Goa Breaking News 12 November 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: वागातोर अपघातासंबंधी महत्वाची अपडेट..

Goa Breaking News 12 November 2023: गोव्यातील आजच्या ताज्या घडामोडी...

Kavya Powar

वागातोर अपघातासंबंधी महत्वाची अपडेट, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वागातोर येथे घडलेल्या अपघातप्रकरणी हणजूण पोलिसांनी कारचा चालक सचिन वेणू गोपाल कुरूप (42, रा. आसगाव, मूळचा पुणे) याला बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल अटक केली आहे. या अपघातात मायोर रोमा रिसॉर्टच्या रेमीडिया अल्बुकर्क (57) यांचा मृत्यू झालाय आणि त्याचे कर्मचारी शिव मंगल दिंडो (22) आणि रूपा पारस (31) हे जखमी झाले आहेत.

वागातोर अपघातासंबंधी महत्वाची अपडेट, ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनला घेराव

दिवाळीच्या पूर्वरात्री म्हणजेच शनिवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान वागातोर येथे जो दुर्दैवी अपघात घडला त्या अपघातासंबंधी एक अपडेट हाती येतेय. घडलेल्या अपघाताचा हणजूण पोलिसांनी पंचनामा केला असला तरी या पंचनाम्याविषयी ग्रामस्थांनी संशय व्यक्त केलाय.

आज म्हणजेच रविवारी (12 नोव्हेंबरला) सकाळी ग्रामस्थांनी हणजूण पोलीस स्टेशनला घेराव घातला.

नॅशनल गेम्स मधील गोव्याच्या 92 पदक विजेत्यांमध्ये केवळ 28 गोमंतकीय खेळाडू

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने चांगली कामगिरी केली. गोव्याने या स्पर्धेत एकूण 92 पदके जिंकली. हे आत्तापर्यंतचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील गोव्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.

तथापि, यंदाच्या स्पर्धेत गोव्याकडून खेळलेल्या गोव्याच्या एकूण पदक विजेत्यांमधील केवळ 30.43 टक्के खेळाडूच गोमंतकीय होते.

92 पदकांपैकी फक्त 28 पदके गोमंतकीय खेळाडूंनी जिंकली आहेत. बाकीची पदके गोव्याकडून खेळणाऱ्या इतर राज्यातील खेळाडूंनी मिळावली आहेत. गोव्याच्या पदक विजेत्यांमध्ये 17 महिला होत्या आणि उर्वरित सांघिक स्पर्धा होत्या.

गोव्यात नरकासुराचे दहन; 'व्होकल फॉर लोकल'चे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोव्यात नरकासुराचे पुतळे बनवण्याची आणि दीपावलीला जाळण्याची परंपरा आहे. वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतिक म्हणून नरकासूर रूपातील प्रतिकृतीचे दहन केले जाते. यानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी नरकासूर स्पर्धादेखील होतात.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, दिवाळीच्या दिव्यांनी राज्यातील एकात्मतेच्या भावनेने लोकांचे मन आणि हृदय उजळून निघावे. गोव्याचा विकास झपाट्याने होत आहे. गोव्यातील जनतेने सुशासनाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

राज्यात 'वोकल फॉर लोकल'ला महत्त्व देऊन स्वयंपूर्ण गोव्याच्या खऱ्या अर्थाने घरगुती उत्पादकांना पाठिंबा देण्यासाठी, उत्सव साजरा करण्यासाठी स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर अधिक जोर देऊया.

गोव्यातील महामार्गांवर वेगमर्यादा निश्चित्त होणार; 70 किमी प्रतितास टॉप स्पीड शक्य?

गोव्यातील महामार्गांचे चौपदरीकरण आणि सहा पदरी करण्यासाठी 14000 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला असला तरीही 80 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहन चालविण्याची वेगमर्यादा अद्याप नाही.

चांगल्या रस्त्यांमुळे प्रवास वेगाने व्हावा यासाठी वेगमर्यादा असते. तथापि, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला 80 किलोमीटर प्रतितास वेग मर्यादेला परवानगी देणे व्यवहार्य नाही, असे वाटते.

गोव्यातील महामार्गांच्या जाळ्याचा विस्तार 2016 पासून सुरू झाला आहे. तथापि, गावातील रस्ते महामार्गांशी जोडले गेले, तसेच सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी उपलब्ध जागा नसल्यामुळे हायवेवरील वाहनांची वेग मर्यादा वाढण्यास ब्रेक लागला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोठंबी येथील वडिलोपार्जित घरात साजरी केली दिवाळी...

Cm Pramod Sawant
Cm Pramod Sawant

दिव्यांग मुलीच्या मृत्यूप्रकरणी धर्मगुरु-नन यांची पणजी जिल्हा सत्र न्यायालयातर्फे दोषमुक्तता

जुने गोवा येथील सेंट झेविअर अकादमी प्रशिक्षण केंद्रात 7 वर्षीय दिव्यांग मुलीच्या मृत्यूप्रकरणात संशयित असलेल्या धर्मगुरु आणि नन यांना पणजी जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष जाहीर केले आहे.

या फेब्रुवारीमध्ये प्रशिक्षण केंद्रात 7 वर्षीय मुलीचा गरम पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झाला होता. धर्मगुरु आणि नन यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप करण्यात आला होता.

धक्कादायक! एकीकडे दिवाळीची धामधूम तर वागातोरमध्ये गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू

दिवाळीनिमित्त सर्वत्र धामधूम आणि उत्साहाचे वातावरण असतानाच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वागातोरमध्ये एका महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. वागातोरमध्ये असलेल्या मायोर रोमा रिसॉर्ट (Maior Roma Resort) च्या मालकीण रेमाडिया मारिया यांचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, 57 वर्षीय रेमाडिया मारिया आपल्या रिसॉर्टच्या दारात फोनवर बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात एक SUV कार आली जी थेट रेमाडिया यांच्या अंगावर गेली.

सदर घटना इतक्या जलद झाली रेमाडिया यांना प्रसंगावधान राखण्याची संधीच मिळाली नाही. या कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. कार HR-13-G- 1831 या क्रमांकाने नोंदणीकृत असून चालक बाहेरचा आहे. कार चालवत असताना चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बेकायदेशीर बांधकामासाठी वाळूच्‍या टेकड्यांचा विद्‌ध्‍वंस

सेर्नाभाटी येथील किनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकाम उभारले जात असून त्‍यासाठी वाळूच्‍या टेकड्यांचा विध्‍वंस केला गेला आहे, अशी तक्रार कोलवा सिव्‍हीक फोरमच्‍या सचिव आणि पर्यावरण चळवळीतील आघाडीच्‍या कार्यकर्त्या ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी गाेवा किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडे केली आहे.

‘म्हादई प्रवाह’चे कार्यालय लवकरच गोव्यात

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने स्थापन केलेल्या म्हादई - प्रवाह प्राधिकरणाचे पूर्णवेळ कार्यालय गोव्यात सुरू होत आहे. यासाठी पर्वरी येथील जलस्त्रोत खात्याच्या इमारतीचा तिसरा मजला खाली करण्यात आला असून या ठिकाणी हे प्रवाहाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. लवकरच ते पूर्णवेळ कार्यालय सुरू होईल, अशी माहिती आहे.

खून प्रकरणातील सुनावणीच्या विलंबामुळे महिलेला जामीन

झेफेरिनो बार्रेटो याच्या खूनप्रकरणी कोठडीत असलेल्या युगांडाची संशयित मिनामू अफूसा (24) या महिलेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. घटना होऊन अडीच वर्षे उलटली तरी आतापर्यंत एकाच साक्षीदाराची जबानी नोंद झाली आहे.

शेतजमिनी न विकता श्रम करून उत्पादन घ्या : कृषिमंत्री रवी नाईक

पेडणे, आमच्या पूर्वजांनी घाम गाळून शेती केली. अशा शेतजमिनी विकून न टाकता त्यात श्रम करून उत्पादन घ्या व भावी पिढीसाठी सांभाळून ठेवा. लोकांना यापुढे घरपोच रेशन धान्य देण्यात येईल. फुकट मिळते म्हणून रिकामे न राहता शेती करायलाच हवी.

कुळ हक्क कुळांना मिळायला हवा व कुळांना जमिनी मिळतात की नाही यावर आमदारांनी लक्ष ठेवावे, असे प्रतिपादन नागरी पुरवठा तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले. ते पेडणे तालुका नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याच्या नव्या कार्यालयाचे उद्‍घाटन केल्यानंतर बोलत होते.

इफ्फीत ‘गाला प्रीमियर्स’चे आकर्षण कायम

यंदाच्‍या 54 व्या इफ्फीत ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सीरिज रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाही  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ‘गाला प्रीमियर्स’ची बहुप्रतीक्षित दुसरी आवृत्ती सादर करणार आहे. रसिकांसाठी ही मोठी मेजवानी असेल.

महोत्सवाची मूलभूत तत्वे कायम राखत चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षकांशी जोडण्यासाठी, जागतिक सिनेमॅटिक कलात्मकता साजरी करण्यासाठी आणि निवडक निखळ चित्रपट सादर करण्याच्या दृष्टीने ‘गाला प्रीमियर्स’ या विभागाची आखणी केली आहे.

‘त्यांना’ १० वर्षांचे वेतन कसे द्यावे? ‘प्रदूषण नियंत्रण’ पेचात

पणजी, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सेवा समाप्तीचा आदेश प्रोबेशन काळात दिलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावे आणि १० वर्षांचे वेतन द्यावे, या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयासमोर अनेकदा वेगवेगळ्या याचिकांच्या रूपाने सुनावणीस आलेला असा हा विषय आहे.

मये पंचायतीला नवीन सरपंचांचे वेध

डिचोली, चायतीला आता नवीन आणि विद्यमान पंचायत मंडळाच्या कार्यकाळातील तिसऱ्या सरपंचांचे वेध लागले आहेत.

सत्ताधारी गटातील अंतर्गत करारानुसार सुवर्णा चोडणकर यांनी दिलेला सरपंचपदाचा राजीनामा पंचायत खात्याने मंजूर केला आहे. त्यामुळे रिक्त सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यासाठी मंगळवारी (ता.१४) सकाळी १०.३० वा. पंचायत मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे.

...तर गोव्यात वेगवान राजकीय बदल

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समाधानकारक नसतील, तर गोव्यातील भाजप मंत्रिमंडळात लागलीच बदल करून लोकसभा निवडणुकांसाठी नव्याने रणनीती आखली जाईल. त्यामुळे सत्ताधारी नेते या निकालांकडे धास्तीपूर्वक लक्ष देऊन आहेत. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणूनच पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT