"लोकसभा निवडणुकीनंतर ज्या दिवशी दिल्लीत भाजपचा पराभव होईल, त्याच दिवशी गोव्यातही प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलेले दिसेल. तसेच, काँग्रेस पक्ष गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकेल," असा विश्वासही टागोर यांनी व्यक्त केला.
जोफीलनगर फोंडा येथे जिवंत वीज वहिनीला क्रेनचा स्पर्श झाल्याने क्रेन चालक मेहबूब पारकेवाले (32, मायणा कुडतरी) याचा मृत्यू. क्रेनच्या साहाय्याने लाकूड भरण्याचे काम सुरु असताना घडली घटना.
कदंब बसने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही बस पणजीहून केरी सुर्ला येथे जात होती, बसमधील सर्व प्रवासी सुरक्षीत आहेत.
जमीन हडप प्रकरणाती मुख्य सुत्रधार मोहम्मद सुहेल याच्यासह रॉयसन रॉड्रिग्ज आणि स्टिव्हन डिसोझा या तिघांना एसआयटी कडून पुन्हा अटक.
गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मणिकम टागोर गोव्यात दाखल झाले आहेत. टागोर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांच्या बैठका घेतील आणि चर्चा करतील.
साईश बोरकरला पणजी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जम्मू येथे झालेल्या ३१व्या राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या मुलांना उपविजेतेपद. अंतिम लढतीत जम्मू-काश्मीर संघाचा विजय.
म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील विशेष याचिकेवरील सुनावणी 06 डिसेंबर रोजी शक्य असल्याची माहिती महाधिवक्ता देविदास पांगम यांनी दिली आहे.
म्हादईबाबत आम्ही गंभीर आहोत की सुशेगाद? म्हादईवरील सुनावणी बुधवारी होणार होती मात्र ती सुनावणीस आलीच नाही. आजही याचिका सुनावणीस आली नाही, यामुळे गोव्याला न्याय मिळण्यास विलंब होत आहे, असे ट्विट गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केले आहे.
अबकारी खात्याच्या काणकोण मधील अधिकाऱ्यांनी कारवारच्या बाजूने जाणाऱ्या वाहनातून पोळे तपासणी नाक्यावर 5 लाख 8 हजार 800 रूपयांची दारू वाहनासह जप्त केली. वाहनचालकालाही ताब्यात घेतले आहे. मल्लिकार्जुन हिरेमठ असे त्याचे नाव आहे. मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून दारू तस्करीचा प्रयत्न केला जात होता.
बेतुल येथे एलईडी लाईट्स वापरून मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरला किनारी पोलिस आणि मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकून पडकडल्याची माहिती आहे.
कामावरून काढलेल्या वेदांता (सेसा) कंपनीच्या कामगारांनी गुरूवारी पिळगाव पंचायतीवर धडक दिली. पंचायतीकडून कामगारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. कामगारांचा विषय कंपनी व्यवस्थापनाकडे नेवून तोडगा काढण्याचे आश्वासन पंचायतीने यावेळी कामगारांना दिले.
शिवोली-म्हापसा रस्त्यावर पहाटे पाचच्या सुमारास एका कारचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने ही कार रस्ता सोडून थेट बाजूच्या जंगलात घुसली. सुदैवाने यात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. कारचे मात्र नुकसान झाले आहे.
होंडा औद्योगिक वसाहतीतील एका फार्मा कंपनीच्या गोदामाला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री ही आग लागली होती. विविध ठिकाणच्या 8 बंबांनी 6 तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.