Chairman Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन', तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडामोडी

Marathi Latest Updates: मराठीमध्ये जाणून घ्या गोव्यात घडणाऱ्या घडामोडी

Akshata Chhatre

'...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा

जर 'अशा' वृत्तींना सरकार आणि पक्ष थारा देणार असेल तर मान सन्मानासाठी आणि गोव्याच्या जनतेसाठी मी सभापतीपदाचा राजीनामा देऊन मोकळा होईन. उटाच्या व्दिशतकपूर्ती कार्यक्रम आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सभापती रमेश तवडकरांचा सरकार आणि भाजपला थेट इशारा.

कॅश फॉर जॉब प्रकरणी प्रिया यादवाला 3 दिवसांची पोलीस कोठडी

कॅश फॉर जॉब प्रकरणी प्रिया यादव हिच्या पोलिस कोठडीत वाढ. डिचोलीच्या न्यायालयाकडून आणखी तीन दिवसांचा रिमांड. सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी रिमांडसाठी न्यायालयात केले होते हजर.

कॅश फॉर जॉब प्रकरणात गुंतलेल्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री सावंतांची तंबी!

कॅश फॉर जॉब प्रकरणात गुंतलेल्यांना सरकार सोडणार नाही. त्यांची मालमत्ता जप्त करुन फसवणूक झालेल्या लोकांचे परत केले जातील, अशी तंबी मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. तसेच, आतापर्यंत 18 जणांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजप सरकार भ्रष्टाचाराला कधीही पाठबळ देत नाही, नरेंद्र सावईकरांनी स्पष्टच सांगितले!

भाजप सरकार भ्रष्टाचाराला कधीही पाठबळ देणार नाही. सरकारी नोकऱ्यांची आमिषे दाखवून लोकांना फसवलेल्या 18 जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांना सरकार अजिबात सोडणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

कला अकादमी टास्क फोर्स समिती आढावा बैठक; आठवड्याभरात सादर होणार अहवाल

टास्क फोर्स समितीची आढावा बैठक मंगळवारी (दि. १२ नोव्हेंबर) रोजी पार पडली. २ दिवस कला अकदामीच्या ध्वनी, लाईट आणि आर्किटेक्टचे रॉजर ड्रेगो, शीतल तळपदे आणि राजन भिसे यांच्याकडून परीक्षण करण्यात आले. एका आठवड्यात ते अहवाल सादर करतील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी दिली.

जॉब स्कॅममधल्या दीपाश्रीला ४ दिवसांची पोलीस कोठडी

कॅश फॉर जॉब घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या दीपश्री सावंत गवस हिला कोर्टाने एकूण ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही दिवसांच्या ब्रेकनंतर गोव्यात पुन्हा 'यलो अलर्ट'

IMD ने १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर या दोन्ही दिवसांसाठी गोव्यात यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान राज्यात विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वादळ (30-40 किमी प्रतितास) होण्याची शक्यता विभागाकडून वर्तवली गेली आहे.

कडक पोलीस बंदोबस्तात कुचेली येथील बेकायदेशीर घरांवर कारवाई सुरु

बेकारदेशीर घरे पडण्याची नोटीस मिळाल्यानंतर कुचेली, म्हापसा येथील सरकारी जमिनीवर बांधलेली घरे पडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या ठिकाणी सध्या तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय.

कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी मंडळींची पायीवारी

कार्तिकी एकादशी निमित्त उस्ते सत्तरी येथील श्रीराम वारकरी मंडळीतर्फे उस्ते ते विठ्ठलापूर साखळी पायीवारी.

कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात आणखीन एक अटक!!

सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित श्रुती प्रभुगावकरला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून अटक करण्यापूर्वी तिच्या नावे लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT