गोवा

Goa News Updates: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पावसाचं धूमशान; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Latest Updates in Marathi: जाणून घ्या गोव्यात घडणाऱ्या ताज्या घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पावसाचं धूमशान; नरकासूर भीजले

दिवाळीला आजपासून (28 ऑक्टोबर) सुरुवात झाली. ऐन दिवाळीतच पावसानंही हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नरकासूर भीजले.

दिवाळीच्या उत्साहावर पावसाचं सावट; डिचोलीतील व्यापारी वर्ग चिंतेत

वादळीवारा आणि ढगांच्या गडगडाटासह सोमवारी (28 ऑक्टोबर) संध्याकाळी डिचोलीत पावसानं हजेरी लावली. ऐन दिवाळीत पावसानं हजेरी लावल्यामुळे डिचोलीतील व्यापारी वर्ग चिंतेत आहे.

मोबाईल चोरी प्रकरणी संशयितास कळगुंट पोलिसांकडून अटक!

कळंगुट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या प्रकरणात संशयिताला अटक केली. पी.सी.देवानंद नाईक यांनी कळंगुट येथे मोबाईल चोरीच्या आरोपाखाली दिनेश (31) याला अटक केली. त्याच्याकडून यावेळी चार फोन जप्त करण्यात आले. कळंगुटचे पीआय परेश नाईक आणि उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरु आहे.

आसगाव घर मोडतोड प्रकरण, निलंबित पोलीस निरीक्षक प्रशल देसाई पुन्हा सेवेत रुजू!

आसगाव घर मोडतोड प्रकरणात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलेले पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांना गृह विभागाने पुन्हा सेवेत घेतले. त्यांच्या निलंबनामुळे या प्रकरणांमध्ये प्रोटोकॉलचे पालन करण्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते, न्यायालय आणि प्रशासकीय आदेशांची अंमलबजावणी करण्यावरुन पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करण्यात आले होते.

नागालँडचं शानदार कमबॅक; डी. निश्चलचं 'अर्धशतक'

गोव्याने 339 धावांचे लक्ष्य दिले असताना नागालँडने रणजी रॉफी प्लेट विभागीय क्रिकेट सामन्यात दुसऱ्या डावात 1 बाद 145 धावा केल्या. नागालँडला विजयासाठी 194 धावांची गरज आहे. डी. निश्चलचे नाबाद अर्धशतक.

गोवा शिक्षण मंडळाची विद्यार्थ्यांसाठी 'ही' योजना सुरु!

गोवा शिक्षण मंडळाची Interest Free Education Loan Scheme 2024-25 साठी 30 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यावर्षीपासून कर्ज हफ्त्याच्या कालावधीमध्ये वाढ करुन हप्त्याची रक्कम कमी करण्याचा महामंडळ विचार करत आहे. वेबसाईटवरील पूर्ण माहिती वाचून विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन चेअरमन गोविंद पर्वतकर यांनी केले.

दूधसागर पर्यटनाच्या वादात सावर्डेतील भाजपाचा अंतर्गत वाद उफाळला!

दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादात सावर्डे मतदारसंघातल्या भाजपातील अंतर्गत वाद उफळला. 'दूधसागर जीप ओससिएशनचा वाद मिटवण्यास स्थानिक आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ.गणेश गांवकरांना अपयश. यात मुख्यमंत्र्यांची काहीच चूक नाही'. सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाईंची आमदार गांवकरांवर जाहीरपणे टीका.

आमदार गणेश गावकरांमुळे दूधसागर पर्यटन हंगामाला विलंब!

जीटीडीसीचे अध्यक्ष आणि आमदार गणेश गावकर यांच्यामुळे दूधसागर टॅक्सी टूरला विलंब होत आहे. त्यांनी या समस्येचे निराकरण करुन कायमस्वरुपी तोडगा काढावा: विलास देसाई मंडळ अध्यक्ष सावर्डे

दूधसागर पर्यटन हंगाम, वन खाते पायाभूत सुविधांसह सज्ज : आमदार देविया

मुख्यमंत्र्यांकडून दोन दिवसा पूर्वी जीटीडीसी व टूर ऑपरेटरस मधील समस्यांचे निवारण. वन विभागाकडून दुधसागर पर्यटन हंगाम सुरु करण्यास परवानगी दिली आहे : आमदार देविया राणे

व्यापारी वर्गाचा फोंडा नगरपालिकेवर धडक मोर्चा

फोंडा मार्केट फुटपाथ विक्रेत्यांनी अडवले असून यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मार्केटमधील व्यापारी वर्गाने पालिकेवर धडक मोर्चा काढला. आज ( दि. २८ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी होणाऱ्या नगर पालिकेच्या बैठकीत यावर निर्णय घेणार असल्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डिचोली आयडीसीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले; पोलिसांकडे गस्त ठेवण्याची मागणी

'आयडीसी'त चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि म्हणूनच आज (२८ ऑक्टोबर) रोजी आयडीसीमधील उद्योजकांची डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली. निवेदन सादर करत त्यांनी पोलिसांना गस्त ठेवण्याची मागणी केलीये.

डिचोलीत विक्रेत्यांना हटवले!

डिचोली पालिकेची सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रोजी कारवाई. डिचोली बाजारात रस्त्याच्या बाजूने बसणाऱ्या विक्रेत्यांना पालिकेने कारवाई दरम्यान हाकलले. विक्रेत्यांना गणपती पूजन मंडपात जागा. कायमची जागा देण्याची विक्रेत्यांची मागणी.

15 नोव्हेंबर पर्यंत 4 लाख भाजप सदस्य तयार करणार तानावडेंचे प्रतिपादन

भाजपचे राज्यभरात ३ लाख ३२ हजार सदस्य आहेत. वाळपई सर्वात जास्त तर पेडण्यात कमी सदस्य असून, १५ नोव्हेंबर पर्यंत ४ लाख सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आम्ही ठरवले आहे. ११ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बूथ स्थरीय समितीच्या निवडणुका होतील अशी माहिती राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT