जिल्हा निबंधकांनी भंडारी समाज निवडणूक प्रक्रियेला पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत स्थिती दिली. पुढील सुनावणी आता 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
भंडारी समाजाची नवीन समिती जाहीर झाली. 17 सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देवानंद नाईक हे नवीन अध्यक्ष असणार आहेत. पूर्वी दुरुस्ती करुन बदल केलेले कायदे आपण रद्द करणार असल्याची घोषणा देवानंद नाईक यांनी केली. यापुढे निवडणुकीसाठी कसलीच वयोमर्यादा असणार नाही.
गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई यांची 8 नोव्हेंबर 2024 पासून खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, रोहन संघासह दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत.
मत्स्यद्योग खात्याच्या संगनमतानेच इतर राज्यांतील ट्रॉलर्सची गोव्याच्या समुद्रात घुसखोरी. गोव्याच्या हद्दीत 12 नॉटिकल माईल्सपर्यंत मासेमारी बंद करण्यासाठी कायद्यात सुधारणा होणे आवश्यक- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर
सभापती रमेश तवडकर यांनी डॉम्निक नोरोन्हा यांची काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या 8 आमदाराविरुद्धची अपात्रता याचिका रद्द केली होती. त्यानंतर सोमवारी डॉम्निक नोरोन्हा यांनी सभापतींच्या निकालाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 10 ऑक्टोबर रोजी सभापतींनी नोरोन्हा यांची याचिका रद्द केली होती.
अवेडे केपे गावात दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाली, ज्यामध्ये गटामधील तिघेजण जखमी झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध केपे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांच्या देखरेखीखाली केपे पोलिीस पुढील तपास करतायेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कॅश फॉर जॉब प्रकरण चांगलंच गाजत आहे. याचीच दखल आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली असून त्यांनी गोमंतकीयांना पुढे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी कोणाचीही सुटका होणार नाही अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
मोले बस अपघातात कारणीभूत ठरलेल्या बस चालक भिवा नाईक (बेंगलोर)यांच्या विरुध्द निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल. कुळे पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस तपास चालू.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व सरकारी विभागांसोबत 55 व्या इफ्फीच्या सोहळ्यापूर्वी आढावा बैठक घेतली. 15 नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण होतील. 18 नोव्हेंबरला पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या प्रिया यादव हिच्या मालकीच्या दोन चारचाकी मिळून चार वाहने तसेच, 116 ग्रॅम सोने डिचोली पोलिसांकडून जप्त. रविवारी कोल्हापूर येथे प्रिया हिला पोलिसांकडून अटक.
'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणी पूजा नाईक हिच्या जामीन अर्जावर आज दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी निर्णय अपेक्षित आहे. आज सकाळी पूजा हिला डिचोली न्यायालयात हजर केले होते, मात्र तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सकाळची सुनावणी दुपारपर्यंत ढकलण्यात आली आहे.
आज सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी भंडारी समाजाच्या कार्यालयाबाहेर अनेक सभासद जमले आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत इथे निवडणूक छाननी पार पडेल, मात्र अद्याप रिटर्निंग ऑफिसर येणे बाकी आहे. दरम्यान कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
शिगाव, मारेगाळ नर्सरी जवळ चालत्या दुचाकीवर झाड पडल्याने दुचाकीचे नुकसान. दुचाकी चालक थोडक्यात बचावला. शिगाव ते सावर्डे मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.