Goa Live Updates 22 November 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: शॅक परवाना शुल्क भरण्याची मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवली

Goa Breaking News 22 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज

Kavya Powar

शॅक परवाना शुल्क भरण्याची मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवली

गोव्यात सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून पर्यटकही गोव्यात उतरू लागले आहेत. पर्यटकांची पसंती ही हॉटेल्स सोबतच शॅक मालकांच्या मागणीनुसार पर्यटन विभागाने शॅक परवाना शुल्क भरण्याची मुदत 17 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

कुडचडेत ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात; दोघेजण जखमी

कुडचडे मार्केट येथे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात एका कार चालकाने 2 दुचाकींना दिली धडक; दोघेजण जखमी. अधिक तपास सुरू

तेलंगणात घरफोड्या, मुसक्या आवळल्या गोव्यात; 'असा' होता सगळा चोरीचा मामला

तेलंगणा येथे घरफोडी प्रकरणात सहभागी असलेल्या चोरट्याला बागा- कळंगुट येथे पकडण्यात आल्याची माहिती मिळतेय.

या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तेलंगणामधील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेला आरोपी बागा परिसरात फिरत असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना तेलंगणा पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी सतर्कपणे किनारपट्टीभागासह बागा परिसरात शोध मोहीम सुरु केली. याच दरम्यान तेलंगणा पोलीस पथकही गोव्यात दाखल झाले आणि कळंगुटव व तेलंगणा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आरोपीला बागा येथे यशस्वीरित्या पकडले.

गव्याच्या धडकेत सुळकर्णे पिर्ला येथील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू; रात्री कामावरून घरी परतताना घटना

गव्याने धडक दिल्याने सुळकर्णे पिर्ला येथील एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. सदानंद गावकर असे या तरूणाचे नाव आहे.

सदानंद गावकर हे सुळकर्णे पिर्ला येथीलच रहिवासी होते. ते एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मंगळवारी रात्री ते कामावरून घरी परतत असताना गावाजवळ आल्यावर रस्त्यावरच त्यांना गव्यांचा कळप दिसला.

बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांकडे राहणार, सिक्वेरांना कोणते खाते? समोर आली महत्वाची अपडेट

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ बंडखोर आमदारांपैकी एकाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाने पूर्ण केले आहे. काब्राल यांचा राजीनामा घेतल्यानंतर रविवारी आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

सिक्वेरा यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती. दरम्यान, याबाबत आता माहिती समोर आली आहे.

नाणूस येथील अपघातात तरुण गंभीर जखमी

नाणूस सत्तरी येथे दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात. यामध्ये दुचाकीस्वार गजानन देसाई (22, अडवई, सत्तरी) गंभीर जखमी. वाळपई पोलीस घटनास्थळी दाखल. गजाननला उपचारासाठी GMC मध्ये दाखल करण्यात आले. सदर कार महाराष्ट्रातील असल्याची माहिती.

ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभूगावकर यांचा सन्मान

प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्‍यीक स्‍व. चंद्रकांत केणी यांची ८९ वी जयंती रविवार २६ नोव्‍हेंबर रोजी साजरी करण्‍यात येणार असून यानिमित्त सायंकाळी ५ वा. मडगाव पालिका सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात ज्‍येष्‍ठ पत्रकार प्रमोद प्रभूगावकर यांना चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे.

गोव्यासह महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून 4 दिवस पावसाची शक्यता; IMD चा अंदाज

मॉन्सूनने माघार घेऊन बराच काळ लोटलेला असला तरी बदलत्या हवामानामुळे पावसाचा हंगाम संपल्यानंतरही अचानक पावसाला अनुकूल स्थिती झाल्यानंतर पाऊस कोसळतो.

आगामी दिवसात 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या काळात गोव्यासह महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

रेडेघाटी-सत्तरीत 'हिट-अँड-रन' एकजण जखमी

बोलेरो पिकअपची मोटारसायकलला धडक. कोपर्डे-सत्तरी येथील साईप्रसाद नाईक अपघातात जखमी. अज्ञात चालक घटनास्थळावरून पसार. नाईक यांना वैद्यकीय उपचारासाठी जीएमसीमध्ये हलवण्यात आले आहे.

सनी देओलच्या 'या' चित्रपटानंतर दोन फोन कॉल आले... एक अंडरवर्ल्डमधून आणि दुसरा 'मातोश्री'वरून...

अभिनेता सनी देओल याच्या एका चित्रपटामुळे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवैल यांना दोन फोन कॉल आले होते. त्यातील एक कॉल आला होता अंडरवर्ल्डमधून तर दुसरा फोन कॉल होता थेट 'मातोश्री'वरून.

गोव्यात सुरू असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इन कॉन्व्हर्सेशन या संवाद सत्रात ही माहिती समोर आली.

कला अकादमी येथे रंगलेल्या या कार्यक्रमात सनीसोबत काम केलेले राहुल रवैल, राजकुमार संतोषी आणि अनिल शर्मा हे दिग्दर्शक सहभागी झाले होते. या चौघांच्या संवादातून सनीच्या फिल्मी कारकिर्दीचा कॅनव्हाज प्रेक्षकांसमोर उलगडला गेला.

‘एसटी’ आरक्षण 2027 मध्ये मिळणार: सभापती तवडकर

राज्यात अनुसूचित जमातीतील काहीजण उगाचच ओरड करत आहेत. आरक्षणाबाबत ठोस पावले उचलण्यात आली आहेत. सरकारने 2027 पर्यंत हे आरक्षण लागू करण्याचे स्पष्ट केले असताना लोकसभा निवडणुकीपूर्वी देण्याची केलेली मागणी म्हणजे सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत.

चर्चिल आलेमाव हे चंद्रावरच निवडणूक जिंकू शकतात; कारण चंद्रावर कोणीही विरोधक नसेल. चर्चिल म्हणजे मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपकडून निवडलेले उमेदवार: खासदार फ्रान्सिस सार्दिन

करन जोहर पहिल्या रांगेत कसा?; 'इफ्फी'चा बॉलीवूड तमाशा करून टाकला...; आयोजकांवर ज्युरी भडकले

 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रंगारंग कार्यक्रमात उद्घाटन झाले. तथापि, उद्घाटनानंतरच्याच दिवशी 'इफ्फी'च्या एका प्रमुख ज्युरींपैकी एक असलेल्या व्यक्तीने या सोहळ्यावर टीका केली आहे.

इफ्फीचा उद्घाटन सोहळा हा बॉलीवूड तमाशा होता. सर्व नौटंकी सुरू होती, असे म्हणत त्यांनी आयोजकांना फटकारले आहे. अरविंद सिन्हा असे या ज्युरींचे नाव आहे. ते इंडियन पॅनोरमा नॉन-फिचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आहेत.

'इफ्फी'त आज, बुधवारी विजय सेतुपती, के. के. मेनन, बाबिल खान, मधूर भांडारकर, आर. माधवन साधणार संवाद

आयनॉक्स पणजी

सकाळी 9 ---- इलेजीज ------ आयनॉक्स स्क्रीन 1

सकाळी 9.15 ---- द लास्ट बर्थडे -------- आयनॉक्स स्क्रीन 3

सकाळी 9.30---- मेजर्स ऑफ मेन --- आयनॉक्स स्क्रीन 4

सकाळी 10 ---- वध --- आयनॉक्स स्क्रीन 2

सकाळी 11.15 ---- क्लोज युअर आईज ---- आयनॉक्स स्क्रीन 1

सकाळी 11.45 ---- हॉफ्फमन्स फेअरी टेल्स ---- आयनॉक्स स्क्रीन 3

दुपारी 12 ---- भंगार / श्री रूद्रम ---- आयनॉक्स स्क्रीन 4

दुपारी 12.45 ---- Baruar Xongxar / लाईफ इन लूम --- आयनॉक्स स्क्रीन 3

दुपारी 2.30 ---- स्नो लेपर्ड ---- आयनॉक्स स्क्रीन 1

दुपारी 3 ---- फ्रॅजिल ब्लड ---- आयनॉक्स स्क्रीन 4

दुपारी 3.30 ---- फेरेश्ते ---- आयनॉक्स स्क्रीन 3

दुपारी 4.30 ---- माऊ : द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव / मंडळी

सायं 5 ---- कडक सिंग ---- आयनॉक्स स्क्रीन 1

सायं 6 ---- ओकॅरिना ---- आयनॉक्स स्क्रीन 4

सायं 6.15 ---- द व्हिलेज ---- आयनॉक्स स्क्रीन 3

रात्री 8 ---- द सी अँड सेव्हन व्हिलेजेस / अर्धांगिनी ---- आयनॉक्स स्क्रीन 2

रात्री 8.15 ---- द शुगर एक्सपेरिमेंट ---- आयनॉक्स स्क्रीन 4

रात्री 8.30 ---- अॅनाटॉमी ऑफ फॉल ---- आयनॉक्स स्क्रीन 1

रात्री 9 ---- कमांडंट ---- आयनॉक्स स्क्रीन 3

रात्री 10.30 ---- वुई हॅव नेव्हर बीन मॉडर्न ---- आयनॉक्स स्क्रीन 4

कला अकादमी

सकाळी 10.30 ---- मास्टर क्लास - फिल्म डायरेक्शन - ब्रिलांटे मेंडोझा (फिलिपाईन्सचे दिग्दर्शक, निर्माता)

सकाळी 12.30 ---- इन कॉन्व्हर्सेशन ---- विजय सेतुपती, खुशबू सुंदर

दुपारी 2.30 ---- इन कॉन्व्हर्सेशन ---- दिग्दर्शक मधूर भांडारकर आणि तरण आदर्श

सायंकाळी 5 ---- इन कॉन्व्हर्सेशन ---- के के मेनन, आर. माधवन, बाबिल खान, दिव्येंदू शर्मा, तान्या बामी, शिव रवैल, आयुष गुप्ता

मॅक्विनेझ पॅलेस

सकाळी 11 - शेरशाह (हा चित्रपट ऑडियो डिस्क्रिप्शनसह दाखवला जाईल.)

दुपारी 1.45 ---- थंडर्स

दुपारी 3.30 ---- गॉलियाथ

सायं 5.30 ---- अझिज

सायं 7.30 ---- बीस साल बाद

अशोका ऑडी

सकाळी 10 ---- व्हेन द सीडिंग्ज ग्रो

सम्राट ऑडी

सकाळी 10 ----- वेक मी

दुपारी 2 ---- अडेंट्रो

ओपन एअर स्क्रीनिंग

मिरामार बीच

सायं 7 ---- भारत है हम - भाग 4

सायं 7.20 ---- ह्युगो

हणजुण (Anjuna) बीच

सायं 7 ---- भारत है हम - भाग 5

सायं 7.20 ---- पस इन बूट्स

रविंद्र भवन, मडगाव

सायं 7 ---- भारत है हम - भाग 6

सायं 7.20 ---- रॉकेट्री : द नंबी इफेक्ट

आयनॉक्स पर्वरी

सकाळी 10 ----- क्लॅप युअर हँड्स ---- आयनॉक्स स्क्रीन 1 पर्वरी

सकाळी 10.15 ---- यान्निक ---- आयनॉक्स स्क्रीन 2 पर्वरी

सकाळी 10.30 ---- कालेव्ह ---- आयनॉक्स स्क्रीन 3 पर्वरी

सकाळी 10.45 ---- अंटार्क्टिका कॉलिंग ---- आयनॉक्स स्क्रीन 4 पर्वरी

दुपारी 1 ---- द इन्व्हिझिबल स्टेप्स थ्रु लॅटिन अमेरिका ---- आयनॉक्स स्क्रीन 1 पर्वरी

दुपारी 1.15---- मोरो ---- आयनॉक्स स्क्रीन 2 पर्वरी

दुपारी 1.30 ---- द रीयल जॉब ---- आयनॉक्स स्क्रीन 3 पर्वरी

दुपारी 1.45 ---- द लँड व्हेअर विंड्स स्टूड स्टील ---- आयनॉक्स स्क्रीन 4 पर्वरी

दुपारी 4 ----- असोग ---- आयनॉक्स स्क्रीन 1 पर्वरी

दुपारी 4.15---- इमान ---- आयनॉक्स स्क्रीन 2 पर्वरी

दुपारी 4.30 ---- द प्राईझ ----- आयनॉक्स स्क्रीन 3 पर्वरी

दुपारी 4.45 ---- ब्लॉकेड ---- आयनॉक्स स्क्रीन 4 पर्वरी

सायं 7 ---- लुबो ---- आयनॉक्स स्क्रीन 1 पर्वरी

सायं 7.15 ---- रूम 999 ---- आयनॉक्स स्क्रीन 2 पर्वरी

सायं 7.30 ---- फॉर्च्युन फॉर ऑल ---- आयनॉक्स स्क्रीन 3 पर्वरी

रात्री 7.45 ---- ओट ---- आयनॉक्स स्क्रीन 4 पर्वरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT