Goa Breaking News 30 December 2023 | Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Live Updates 30 December: स्थानिकावर क्लब मालकाने हल्ला केल्याप्रकरणी युरी आलेमाव यांची टीका

Goa Breaking News 30 December 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...

Kavya Powar

गोव्यात वर्षाअखेरीस येणाऱ्या पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीला हणजूण पोलिसांनी ताब्यात घेतले. ही टोळी गर्दीची ठिकाणे हेरून पर्यटन मोबाईल फोन्स चोरत. पोलिसांनी मुंब्रा महाराष्ट्रातून 7 जणांना अटक केली असून अंदाजे 25 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

गोवा पोलिसांना सरकारने नाईट क्लबकडे गहाण ठेवलंय का? डिजीपींनी स्पष्टीकरण द्यावे; आलेमाव

वेळेच्या बंधनाबाहेर कर्णकर्कश संगीत वाजवल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या हणजुणे येथील स्थानिकांवर क्लब चालकांनी हल्ला केला.

'या दादागिरीचा मी तीव्र निषेध करतो. गोव्यातील पोलीस दल हे भाजप सरकारने नाईट क्लबकडे गहाण ठेवलंय का यावर पोलीस महासंचालकानी स्पष्टीकरण द्यावे व हणजुणे येथील हल्लेखोरांवर कारवाई करावी,' अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

सनबर्न नंतर आता शापोरा महोत्सवात वाद; 'या' कारणास्तव हिंदुत्ववादी संघटनांसोबत काँग्रेसही आक्रमक

Sunburn Goa 2023: सनबर्न EDM कार्यक्रमादरम्यान भगवान शिवाच्या चित्रावरून वादंग निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. यातच आता आणखी एका घटनेने भर पडली आहे.

1 जानेवारीला मॉर्निंग वॉकला जाऊ नका! उपअधीक्षकांचे आवाहन

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुरगाव पोलीस विभागात 250 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. अपघात टाळण्यासाठी 1 जानेवारी 2024 ला नागरिकांनी महामार्गावर मॉर्निंग वॉकला न जाता जॉगर्स पार्कमध्ये जावे, पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांचे आवाहन.

देवस्थानच्या जागेत बेकायदा बांधकाम सुरु असल्याने स्थानिक आक्रमक

हुडोवाडा-शापोरा येथे देवस्थानच्या जागेत परप्रांतीय बिल्डरानचे बेकायदा बांधकाम सुरु आहे. स्थानिक आक्रमक. पंचायत कार्यालयात धांव‌, तक्रार दाखल. बांधकाम न रोखल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

गोमंतक टीव्हीच्या वृत्ताची दखल! 3 दिवसात पूर्ण झाले जामगळ-नेत्रावळी पुलाचे काम; मात्र अद्याप...

काही दिवसांपूर्वी जामगळ-नेत्रावळी पुलावरून पडून रमाकांत गावकर (50) यांचा मृत्यू झाला. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सर्व स्तरातून टीका झाली. यानंतर गोमंतक टीव्हीच्या वृत्ताची दखल घेत विभागाने 3 दिवसात जामगळ पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. पुलाचा तुटलेला कठडाही दुरुस्त करण्यात आला आहे.

संगीताचा ध्वनी कमी करण्यास सांगितल्यामुळे वागातोरमधील क्लबच्या मालकाकडून स्थानिकाला मारहाण

संगीताचा ध्वनी कमी करण्यास सांगितल्यामुळे वागातोरमधील स्थानिकाला त्याच्या घरात घुसून लिओनी क्लबच्या मालकाने केली मारहाण. ही घटना आज (30 डिसेंबर) सकाळी साडेपाचच्या सुमारास वागातोर येथे घडली. याबाबत हणजूण पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुळगावमधील तळ्याचे भाग्य उजळणार

मुळगावमधील तळ्याचे भाग्य उजळणार. जलस्रोत खात्यातर्फे 11 लाख रुपये खर्चून तळ्याचा विकास करण्याचा प्रस्ताव. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ.

'आप'सोबतच आता कॉंग्रेसही आक्रमक... 

Sunburn Goa 2023: सनबर्नमध्ये भगवान महादेवांचे चित्र लावल्याप्रकरणी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हापसा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काल (29 डिसेंबर) आपचे अमित पालेकरांनी ट्विटरवर पोस्ट करत आक्षेप नोंदवला होता

मंगळुरू-गोवा वंदे भारत गोव्याच्या दिशेने रवाना होण्यास सज्ज

Vande Bharat Goa: मंगळुरू-गोवा वंदे भारत मंगळुरू सेंट्रल रेल्वे स्थानकावरून गोव्याच्या दिशेने निघण्यासाठी सज्ज. मंगळुरू स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 डिसेंबर) सकाळी 10.30 वाजता हिरवा झेंडा दाखवणार. दुपारी 3.30 वाजता ही गाडी मडगाव स्थानकावर पोहोचणार.

मंगळुरू-गोवा वंदे भारत

खारेबांद येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई; दोघांना अटक

Goa Crime News: मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करताना दोघांना अटक केली. खारेबांद येथे मटका घेताना मडगाव पोलिसांनी सांतान क्रस्‍टो (50) याला पकडून त्‍याच्‍याकडील मटका साहित्‍य व 580 रुपये जप्‍त केले

विकेंडला गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; वाचा आजच्या ताज्या किमती

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT