Goa Live Update DainiK Gomantak
गोवा

Goa Live Update: गोवा है तय्यार... गोवा आसा तयार... - पंतप्रधान नरेंद्र मोदी; 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

देशात एका वर्षात 1000 खेलो इंडिया केंद्रे बनवणार - मंत्री अनुराग ठाकूर

गोमंतक ऑनलाईन टीम

गोवा है तयार.... गोवा असा तयार... ः मोदी 

मी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो. गोवा है तय्यार... गोवा असा तयार.... असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल गेम्सचे उद्घाटन केले.

ते म्हणाले, ऑलिंपिक आयोजनासाठी कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. त्यावर मोठा कर्च करण्याची तयारी सुरू आहे. यावेळी गोव्याला या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. गोव्याने जी तयारी केली ती कौतूकास्पद आहे.

येथील इन्फ्रास्ट्रक्चर अनेक दशके गोव्याला उपयोगी ठरेल. अनेक नवे खेळाडू गोव्याला मिळतील. अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास गोव्याला ते उपयोगी ठरेल. नॅशनल गेम्समुळे गोव्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला लाभ होईल.

गोवा सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. आम्ही आंतरराष्ट्रीय परिषदा, मिटिंग्जसाठी गोव्याला प्रमोट करत आहोत. जी २०, ब्रिक्स सारख्या संघटनांच्या बैठका आम्ही गोव्यात घेत आहोत. हे गोव्यासाठी अभिमानास्पद आहेच पण पर्यटनासाठीही महत्वाचे आहे.

मोदींनी सादर केली गेल्या ३० दिवसांतील कामांची जंत्री...

National Games 2023 Opening ceremony: पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या ३० ते ३५ दिवसांत काय झाले ते सांगतो. गगनयान यशस्वी झाले, महिला आरक्षण विधेयक पास झाले, नमो भारत मेट्रो, जम्मू काश्मिर विस्टा डोम, दिल्ली बडोदा एक्सप्रेसवेचे उद्घाटन, जी२० संमेलन, ग्लोबल मेरिटाईम समिट, इस्त्रायलमधून ऑपरेशन अजय द्वारे लोकांना परत आणले, फाईव्ह जी सेवा वापरात भारत आघाडीवर, अॅपलनंतर गुगलनेही फोन बनविण्यास सुरूवात केली.

याच ३० दिवसांत आशियाई क्रीडा स्पर्धात शंभरहून अधिक पदके जिंकली. ऑलिंपिक समितीची बैठक मुंबईत झाली. उत्तराखंडमध्ये अॅस्ट्रो टर्फ झाली. आणि गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहे. विचार करा, केवळ ३० दिवसांतील ही कामांची यादी खूप लांबलचक आहे. ही केवळ एक छोटीसी झलक आहे.

देशाच्या प्रत्येक क्षेत्रात वेगाने काम होत आहे. विकसित भारतासाठी अनेकजण योगदान देत आहेत. या सर्वाच्या केंद्रस्थानी देशाचा युवक आहे.

क्रीडा क्षेत्रातील यशाचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो 

National Games 2023 Opening ceremony: पंतप्रधान मोदी म्हणाले, जुनी यंत्रणा असती तर नव्या खेळाडूंना कधीच ओळख मिळाली नसती. क्रीडा क्षेत्राची प्रगती अर्थव्यवस्थेशी संबंधित असते. देशात नकारात्मकता असेल तर जीवनाच्या विविध क्षेत्रात त्याचा वाईट परिणाम होत असतो. देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. नवीन विक्रम नोंदवत आहे. देशाच्या स्पीडशी स्पर्धा करणे अवघड आहे.

गोव्याने देशाला अनेक खेळाडू दिले - पंतप्रधान मोदी 

National Games 2023 Opening ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोव्याची हवाच काही और आहे. क्रीडा प्रेमी गोव्यात राष्ट्रीय स्पर्धा होणे हे उर्जादायी आहे. गोव्याने देशाला अनेक खेळाडू दिले. भारताचे क्रीडा क्षेत्र यशाची सतत उंची गाठत असताना ही स्पर्धा गोव्यात होत आहे.

गोव्यातले फूटबॉलचे वेड सर्वांनाच माहिती आहे. येथे गल्लोगल्ली फुटबॉल खेळला जातो. २०१४ नंतर आम्ही राष्ट्रीय संकल्प केला. त्यातून क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर बदलले. निवडप्रक्रिया आणखी पारदर्शी केली.

खेळाडुंना आर्थिक मदत देणाऱ्या योजनांत बदल केला. प्रशिक्षण देणाऱ्या योजनांमध्ये, जुने विचार, जुनी मानसिकता हे सर्व आम्ही बदलले. जे अडथळे होते ते आम्ही एक एक करून दूर हटवले. सरकारने टॅलेंट सर्चपासून ते खेळाडूंच्या रँक होल्डिंगपर्यंत आणि त्यांना ऑलिंपिकच्या पोडियमपर्यंत पोहचविण्याचा रोडमॅप बनवला.

पूर्वीचे सरकार क्रीडा बजेटबाबत उदासीन होते. आम्ही स्पोर्ट्सचे बजेट वाढवले. या वर्षीचे केंद्रीय स्पोर्ट्सचे बजेट नऊ वर्षांपुर्वीच्या क्रीडा बजेटच्या तुलनेत ९ पट अधिक आहे. खेलो इंडिया सारखी योजना आम्ही आणली. क्रीडापटू घडण्यासाठी एक नवी इकोसिस्टिम आम्ही बनवली.

शाळेपासून खेळाडूंमधील टॅलेंट शोधले जात आहे. सरकार क्रीडा टॅलेंटवर पैसा खर्च करत आहे. टॅलेंटेड ऑलिंपिक पोडियम (टॉप्स) या योजनेतून क्रीडापटूंवर लक्ष दिले जात आहे. खेलो इंडियामध्ये तीन हजारहून अधिक खेळाडूंचे प्रशिक्षण सुरू आहे.

कात्या कोएल्हो, हरमनप्रीत सिंग यांनी मोदींकडे मशाल केली सुपूर्द 

गोव्याची विंड सर्फर कात्या कोएल्हो आणि इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून खेळाडू हरमनप्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द केली.

क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे गोव्याचे स्वप्न साकार - मुख्यमंत्री सावंत

National Games 2023: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार. गोव्याचे स्वप्न पूर्ण झाले. गोव्याला क्रीडा परंपरा लाभली आहे.

ब्रह्मानंद शंखवाळकर, भक्ती कुलकर्णी यांनी अर्जून पुरस्कार मिळाला आहे. कात्या कोएल्हो सारखे खेळाडू गोव्याचे नाव क्रीडा क्षेत्रात पुढे नेत आहे. स्पोर्ट्स हब अशी गोव्याची नवी ओळख साकार करू. स्पोर्ट्सबाबतचे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या.. क्या हार मे क्या जीत मे किंचीत नही भयभीत मै... कर्तव्य पथ पर जो मिला, ये भी सही है वह भी सही... या ओळी सादर केल्या.

जुडेगा, जितेगा, जितेंगे. भारत माता की जय! वंदे मातरम! मोदीजी आप आगे बढो! असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सांगता केली.

गोव्याच्या संस्कृतीची झलक... 

गोव्यातील मल्लखांबाचे खेळाडू आणि कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले. ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त ३७ ढोलवादक यात सहभागी झाले होते.

दरम्यान, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष, माजी धावपटू आणि राज्यसभेच्या खासदार पी. टी. उषा यांनी प्रास्ताविक केले.

CM Sawant welcomes PM Modi

कुणबी शाल, घुमट देऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर गोव्याची प्रसिद्ध कुणबी शाल आणि घुमट हे वाद्य देऊन स्वागत केले.

PM Modi in Goa

पंतप्रधान मोदी गोव्यात दाखल! 

National Games 2023: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्यातील मंत्री माविन गुदिन्हो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.

दरम्यान, फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींनी फिरत्या रथातून संपूर्ण गोल फेरी मारत उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित आहेत.

राज्यपाल पिल्लई स्टेडियममध्ये दाखल

National Games 2023: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे फातोर्डाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आगमन झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात स्टेडियममध्ये दाखल होणार आहेत.

गायक सुखविंदर सिंग यांनी स्टेडियममधील प्रत्येक प्रेक्षकाला डोलवले...

National Games 2023: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांनी त्यांची काही गाणी सादर करून माहौल तयार केला आहे.

कर हर मैदान फतेह..., चक दे इंडिया..., आणि छैया छैया.. ही गाणी सादर करून त्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाला डोलायला लावले.

देशात वर्षभरात 1000 खेलो इंडिया केंद्रे बनवणार - मंत्री अनुराग ठाकूर

National Games 2023: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, देशात १ हजार खेलो इंडिया सेंटर बनवणार आहे. आणि ते केवळ या एका वर्षातच तयार होतील.

पंतप्रधान मोदींनी क्रीडा क्षेत्राचे बजेट तिप्पट केले - क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर

National Games 2023: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी क्रीडा क्षेत्राचे बजेट वाढवले. त्यांनी हे बजेट तिप्पट करून ते २२५४ कोटी रूपये केले. त्याचे परिणाम दिसताहेत. टोक्यो ऑलिंपिक, विविध जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा यात भारतीय खेळाडुंनी अनेक पदके जिंकली.

फातोर्डा स्टेडियम खचाखच भरले...

National Games 2023: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, फार्तोडा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम खचाखच भरून गेले आहे. येथील प्रेक्षकांचा उत्साह टीपेला पोहचला आहे. थोड्याच वेळात उद्घाटन सोहळ्यास सुरवात होणार आहे.

union sports minister anurag thakur in Goa

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर गोव्यात दाखल

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर मंत्री माविन गुदिन्हो यांनी ठाकूर यांचे स्वागत केले.

गोव्याचे दिवसातील तिसरे पदक...

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये गोव्याच्या नेहा गांवकर, सीता गोसावी, योगिता वेळीप यांनी कांस्यपदकाची कमाई केली. अशाप्रकारे या प्रकारात गोव्याने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे.

या आधी, गुरूवारी सकाळी बाबू गावकर याने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर दुपारी मॉडर्न पेंटॅथलॉनच्या लेझर रिले प्रकारात बाबू गावकर, सीता गोसावी यांनी राज्याला रौप्य पदक मिळवून दिले.

Silver Medal For Goa in Modern Pentathalon

मॉडर्न पेंटॅथलॉनच्या लेझर रिले प्रकारात गोव्याला रौप्यपदक

गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉनच्या लेझर रिले प्रकारात गोवा संघाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. गोव्याच्या या संघात बाबू गावकर, सीता गोसावी यांचा समावेश आहे.

गोव्यात येणाऱ्या पंतप्रधान मोदींना म्हादईसह काँग्रेसचे 10 प्रश्न

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गोव्यात येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गोव्याशी संबंधित दहा प्रश्न केले आहेत. यात म्हादई नदीचे पाणी वळविण्यासह व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

गोल्ड मेडलिस्ट बाबू गावकरला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

गोव्यात सुरु असलेल्या 37व्या क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी पहिले गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या सांगे नेत्रावळीतील मॉडर्न पेंटॅथलॉनपटू बाबू (अभय) गावकरला मंत्री सुभाष फळदेसाईंनी त्यांच्या कुटूंबाकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

लोलये येथे कार आणि दुचाकीचा अपघात

लोलये येथे भरधाव दुचाकी कारला धडकून अपघात झाला आहे. उतराला दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालक कारला धडकला. यात दुचाकी चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

खूशखबर ! गोव्यात आता श्रीराम नवमीला सार्वजनिक सुट्टी

गोव्यात येत्या वर्षापासून श्रीराम नवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या वाढून 18 झालीय. आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

लोटलीत आठ जणांच्या टोळक्याकडून 19 वर्षीय युवकाला लोखंडी रॉडने गंभीर मारहाण

Loutolim Crime News: लोटलीत 19 वर्षीय युवकाला सहा ते आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडच्या सहाय्याने गंभीर मारहाण केली आहे. यात रॉयसन फर्नांडिस हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॉयसनचे डोके आणि शरिरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मायणा-कुडतरी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये गोव्याला पहिले सुवर्ण

National Games Goa 2023: 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये गोव्याला पहिले सुवर्ण मिळाले आहे. नेत्रावळी-सांगे येथील बाबू गावकर याने पुरुषांच्या लेझर रन प्रकारात अव्वल कामगिरी नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. लेझर रन प्रकारात 600 मीटर धावणे व शूटिंग यांचा समावेश होता. फोंडा क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली.

National Games Goa 2023

'राष्ट्रीय खेळांच्या मोहिमेची सुरुवात सुवर्णपदकाने झाली असून, गोवा राज्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. बाबू गावकरने मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. बाबू आणि टीम गोव्याचे अभिनंदन,' असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी गावकरचे अभिनंदन करताना म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: पंतप्रधानांचा सुरक्षा प्रभारी असल्याची तोतयागिरी केल्याप्रकरणी शिरंग जावळ विरोधात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT