Goa Live Update | Goa Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa Live Updates: म्हादईवरून 'ट्विटवॉर'; CM सिद्धरामय्या आणि MP तेजस्वी सूर्या आमनसामने

गोमंतक ऑनलाईन टीम

केंद्राचे कर्नाटकवर प्रेम नाही का? म्हादईच्या पाण्यावरुन CM सिद्धरामय्या आणि MP तेजस्वी सूर्या यांच्यात जुंपली

 म्हादई नदीच्या पाण्यावरून गोवा- कर्नाटक राज्यात वाद सुरु आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्राच्या निष्क्रियतेमुळे म्हादई प्रकल्प रखडल्याचे ट्विट केले आहे. केंद्राचे कर्नाटकवर प्रेम नाही का?

हुबळी धारवाड आणि परिसरातील 50 लाख रहिवाशांसाठी म्हादई प्रकल्प आवश्यक असून पंतप्रधान आमची तहान कधी भागवणार? असा सवाल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला.

करासवाडा येथे घराला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे आग भडकल्याची स्थानिकांची माहिती

म्हापसा करासवाडा येथील रहिवासी रेहान बेपारी यांच्या मालकीच्या घर क्रमांक 57 मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीची तीव्रता मोठी होती मात्र म्हापसा अग्निशामक दलाने महत्वाची कामगिरी बजावत या आगीवर नियंत्रण मिळवले.

गणपतराव देसाईला कराटेत ब्राँझ

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कराटे या प्रकारात गोव्याच्या गणपतराव देसाई याने ब्राँझ पदकाची कमाई केली. तो सत्तरीचा आहे. तर त्याचे प्रशिक्षक कृष्णा वेळूसकर हे वेळूसचे आहेत. या पदकानंतर वेळूस आणि सत्तरीत आनंदोत्सव साजरा झाला.

हडफडेमध्ये बेकायदेशीर डोंगर कापणीसह 500 हून अधिक झाडांची कत्तल

हडफडेमध्ये अनधिकृत टेकडी व वृक्षतोडप्रकरणाला ऊत आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतेय. झिमर म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागातील उतारावरील घनदाट झाडे असलेला बराच भाग अक्षरशः साफ करून या जागेतून रस्ता तयार करायचे काम सुरु झाले आहे.

पदकाच्या शोधात गोव्याचा फुटबॉल संघ; घरच्या मैदानावर विजेतेपदासाठी प्रयत्नशील

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पुरुष फुटबॉलमध्ये कधीही सुवर्णपदक मिळालेले नाही, अखेरच्या वेळेस बारा वर्षांपूर्वी ब्राँझपदक मिळविले, तर त्यापूर्वी दोन वेळा रौप्यपदक मिळविले होते. आता घरच्या मैदानावर डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल.

गाव उद्ध्वस्त करणारा खाण व्यवसाय नकोच! अडवलपालची ग्रामसभा तापली

खाण विषयावरून डिचोलीतील अडवलपाल पंचायतीची आजची (रविवारी) ग्रामसभा तापली. पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन खाण व्यवस्थापनाकडून स्थानिक लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घ्यावेत. स्थानिक आमदार आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ग्रामस्थांचे प्रश्न अगोदर सोडवावेत. नंतरच खाण ब्लॉक-5 अंतर्गत खाण सुरू करण्यास ‘ना हरकत दाखला’ देण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी ग्रामसभेस उपस्थित नागरिकांनी केली.

गोव्याच्या संजना प्रभुगावकरला जलतरण स्पर्धेत रौप्यपदक

गोव्याच्या संजना प्रभुगावकरला 200 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. तर अटीतटीच्या या शर्यतीत कर्नाटकने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.

Sanjana Prabhugaonkar

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोव्याच्या सिया सरोदेचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये गोव्याची सिया सरोदे हिचे विशेष ऑलिंपिक जागतिक खेळामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. त्यांनी खेळाडूंकडून आपल्या देशासाठी गौरव वाढवण्याची अपेक्षा करत त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Siya Sarode

इफ्फी महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन मडगावच्या रवींद्र भवनच्या सभागृहात होणार

यंदाच्या इफ्फी महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन मडगावच्या रवींद्र भवनच्या सभागृहात होणार आहे. त्यामुळे भवनची दुरुस्ती, सुशोभीकरण आवश्यक असल्याने ३१ ऑक्टोबरपासून सभागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तियात्रिस्त भडकले होते. मात्र, आता रवींद्र भवनचे सभागृह ६ नोव्हेंबरपर्यंत खुले केल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली आहे.

इफ्फीचे तांत्रिक अधिकारी ७ नोव्हेंबर रोजी रवींद्र भवनमध्ये चाचणी करणार आहेत. त्यानंतर दुरुस्ती व सुशोभीकरणाची दिशा ठरणार आहे, असेही तालक यांनी सांगितले.

गोव्यातील महिलाही करणार 'नाईट शिफ्ट'; सनोफी फार्मा कंपनीला राज्य सरकारकडून परवानगी

फार्मा जायंट मानल्या जात असलेल्या सनोफी या फार्मास्युटिकल कंपनीत वेर्णा येथील कार्यालयात महिलांना नाईट शिफ्टमध्ये (रात्रपाळीत) काम करता येणार आहे.

तशी परवानगी गोवा राज्य सरकारने कंपनीला दिली आहे. एरवी नाईट शिफ्टमध्ये कामासाठी नेहमीच पुरूष कर्मचाऱ्यांचा विचार केला जातो. पण, आता या निर्णयामुळे महिलांनाही रात्रपाळीत काम करता येणार आहे.

सनोफी फार्मामध्ये महिलादेखील सायंकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत काम करतील. तथापि, ही परवानगी दोन वर्षांसाठी असणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आता प्रदूषणावर नजर!

किनारी भागात 8 ठिकाणची ध्वनिमापन यंत्रणा मंडळाच्या नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण झाल्याक्षणी त्याची माहिती या नियंत्रण कक्षात मिळणार आहे. त्याशिवाय किनारी भागात आता नव्याने परवानी मागायला येणाऱ्या आस्थापनांत अशी ध्वनी कंपन मापन यंत्रणा बसविणे सक्तीचे केले आहे.

मोरजीसारख्या शांतता क्षेत्रात याची सक्ती आहे. ती यंत्रणाही ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या नियंत्रण कक्षाशी जोडली जाणार आहे. यामुळे नेमके ध्वनिप्रदूषण कोणी केले, हे शोधावे लागणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषण रोखण्यावर आमचा भर आहे.

चिंबलमध्ये पावसाळ्यानंतर दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा उखडले

सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल परिसरातील रस्त्यांची स्थिती बिकट आहे. पावसाळ्यानंतर खड्डे भरले असले तरी पुन्हा रस्ते खड्डेमय झालेले आहेत.

त्याशिवाय सांडपाणी रस्त्यावर सोडण्याचे प्रकार अधून-मधून या परिसरात घडत असल्याने नागरिकांना वारंवार पंचायतीकडे तक्रारी कराव्या लागत आहेत.

चिंबल परिसरात सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे सांडपाण्याच्या टाक्या भरल्या की पाणी रस्त्यावरून वाहून जाते. काही ठिकाणी सांडपाणी गटारातही सोडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.

विधानसभेसाठी पेडणेत SC राखीवता नको, धारगळ पंचायतीचा ठराव!

गेली ४७ वर्षे पेडणे मतदारसंघ SC साठी राखीव. हा राजकीय आणि सामाजिक असमतोल. पुढच्या विधानसभा निवडणुकीत पेडणे मतदारसंघ SC साठी राखीव नको. धारगळ पंचायतीचा ग्रामसभेत ठराव संमत.

नवीन बोरी पुलाला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर

लोटली ग्रामसभेत नवीन बोरी पुलाला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नागरिकांच्या बाजूनेच असल्याचा दावा सरपंचांनी केला. सरकारने हस्तक्षेप केल्यास विरोध करण्याची ग्रामस्थांची तयारी.

IIT ला ग्रामस्थांचा पाठिंबा

IIT च्या समर्थनार्थ रिवण ग्रामपंचायतीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाईंची सभेला उपस्थिती असून त्यांनी 100 टक्के नागरिकांनी IIT साठी संमती दर्शवल्याचे नमूद केले.

शितोळे तळे प्रकल्प, सरकारी अधिकाऱ्यांचा काढता पाय!

वेरे वाघुर्मे पंचायतीच्या खास ग्रामसभेत शितोळे तळ्याच्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यास आलेल्या जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी परतवले. अखेर अधिकाऱ्यांंनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला.

पेंचाक सिलाटमध्ये गोव्याची करीना सुवर्णपदकाची मानकरी

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या करीना शिरोडकरने पेंचाक सिलाटमध्ये 80 ते 85 वजन गटात सुवर्णपदक जिंकले. गोव्याचे दुसरे सुवर्ण, तर १८ एकूण पदक

Goa wins Gold medal in Pencak Silat

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसला रविवारपासून सुरवात झाली. कांपाल येथील इनडोअर स्टेडियमवर स्पर्धेचे उदघाटन केंद्रीयमंत्री आणि गोवा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटला.

Table Tennis

बीच फुटबॉलमध्ये पंजाबवर गोव्याचा दणदणीत विजय!

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुष बीच फुटबॉलमध्ये गोव्याने रविवारी पंजाबला १९-५ गोलफरकाने नमवून ब गटातून उपांत्य फेरी गाठली. कोलवा समुद्रकिनारी सुरू असलेल्या स्पर्धेत गोव्याने अगोदरच्या लढतीत ओडिशाचा १२-३ असा धुव्वा उडविला होता.

Beach Football

राज्यसभेच्या सदस्या आणि भारतीय ऑलंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी.उषा यांनी कांपाल येथे उपस्थिती लावली. यावेळी गोव्याच्या वेटलिफ्टिंग संघासोबत त्यांनी फोटो देखील काढला.

P. T. Usha in National Games Goa 2023

बोरी पुलाच्या मुद्द्यावरून लोटली ग्रामसभेत नागरिक आक्रमक

प्रस्तावित बोरी पुलाला विरोध करण्यासाठी लोटली ग्रामसभेत ग्रामस्थांंनी मोठी गर्दी केली. पुलासाठी होणारे भूसंपादन थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी.

Loutolim Gram Sabha

कारापूर-सर्वण ग्रामसभेला पाच पंचसदस्य गैरहजर

कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला पाच पंचसदस्य गैरहजर. ग्रामस्थांचाही अल्प प्रतिसाद. तासभर चाललेल्या ग्रामसभेत कचरा, मोकाट गुरे आणि श्वानांचा विषय चर्चेत.

Karapur Sarvan Gram sabha

वेरे वाघुर्मेची खास ग्रामसभा तापली!

वादग्रस्त शितोळे तळ्याच्या विषयावरुन बोलावलेली वेरे वाघुर्मेची खास ग्रामसभा तापली. लोकांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. प्रकल्प नकोच म्हणत ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम राहिले.

Verem Gram sabha

ऑल गोवा गरबा दांडिया स्पर्धा शिवोली मतदारसंघात ठेवण्यात आली होती. यावेळी आमदार दिलायला लोबोंनी शिवोली मतदारसंघातील नगरिकांसह गरब्याच्या गाण्यांवर ठेका धरत आनंद लुटला.

गोव्याचा राष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक पदकांचा विक्रम

राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याची दोन दशके

वर्ष ठिकाण सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

२०११ झारखंड ५ ५ ६ १६

२०१५ केरळ १ ३ ७ ११

२०२२ गुजरात ० ० ५ ५

२०२३ गोवा १ ४ १२ १७

(२८ ऑक्टोबरपर्यंत)

National Games Goa Medals

कोलवाळ येथील स्क्रॅप यार्डमध्ये पुन्हा आग

मुशीरवाडा, कोलवाळ येथील स्क्रॅपयार्डला रविवारी मध्यरात्री अडीजच्या सुमारास अचानक आग लागल्याने 80 हजाराचे नुकसान. म्हापसा अग्निशमन दलाने 20 लाखांची मालमत्ता वाचवली. पत्रावळी व द्रोणसाठी वापरला जाणाऱ्या पेपरला आग, आगीचे कारण अस्पष्ट.

कोणाला डावलण्याचा प्रश्‍‍नच नाही; सदानंद शेट तानावडे यांचे स्पष्टीकरण

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनावेळी स्वयंपूर्ण रथावर स्थान न दिल्याच्या ‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल सार्वत्रिकपणे घेण्यात आली आहे. ही बातमी भाषांतरित करून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांपर्यंत पोहोचविण्याची दक्षताही सत्ताधारी गोटातून घेण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी या प्रतिनिधीशी संपर्क साधून भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे, कोणालाच डावलण्याचा प्रश्नच येत नाही अशी सारवासारव केली आहे.

श्रीपाद नाईक यांना डावलले गेल्याची सार्वत्रिक भावना समाजमाध्यमावर उमटत आहे. अनेकांनी ‘गोमन्तक’चे वृत्त फेसबुक, इन्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून सार्वत्रिक केले आहे. भंडारी समाजाच्या सरचिटणीसपदी निवडून येऊनही पदाचा ताबा न स्वीकारलेले उपेंद्र गावकर यांनी सांगितले, भंडारी समाज भाजपच्या मागे उभा राहिल्याचा इतिहास आहे. आजही भाजपमध्ये भंडारी समाजाचे आमदार, नेते आहेत. नाईक यांना डावलले गेल्याचा विषय जेवढा समाजाचा आहे तेवढाच तो भाजपचा अंतर्गतही आहे.

जल, जमीन, जंगल वाचलेच पाहिजे; ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी निर्मला सावंत

गोव्‍याच्‍या भावी पिढीसाठी जल, जमीन आणि जंगल वाचले पाहिजे तरच गोवा वाचेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे पाण्‍याचा, जमिनींचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्‍यामुळेच राज्यातील सर्व आंदोलक ‘ग्रीन गोवा’ या एका छताखाली येत आहेत.

राष्ट्रीय स्पर्धेमुळे 600 ते 700 कोटींचा भुर्दंड; राज्य आर्थिक संकटात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी केवळ 15 कोटी रुपये देऊन बोळवण केल्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर याचना करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनीच मान्य केल्यानुसार स्पर्धेमुळे राज्याला आकस्मिक खर्च म्हणून 600 कोटी रुपयांचा भुर्दंड बसला आहे.

मलखांब मध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सर्व सुवर्णपदके महाराष्ट्र संघाला

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या एकूण पदकांच्या यादीत आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राच्या संघाने मलखांब स्पर्धेतील सर्वच्या सर्व नऊ सुवर्णपदके जिंकत आपला दबदबा कायम ठेवला आहे. मुंबईच्या रूपाली गंगावणे हिने ४ सुवर्णपदके जिंकून आपला जुना रेकॉर्ड मोडला आहे. स्पर्धेतील सांघिक विजेतेपदासह सर्वसाधारण विजेतेपदाबरोबर महिला आणि पुरुष गटातील सर्व सुवर्णपदके महाराष्ट्र संघाने जिंकली आहेत.

National Games 2023

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT