता बायकोने जीवन संपवले. घरगुती कारण असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. मृत महिलेच्या घरच्यांचा शोध सुरू असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी GMC मध्ये पाठवण्यात आला आहे.
मांडवी एक्सप्रेसच्या डब्याला आग. मडगावहून मुंबईला जात असताना शेवटच्या डब्याने (जनरेटर डबा) अचानक पेट घेतला. माहितीनुसार सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आग विझवण्यात आली. ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागली. सुदैवाने जीवितहानी नाही.
व्याघ्र संरक्षित क्षेत्र संदर्भात गोवा फाऊंडेशनने सादर केलेला अवमान अर्ज व सरकारने मुदतवाढीसाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी गोवा खंडपीठाने सोमवारपर्यंत तहकूब केली. सरकार व गोवा फाऊडेशनला या अर्जांवर उत्तर मांडण्यास मान्यता दिली आहे.
आरएसएस आणि इतर काही संघटना देश विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने डोळे उघडे ठेवून देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे असे विधान दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
जमीन हडप प्रकरणात व्ही.के.जाधव एक सदस्यीय समितीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांकडे सुपूर्द.
गिरी येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ‘हीट अँड रन’ अपघात प्रकरणातील संशयित ॲड. मिलिंद नाईक देसाई हे दारूच्या नशेत कार चालवत असल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे म्हापसा पोलिसांनी त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांत अजून कलमे जोडली आहेत. हा अपघात 15 ऑक्टोबरला घडलेला होता.
पणजी मंगळवारी सायंकाळी अचानक गडगडाटासह आलेल्या पावसाच्या सरींनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांची पुरती दाणादाण उडवली. रात्री उशिरापर्यंत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना पावसाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पणजी, फोंडा, मडगाव अशी धावाधाव करावी लागली. कांपालची क्रीडानगरी चिखलात बुडाली असून उद्या (ता.१) क्रीडा स्पर्धा नियोजित वेळेत सुरू होतील का, याबाबत शंका आहे.
कळंगुट, कांदोळी येथील किनारी भागात बेदरकारपणे जीपगाडी चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या लोकेश बंसल (२८) या दिल्लीस्थित पर्यटक आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या कळंगुट पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या. ही घटना मंगळवारी (ता.३१) दुपारी कांदोळी येथे घडली.
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या लोकेश बन्सल याने बार्देशातील एका रेंट-अ-कार व्यावसायिकांकडून पर्यटनासाठी काळ्या रंगाची जीपगाडी (जीए-०३/एएच-५१९६) भाडेपट्टीवर घेतली होती.
श्रुंगी बांदेकर व संजना प्रभुगावकर या गोव्याच्या जलतरणपटूंनी लौकिकास साजेशी कामगिरी बजावताना 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला जलतरणात दोन ब्राँझपदके जिंकून दिली. त्यामुळे यजमानांची आता स्पर्धेतील एकूण पदकसंख्या 30 झाली आहे.
शिवोलीमध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाच्या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. यावेळी बार्देशचे मामलतदार प्रवीण गवस यांच्यासह खाण आणि भूविज्ञान विभागाचे अधिकारी सहभागी होते. काल (मंगळवारी) पहाटे दोन भरलेले ट्रक, एक रिकामा ट्रक आणि एक वाळू उपसण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे.
पणजी,पर्यटन खात्याने कळंगुटमधील गैरप्रकारांविरोधात मोहीम उघडल्यानंतर तेथील सारेकाही गैरव्यवहार बंद झाले असेल असा जर कोणाचा समज असेल, तर तो खोटा आहे.
कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी आज दै. ‘गोमन्तक’शी बोलताना कळंगुट पंचायत क्षेत्रात किमान १० बेकायदेशीर डान्स बार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला.
सिक्वेरा म्हणाले, हप्तेबाजीशिवाय संबंधितांचे अशा गोष्टींना संरक्षण मिळणे कठीण आहे. पंचायतीने या बेकायदा डान्स बारबाबत पोलिस निरीक्षक, अधीक्षकच नव्हे, तर पोलिस उपमहानिरीक्षकांना सप्टेंबरमध्ये कळवूनही कारवाई झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.