Goa Live Update 27 December 2023 | Goa Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa Update 27 December: मिरामार येथे सापडलेल्या नवजात अर्भकाची माता ताब्यात; जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

Goa Breaking News 27 December 2023: पणजी, मडगाव, म्हापसा तसेच राज्याती महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज...

Kavya Powar

पुरुष सायकलिंग स्पर्धेत नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद

आंतर महाविद्यालयीन पुरुष सायकलिंग स्पर्धेत नावेलीच्या रोझरी महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद प्राप्त केले. गोवा विद्यापीठाच्या मान्यतेने रोझरी महाविद्यालयातर्फे स्पर्धा घेण्यात आली.

सांघिक गटात केपे सरकारी महाविद्यालयास उपविजेतेपद, तर कुठ्ठाळीच्या सेंट जोसेफ वाझ महाविद्यालयास तिसरा क्रमांक मिळाला. 35 किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील 60 स्पर्धक सहभागी झाले होते.

आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत गोवा विद्यापीठाला उपविजेतेपद

ग्वाल्हेर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत गोवा विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले, तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या पात्रता प्ले-ऑफ लढतीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठावर चुरशीच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटवर (3-2) मात केली.

मिरामार येथे सापडलेल्या नवजात अर्भकाच्या मातेला पोलिसांनी घेतले ताब्यात

मिरामार येथे कचऱ्यात आढळून आलेल्या नवजात अर्भकाच्या मातेचा पणजी पोलिसांनी शोध लावला आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सनबर्न महोत्सवात ड्रग्ज तपासणीसाठी श्वानपथकासह विशेष पथक सज्ज

वागातोर येथे उद्यापासून सुरु होणाऱ्या सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी ड्रग्स तपासणीसाठी श्वान पथकासह स्थापन केलेले विशेष पथक

'मनरेगा'तील 8 हजार कामगार मजुरीच्या प्रतीक्षेत; भाजप सरकारकडून एससी, एसटी, ओबीसींचा छळ

एससी, एसटी आणि ओबीसी कामगारांसह मनरेगाअंतर्गत दररोज 322 रुपये कमावणारे जवळपास 8 हजार कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या हक्काच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

मी ऑक्टोबरमध्ये हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. दुर्दैवाने आजपर्यंत सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नाही.

इव्हेंटवर उधळपट्टी थांबवा आणि गरीब व कष्टकरी कामगारांची वेळेवर मजुरी द्या, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

कला अकादमीच्‍या राज्‍यनाट्य स्‍पर्धेत ‘फादर’ नाटक ठरले अव्‍वल!

कला अकादमीच्‍या ‘अ’ गट राज्‍यनाट्य स्‍पर्धेत मांगिरीश यूथ क्‍लब, मंगेशी फोंडा यांचे ‘फादर’ नाटक ठरले अव्‍वल. नागेश महालक्ष्‍मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदिवडे यांचे ‘यत् न कथ्‍यते’ द्वितीय, तर रसरंग उगवे संस्‍थेच्‍या ‘रुदन’ नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्‍त.

शिवोलीतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाची सुरुवात

siolim news

Goa इन्क्विजिशनबाबत आक्षेपार्ह पोस्ट, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

गोवा इन्क्विजिशनबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर अज्ञाताने इन्क्विजिशनबाबत पोस्ट केली असून, सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

...पण खाणी सुरू करण्यास विरोध करू नये: मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शिरगाव येथील श्री लईराई देवीचे मंदिर खाण परिक्षेत्रात येत असल्यास, ते बाहेर काढणे सरकारची जबाबदारी. याबाबत आश्वासन देत यामुळे खाणी सुरू करण्यास विरोध करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

goa news

किर्लपाल दाभाळ पंचायत मध्ये अनेक वर्षापासून बोगस घरपट्टी पावती देत आहे. पंचायत कर्मचारी यांची चौकशी करावी, अशी मागणी गोवा कॉंग्रेस सावर्डेचे पदाधिकारी जयेश पाटील यांनी केली आहे

मनोजला भिक देणे बंद करावे! मिकी पाशेकोंची टीका

गोवेकर परदेशात काबाडकष्ट करून पैसे कमवत आहेत आणि आरजीचे मनोज परब याच लोकांकडून पक्ष चालविण्यासाठी भिक मागत आहेत. या लोकांनी मनोज परबला भिक देणे बंद करावे. मनोज गोव्यात कलेक्शन एजंट म्हणून वावरत आहे. त्यांच्याकडे मते नाहीत, ते भाजप आणि काँग्रेसची मते फोडणार आहेत. हे लोकांनी लक्षात घ्यावे, माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेकोंची टीका.

पुढील वर्षापर्यंत बसस्थानक कार्यरत होणार. डिचोलीच्या नियोजित बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची माहिती.

‘सिक्वेरांचे नागरिकत्व रद्द करा’- माजी पर्यटनमंत्र्यांची मागणी

मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा 1957 साली केनियात जन्म झाला. 27 मार्च 2001 रोजी त्यांनी पोर्तुगालमध्ये जन्म झाल्याचे नोंदवले आहे. जन्म, पासपोर्ट नोंदीमुळे भारतीय नागरिकत्व गमावलेल्या इतर गोमंतकियांप्रमाणेच सिक्वेरांचा देखील भारतीय पासपोर्ट रद्द करावा. मी पासपोर्ट अधिकार्‍यांना पत्र लिहिले असून, सिक्वेरांचे नागरिकत्व रद्द केले नाही तर 15 दिवसांत पुढील निर्णय घेणार. माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांचा इशारा.

बालदिन आणि पंडित नेहरू यांच्यात काही संबंध नाही..!

14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा बालदिन आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात कसलाच संबंध नाही, तो फक्त बालदिन आहे', असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

अखेर 'तिळारी'चा दरवाजा उघडला!

तिळारी धरणाचा कालव्यात उघडणारा दरवाजा उघडण्यात पुण्यातील तंत्रज्ञांना सकाळी पावणेसहा वाजता यश आले. पर्वरी व साळगावची पाणीटंचाई दूर होणार. दरवाजा उघडण्याचे प्रयत्न गेले तीन दिवस सुरू होते.

मजामस्तीच्या नादात जीवाशी खेळ! ख्रिसमस विकेंड ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी तिघांना वाचवले

ख्रिसमस विकेंडमध्ये राज्यात मजामस्ती करण्यासाठी आलेल्या तिघाजणांना ‘दृष्टी’ संस्थेच्या जीवरक्षकांनी समुद्रात बुडण्यापासून वाचवले. उपलब्ध माहितीनुसार मिरामार किनाऱ्यावर पाण्यात खोलवर गेलेली हैदराबाद येथील महिला पाण्यात बुडते आहे, हे लक्षात येताच जीवरक्षकाने तिच्या पतीच्या मदतीने महिलेला सुरक्षित ठिकाणी परत आणले. तसेच सिकेरी किनाऱ्यावर नाशिकचे चार पर्यटक पाण्यात उतरले असता, त्यातील दोघेजण पाण्यात बुडू लागले होते. मात्र, तेथील जीवरक्षक शुभम याने दोघांना किनाऱ्यावर आणले.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 89.68

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने लाखो रुपये लाटले!

Anjuna Music Event Protest: हणजूणमध्ये संगीत महोत्सवावरून स्थानिकांमध्येच जुंपली; भर सभेत तरुणाला धक्काबुक्की; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

IFFI 2024: 'समृद्ध जीवनशैलीच्या नादात देश सोडू नका'; 'अमेरिकन वॉरियर्स'च्या निर्मात्या नेमक्या काय म्हणाल्या पाहा

SCROLL FOR NEXT