Goa Live Updates 31 Updates 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Daily News Wrap: दिवसभरात गोव्यात काय काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Goa Breaking News 31 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...

Kavya Powar

गोवा बनावटीची 12.52 लाखांची दारू आंध्रप्रदेश पोलिसांकडून जप्त

गोव्यातून बेकायदेशीररीत्या नेलेली १२.५२ लाखांची दारू आंध्रप्रदेश पोलिसांकडून कडपा येथे जप्त. ट्रकमधील भाजीच्या रिकाम्या पेट्यांमध्ये लपवली होती दारू. ढोणे-आंध्रप्रदेशमधील पाच जणांना अटक.

कुर्टी साईराज हाऊसिंगच्या फ्लॅटमध्ये चोरी; 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

कुर्टी साईराज हाऊसिंगच्या फ्लॅटमध्ये चोरी; सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

शिवोलीत अट्टल चोरट्याला स्थानिकांकडून ताब्यात घेत केले पोलिसांच्या स्वाधीन

शिवोलीत अट्टल चोरट्याला स्थानिकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित चोरट्याचा विविध चोरीच्या घटनांमध्ये समावेश असल्याचे आढळून आले आहे.

एलिना साल्ढाणांचा आम आदमी पक्षाला रामराम!

भाजपच्या माजी आमदार मंत्री एलिना साल्ढाणांचा आम आदमी पक्षाला रामराम. प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा.

पणजीत आढळला बेवारस मृतदेह

पणजीत, महावीर गार्डनजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह वृद्ध व्यक्तीचा असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गोवा विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन; पणजी, पर्वरीत कलम 144 लागू

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 02 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात (पर्वरी आणि पणजी) कलम 144 लागू करण्यात आले आहे. याकाळात मोर्चा, रॅली, धरणे आंदोलन यासारखे प्रदर्शने विधान भवनाच्या 500 मीटर आवारात करता येणार नाहीत.

कांदोळी हत्या प्रकरण: सूचना सेठच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

कांदोळी हत्या प्रकरणातील सूचना सेठच्या न्यायालयीन कोठडीत पणजी बाल न्यायालयाने आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. आज (31 जानेवारी) तिच्या आधीच्या 13 दिवसांच्या कोठडीचा शेवटचा दिवस होता.

गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घाला, हिंदू जनजागृती समितीकडून 8 आमदारांना निवेदन

उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घालावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह राज्यातील विविध आमदारांना निवेदन सादर केले.

टॅक्सी चालकांनी मोपा विमानतळावरील सुरक्षा रक्षाकाला मारहाण का केली? 50-60 जणांविरोधात गुन्हा

मोपा विमानतळावरील सुरक्षा रक्षकाला मारहण केल्याची घटना मंगळवारी (दि.30) दुपारी उघडकीस आली. वारखंड येथे क्रिकेट मैदानाजवळ अडवून सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. याप्रकरणी टॅक्सीचालकांसह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वनसंरक्षण अधिकारी जाधव यांना डॉ.देविया राणेंनी दिल्या शुभेच्छा!

वनसंरक्षण अधिकारी, आनंद जाधव यांनी गोवा वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारला. यावेळी आमदार डॉ.देविया राणे यांनी त्यांना सकारात्मक कामासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांना सादर करणार 10 वर्षांच्या विकासाचे रिपोर्टकार्ड!

नरेंद्र मोदींच्या 6 फेब्रुवारीच्या गोवा दौऱ्यात 'विकसित भारत, विकसित गोवा' रॅलीचे आयोजन. मागील 10 वर्षांच्या विकासकामांची देणार माहिती. अधिकाऱ्यांचा मोदींच्या हस्ते होणार सन्मान. आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.

भावकई खाजन कुळ संघटनेची निवडणूक रद्द

भावकई खाजन कुळ संघटनेची निवडणूक रद्द. बुधवारी झालेल्या बैठकीत कोरमअभावी निवडणूक प्रक्रिया झालीच नाही. मतदार यादीला शेतकऱ्यांचा आक्षेप.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी मूळचा उत्तर प्रदेशातील असलेल्या कुतुबुद्दीन अन्सारी याला वास्को पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 685 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. वास्को पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकोत्सवातील एका स्टॉलधारकाचा हार्ट अटॅकने मृत्यू!

पणजीत सुरू असलेल्या लोकोत्सवातील मोहम्मद फिरोज (उज्जैन, मध्यप्रदेश) या स्टॉलधारकाचा हार्ट अटॅकने मृत्यू. बुधवारी (31 जानेवारी) पहाटेची घटना. पोलीस पंचनामा पूर्ण. संध्याकाळी मृतदेह नेणार मध्यप्रदेशात.

दीपा संगम पळ डिचोली नवीन उपनगराध्यक्षा!

दीपा संगम पळ या डिचोली पालिकेच्या नवीन उपनगराध्यक्षापदी नियुक्त झाल्या आहेत. आज बुधवारी (31 जानेवारी) झालेल्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली.

आता आमदार दिगंबर कामतच पुढे काय करायचं ते बघतील: दिपाली सावळ

मडगावच्या उप नगराध्यक्ष दिपाली सावळ यांनी आपला राजीनामा महापालिका प्रशासन संचालकांकडे देण्याऐवजी आमदार दिगंबर कामत यांच्याकडे सोपवला. राजीनाम्याबाबत सविस्तर बोलण्यास नकार. मला आमदार दिगंबर कामत यांनी उप नगराध्यक्ष केले होते; त्यामुळे मी त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे. आता ते पुढील प्रक्रिया करतील, असे दिपाली सावळ म्हणाल्या.

पणजीत 10 फेब्रुवारीला रंगणार कार्निव्‍हल परेड

पणजीत व्‍हिवा कार्निव्हल दि. 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्‍यात आला आहे. ही परेड बांदोडकर मार्गावर 10 रोजी काढली जाईल. दरम्‍यान, कार्निव्हलसाठी 58 वर्षे योगदान देणारे फ्रांकित मार्टिन्‍स यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती पणजी कार्निव्हल समितीचे अध्‍यक्ष तथा महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

सोशल मिडीयावर प्रभू श्रीरामावर आक्षेपार्ह पोस्ट! अल्पवयीन युवकाला अटक

केरी सत्तरी येथे एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी काल (30 जानेवारी) संध्याकाळी केरी येथील ग्रामस्थांनी चेक पोस्टवर जमून त्या युवकाला अटक करण्याची जोरदार मागणी केली.

यावेळी मोठमोठ्याने श्रीरामाच्या घोषणा देत त्या युवकाला अटक करण्याची जोरदार मागणी केली. सुमारे 300 पेक्षा अधिक नागरिकांचा जमाव चेकपोस्टवर हजर होता. जोपर्यंत त्या युवकाला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे जमावातर्फे सांगण्यात आले.

गोव्यातील इंधनाचे नवे दर जाहीर; वाचा आजच्यी किमती...

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

SCROLL FOR NEXT