गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग -4 ए वरील बाणस्तारी पूल रविवार 28 जानेवारी रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या दोन तासांसाठी वाहतुकीकरीता बंद ठेवला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खाते-फोंडा विभागाने त्याचा आदेश जारी केला असून त्यावेळेत पुलाची तपासणी करण्यात येणार आहे. जनतेने, वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी असे कळविले आहे.
हणजूणमध्ये पर्यटकांच्या कारचा अपघात झाल्याचे समजतेय. या घटनेत कुणी जखमी झालंय का याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकली नाही
डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या कार्यकारी समिती अध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर आता डिचोलीतील समर्थकांचाही मगोला रामराम केलाय. सावळ यांनी पत्रकार परिषदेत मगोच्या ढवळीकर बंधूवर टीका केली आहे. ढवळीकर बंधूंना फक्त स्वतःचाच विचार असून लवकरच त्यांची काळी कृत्ये उघडी पाडणार असल्याचा इशारा नरेश सावळ यांनी दिलाय.
पर्वरीतील एका बांधकाम साईटवरून स्टील आणि लोखंडी रॉड चोरल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी 4 जणांना अटक केली. यात तीन महिला व एक पुरुष संशयिताचा समावेश. त्यांच्याकडून 1 लाखाचा चोरीचा मुद्देमाल व चोरीसाठी वापरलेली गाडी जप्त केली. पुढील तपास सुरू
गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यात मिझोरामवर ३०० धावांनी प्रचंड मोठा विजय नोंदविला. पूर्वा भाईडकर हिने ३ धावांत ६ गडी बाद करून मिझोरामचा डाव फक्त ६ धावांत गुंडाळला, त्यापूर्वी पूर्वजा वेर्लेकरचे शतक (१०९) व पूर्वाच्या अर्ध शतकामुळे (६१) गोव्याच्या ७ बाद ३०६ धावा.
सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्याच्या नूतनीकरण व सौदर्यीकरण कामाची आज (26 जानेवारी) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.
अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी गुन्हे शाखेने पर्रा येथे टाकलेल्या छाप्यात स्टॅन्ली कार्व्हालो (50, मुंबई) याला अटक केले. त्याच्याकडून एम्फेटामाइन आणि एक्स्टसी टॅब्लेट असा तब्बल 2.50 लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पुढील कारवाई सुरू.
भारतीय निवडणूक आयोगाने 24 जानेवारी 2024 रोजी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाला 'प्रादेशिक पक्ष' म्हणून मान्यता दिली. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ही सर्व आरजी समर्थकांसाठी आणि गोवेकरांसाठी आनंदाची बाब आहे. आमच्या आगामी निवडणुकांसाठी फुटबॉल हे आमचे चिन्ह आणि आरजीची ओळख असेल. मनोज परब यांची माहिती
क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन याने श्री बोडगेश्र्वर जत्रोत्सवानिमित्त देवदर्शन घेतले.
हणजूण येथे लिटल एंजल शाळेसमोर गुजरातमधील पर्यटकाच्या कारचा अपघात. गाडीवरील ताबा सुटल्याने कार कंपाऊंडला धडकून पलटी झाली. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही.
75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी राज्यभरात 75 वायफाय हॉटस्पॉट्स सुविधा उभारणार असल्याची केली घोषणा.
बॉस्युएट सिल्वा
किरण पौडवाल
सिद्धांत शिरोडकर
मनोज म्हार्दोळकर
जॉन फर्नांडिस
चेतन सावलेकर
अँथनी डिसोझा
भूषण सावईकर
डॉ. प्रणव भट
श्रेयस डिसिल्वा
विश्राम बोरकर
संजीत रॉड्रिग्स
अजित रॉय
स्वेटीका सच्चन
एम. विरसिंग
निधीन वाल्सन
अभिषेक धानिया
श्रीवेदी दूषण
सौरभकुमार
जेबेस्टीन के
भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकशाही असलेला देश आहे. हा दिवस पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मला अभिमान आहे की भारतासारख्या लोकशाही देशाचा ममी नागरीक आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे वक्तव्य
इथे पहा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीहून पुरस्कारांची घोषणा झाली असून, वाहतूक पोलिस विभागाचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना यंदाचे विशिष्ट राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झाले आहे. आज दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या शिवाय एमटी विभागाचे पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षक विभागाचे पोलिस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. पोलिस दलातील या अधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या या पदकांमुळे ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट बनली आहे. तसेच दलातील उत्साह अधिक वाढणार आहे. देशभरात १,१३२ पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती पदक १०२ जणांना तर ७५३ जणांना उत्कृष्ट सेवा पदक मिळणार आहे.
देशातील १७ राज्ये थंडी आणि दाट धुक्याच्या विळख्यात आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये कोल्ड-डे आहेत. ‘आयएमडी’ ने गुरुवारी येथे कडाक्याच्या थंडीबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम गोव्याच्या हवामानावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सियस इतके खाली घसरले असून येत्या दोन दिवसांत आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर आयोजित ‘आयआयटीएफ’ २०२३ मध्ये गोव्याच्या दालनाला थीमॅटिक (विषयगत) सादरीकरणातील सर्वोत्तमतेसाठी विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्कारासाठी मिळालेले प्रमाणपत्र व चषक माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी ॲडव्हर्टायजिंग असोसिएटस्चे संस्थापक केदार धुमे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सुपूर्द केले. गोव्याच्या दालनात ‘स्वयंपूर्ण कार्यक्रम २.०’ वर प्रकाशझोत टाकण्यात आला, जे व्यापार महोत्सवाच्या वसुधैव कुटुंबकम या आशयाशी जुळणारे होते.
कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे फळ म्हणजे मिळालेला पद्मश्री पुरस्कार होय. मी संजय पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांचे कार्य प्रेरक आहे.
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर संजय पाटील यांनी गोमन्तक टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या ३५ वर्षांचे श्रम फळाला आले. मला मिळालेला सन्मान हा गोव्यातील तमाम शेतकऱ्यांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
फोंडा तालुक्यातील शिलवाडा सावईवेरे येथील शेतकरी संजय पाटील यांना पद्मश्री जाहीर. पाटील यांनी आपल्या कुळागरात किलोमीटरपेक्षा जास्त लांब भुयारे मारुन डोंगरावरुन पाणी आणण्याची किमया केली आहे.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 97.54
Panjim ₹ 97.54
South Goa ₹ 97.11
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.10
Panjim ₹ 90.10
South Goa ₹ 89.68
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.