केजरीवाल लोकसभा निवडणुका डोळ्या समोर ठेऊन पक्ष मजबूत करण्यात व्यस्त आहेत. यापूर्वी गोवा दौरा अचानक रद्द केल्यानंतर हा दौरा येत्या 18, 19 आणि 20 जानेवारीला नियोजित असल्याचे सांगितले जात आहे.
क्राईम सीनवर सुचना सेठने ज्या कात्रीने आपला हात कापला होता ती कात्री पोलिसांना दाखवली. त्याशिवाय ४ वर्षांच्या मुलाला कसे बॅगेत घातले तेही प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलाचा खून आपण केला नसल्याचा मात्र केला अजब दावा.
संशयित आरोपी सूचना सेठ ही कालपर्यंत हॉटेलमधील क्राईम सीन रीक्रिएट तयार करण्याकरिता तयार नव्हती मात्र आज म्हणजेच १२ जानेवारीला सूचनाने सीन रीक्रिएट तयार करण्याकरिता सहमती दर्शवली असून कळंगुट पोलीस तिला घेऊन हॉटेलकडे रवाना झाले आहेत
भुवनेश्वर येथे सुपर कप फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी देताना एफसी गोवाने इंटर काशी संघाला २-१ फरकाने नमविले. विजयी संघाच्या नोआ सदोई व कार्लोस मार्टिनेझ यांचे गोल.
पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी सुनावणीला गैरहजर राहण्यास मोन्सेरात दाम्पत्याला सूट. मडगाव कोर्टातर्फे आमदार बाबूश यांना 3 तर जेनिफर मोन्सेरात यांना 2 महिन्यांची सूट मंजूर. प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारीला असल्याची माहिती.
पर्वरी येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात चंडीगडविरुद्ध गोव्याच्या सुयश प्रभुदेसाई याचे शानदार शतक. त्याचे हे रणजी क्रिकेट स्पर्धेतील तिसरे शतक आहे.
राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि घनदाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले.
गोव्यात येणाऱ्या वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेस वरही त्याचा परीणाम झालेला असून सध्या ही गाडी दोन तास उशिरा धावत असल्याचे भारतीय रेल्वेने कळविले आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर भारतातनागरिकांचे हाल होत आहेत. तापमानात आणखी घसरण होऊ शकते. सध्या दाट धुक्यापासून दिलासा मिळण्याची आशा नाही. यामुळे दृश्यमानताही लक्षणीयरीत्या कमी झाली असून त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणी मागील सुनावणीवेळी समन्स जारी केलेल्या पाच साक्षीदारांचे पत्ते सापडले नसल्याने समन्स मागे आले. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा तहकूब करण्याची पाळी दक्षिण गोव्याचे खास न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यावर आली.
एका साक्षीदाराला व्हॉटसअपवर समन्स पाठवला होता. त्याने आपण मंगळूरला असल्याने पुढील तारीख देण्यास सांगितले. त्यामुळे शुक्रवारी एकही साक्षीदार उपस्थित नव्हता. याप्रकरणी पुढील सुनावणी आता १९ रोजी होणार आहे.
गोव्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या चार वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. संशयित आई सूचनाला अटक केल्यानंतर तिला म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासाचा भाग म्हणून सिकेरीत हत्या घडलेल्या त्या हॉटेलमध्ये पोलीस संपूर्ण घटनाक्रम रिक्रिएट करणार आहेत. पण, सूचना पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
भाजप सरकारने कोंकणी भाषेतील अनुवादकाची पदे रद्द करुन त्या जागी संशोधकाची नियुक्ती केली. यासाठी राजभाषा विभागाला मंत्रिमंडळाने दिलेली मंजुरी म्हणजे भाजप सरकार केवळ प्रयोग करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोंकणीमध्ये राजपत्र प्रकाशित करणे आणि राजभाषा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, हे दूरचे स्वप्न राहिले आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
Verna Accident case: वेर्णा महामार्गालगत कोंसूवा जंक्शनवर दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात. यामध्ये फ्रान्सिस डी सिल्वा (50) यांचा जागीच मृत्यू. कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाझ घटनास्थळी दाखल. या जंक्शनवर सतत अपघात होत असून इथे गतिरोधक आणि सिग्नल बसवण्याची सरकारकडे आमदार वाझ यांची मागणी
Suchna Seth Latest News: 4 वर्षांच्या मुलाचा जीव घेणाऱ्या सूचना सेठचे पोलिसांच्या तपासकामात असहकार्य. क्राईम सीनवर जाण्यास नकार. सकाळपासून कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांचे सूचनाला मनविण्याचे प्रयत्न सुरू.
Mapusa News: एकतानगर, म्हापसा येथे सेप्टिक टँक खाली करताना आत पडलेल्या यमनाप्पा मदार (28) या कामगाराचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीला म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांंनी बाहेर काढले. जीव गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती. ही घटना काल (11 जानेवारी) रात्री घडली. कुटुंबियांकडून घातपाताचा संशय मात्र पोलिस तक्रारीत तसा उल्लेख नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Fire News: नवावाडा तमसुली येथे काल (11 जानेवारी) रात्री 10.30 च्या सुमारास धनंजय च्यारी यांचे फर्निचर वर्कशॉप आगीत जाळून खाक. लाखोंचे नुकसान. प्लायवूड व अन्य लाकूड साठ्यासहित सर्व उपकरणे आगीच्या भक्ष्यस्थानी. आगीचे कारण समजू शकले नाही.
North Goa ₹ 98.08
Panjim ₹ 98.08
South Goa ₹ 97.38
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.62
Panjim ₹ 90.62
South Goa ₹ 89.94
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.