Today's Live Goa News in Marathi (6 February 2024 | PM Narendra Modi Goa Visit | Mapusa News Dainik Gomantak
गोवा

PM Modi Goa Visit Live Update: पंतप्रधान मोदींच्या गोवा दौऱ्यासह राज्यातील अन्य घडामोडी वाचा एका क्लिकवर

PM Narendra Modi Goa Visit Live | Goa Breaking and Latest News in Marathi (6 February 2024): पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...

Kavya Powar

मंत्री गावडें विरोधात गुन्हा नोंद करा, कॉंग्रेसची मागणी!

एससी - एसटी आयोगाच्या आयुक्तांना फोनवर जीवे मारण्याबाबत भाष्य करणाऱ्या मंत्री गोविंद गावडेंवर तात्काळ एफआयआर नोंद करा. कॉंग्रेसची पणजी पोलिस स्थानकात तक्रार.

वॉटर स्पोर्ट्स इन्स्टि्यूटमध्ये जूनपासून प्रवेश

PM मोदींच्या हस्ते मंगळवारी भारतीय जल क्रीडा संस्थेचे उद्घाटन करण्यात आले असून IIWS पोर्टलवर प्रवेश आणि जॉब प्लेसमेंट अर्ज सुरु असल्याचे नोडल अधिकारी डॉ. रवींद्र डोंगरा यांनी सांगितले. या इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ग आणि प्रशिक्षण जूनपासून सुरू होणार आहे.

डिचोलीत कार आणि दुचाकीचा अपघात, युवक जखमी

Bicholim Accident: डिचोलीत 'सेतू संगम' प्रकल्पस्थळी कार आणि दुचाकीचा अपघात. अपघातात कुडचडे येथील युवक जखमी. जखमी युवक उपचारासाठी रुग्णालयात दाखल.

Bicholim Accident

मडगावातील मोदींचा सभा यशस्वी, प्रमोद सावंत यांचा दावा

मडगावातील मोदींच्या सभेसाठी आम्हाला 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित होती. पण, सभेसाठी 70 हजाराहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली. मोदींची सभा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असे मी सांगू शकतो, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला.

तुडव-नेत्रावळी येथे बिबट्याचा मुक्‍त संचार

तुडव-नेत्रावळी येथे बिबट्याचा मुक्‍त संचार, तीन बैलांना मारले; ग्रामस्‍थांमध्‍ये भीतीचे वातावरण. वन खात्‍याने त्‍वरित उपाय योजण्‍याची मागणी.

क्रीडा-पर्यटनाशिवाय गोवा शैक्षणिक केंद्र करण्यावर सरकारचा भर!

गोव्याला फक्त क्रीडा आणि पर्यटनापुरतेच मर्यादित न ठेवता शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यावर सरकारचा भर. नरेंद्र मोदींनी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात 1 लाख कोटीचा निधी देण्याचे आश्वासन दिले. याचा फायदा राज्यातील तरुण आणि उद्योग क्षेत्राला होईल.

गोवा लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार: पंतप्रधान

गोव्यात पायाभूत साधनसुविधांचा विकास करण्यासोबतच केंद्र सरकार गोव्याला लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यावर भर देत आहे. विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना मोफत आरोग्य सुविधा मिळणार : पंतप्रधान

गोव्यातील जातीय सलोखा कौतुकस्पद: पंतप्रधान

गोव्यातील जातीय सलोखा कौतुकस्पद. ख्रिश्चन समाजाचे इतर समाजाशी असलेले नाते "एक भारत श्रेष्ठ भारत" भक्कम उदाहरण आहे. तसेच सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शन शांतता आणि कृतज्ञतेचा संदेश देईल. शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रातील 13000 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असून यामुळे गोव्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील विकास प्रकल्पांचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 100 एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्प, एनआयटी संकुल, राष्ट्रीय वॉटर स्पोर्ट्स क्रीडा संस्था दोनापावला तसेच कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

भूमिगत वीज वाहिनीच्या कामामुळे रस्त्याला भगदाड!

भूमिगत वीज वाहिनीचे काम करताना अंजुणे धरणाचा मोरशी-घोटेली 2, केरी सत्तरी येथील उपकालवा फुटल्याने रस्त्याला मोठे भगदाड. पाण्याच्या झोताने कालव्याची माती शेती बागायतीत गेल्याने मोठे नुकसान. रस्त्याचीही दुर्दशा.

चिखली कोमुनिदादच्या जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन!

डबल ट्रॅकिंगच्या नावाखाली चिखली कोमुनिदादच्या जमिनीवर दाबोळी विमानतळासमोर जमीन उत्खनन. यातून बेकायदेशीररित्या खनिजे, बॉक्साईट उत्खनन होत असल्याचा कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांचा आरोप. याला कोणत्याही सरकारी कार्यालयाची परवानगी नसल्याचा दावा. त्यामुळे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे. विरियेतो फर्नांडिस यांची मागणी

भारत ऊर्जा सप्ताह उद्घाटन! पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • भारत ऊर्जा सप्ताहासाठी गोवा योग्य ठिकाण

  • भारत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम; सोबतच जागतिक विकासाच्या दिशेने वाटचाल

  • देशात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर

  • सरकारच्या धोरणांमुळे देशातील घरगुती गॅस उत्पादनात वेगाने वाढ

  • ग्लोबल बायोफ्यूएल्स अलायन्सने जगभरातील सरकार, संस्था, उद्योगांना एकत्र आणले.

  • सरकारचे सौरऊर्जा क्षेत्रात स्वावलंबनाला प्रोत्साहन.

  • 2045 पर्यंत ऊर्जेची मागणी दुप्पट; यासाठी सरकार तयार

भारत 2027 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल!

भारत 2027 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणारा देश ठरेल. अक्षय ऊर्जेचा वापर करणारा भारत चौथा देश आहे. कारण 40% ऊर्जेची मागणी बिगर जीवाश्म इंधनाद्वारे पूर्ण केली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सौर उर्जेत 20 टक्क्यांनी वाढ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती.

भारत ऊर्जा सप्ताहासाठी गोवा योग्य ठिकाण: पंतप्रधान

पर्यावरण संवेदना आणि शाश्वता यावर चर्चा करण्यासाठी गोवा हे सर्वात योग्य ठिकाण आहे, भारत ऊर्जा सप्ताह सदैव उर्जेने भरलेल्या गोव्यात होतोय, ही चांगली बाब आहे. उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य.

पंतप्रधानांच्या भाषणाला सुरुवात...

भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांच्या भाषणाला सुरुवात झाली. यामध्ये त्यांनी हा उपक्रम सदैव उर्जेने भरलेल्या गोव्यासारख्या राज्यात होतो आहे, याबाबत कौतुक केले.

भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान गोव्यात दाखल! सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचे केले उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल. त्यांच्या हस्ते ONGC च्या एकात्मिक सी सर्व्हायव्हल ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी उपस्थित.

म्हापशातील आंगोड येथील घराला आग

म्हापशातील आंगोड येथील शेखर गावस यांच्या एका घराला आग. आगीची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. यामध्ये 60 हजारांचे नुकसान. 1 लाखाची मालमत्ता वाचवण्यात दलाच्या जवानांना यश. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन होणारे प्रकल्प.. 

  • कुंकळ्ळी येथील एनआयटी

  • करंझाळे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस

  • कुडचडे येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्प

  • शेळपे, साळावली येथील जलप्रक्रिया प्रकल्प

  • कांपाल - पणजी ते रेईश मागूश दरम्यानच्या ‘रोप-वे’ची पायाभरणी

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज...

पंतप्रधानांचा कार्यक्रम

  • सकाळी 9.50: दाबोळी विमानतळावर आगमन

  • सकाळी 10.15: बेतूलला आगमन

  • सकाळी 10.30 ते 10.40: एकात्मिक समुद्र अस्तित्व प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन

  • सकाळी 10.45 ते दु. 2 पर्यंत :‘भारत ऊर्जा सप्ताह - 2024 ’चे उद्‍घाटन

  • दुपारी 2.35: फातोर्डा साग मैदानावर आगमन

  • दुपारी 2.45: विकसित भारत कार्यक्रम स्थळी आगमन

  • दुपारी 2.45 ते 4: विकसित भारत सभा

  • संध्याकाळी 4.10: फातोर्ड्याहून दाभोळीला प्रयाण.

वाळपई नगरपालिका प्रभाग 10 मध्ये पाईपलाईनला गळती

वाळपई नगरपालिका प्रभाग 10 मध्ये जलवाहिनीच्या मुख्य पाईपलाईनला गळती. कालपासून (ता.5) हजारो लिटर पाण्याची नासाडी. अनेकांचे दुर्लक्ष. पाईपलाईन त्वरित दुरुस्त करण्याची मागणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT