Goa Live Update: Dainik Gomantak
गोवा

Goa Daily News Wrap: दिवसभरातील गुन्हे, क्रीडा, राजकीय व इफ्फी संबधित घडमोडींचा आढावा एका क्लिकवर

Akshay Nirmale

अल्पवयीन मुलाला शिवीगाळप्रकरणी कोलवा पोलिसांकडून एकाला  अटक

अल्पवयीन मुलाला शिवीगाळ केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी फ्रॅन्की फर्नांडिस याला अटक करण्यात आली आहे.

नवीन बोरी पुलासाठी एकही घर हटवले जाणार नाही- आलेक्स सिक्वेरा

नवीन बोरी पुलासाठी एकही घर हटवले जाणार नाही, असे आश्वासन नवनिर्वाचित मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिले आहे.

आसगाव येथे क्लबमध्ये पुण्यातील पर्यटकावर खुनी हल्ला, संशयिताला अटक

आसगाव येथील क्लबमध्ये पुण्यातील पर्यटकावर खुनी हल्ला प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. संशयित हेस्टन डिकॉस्ता (रा. बेस्तोडा) याला शरण आल्यानंतर अटक केली.

दुचाकी व बसच्या अपघातात तरुण गंभीर जखमी

शांतीनगर येथे दुचाकी व बसच्या अपघातात रोहन नाईक (सडा, वास्को, वय, 22) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तो हेल्मेट शिवाय दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई; बिहारमधील दोघांना अटक

कर्नाटक उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांतर्फ दारू तस्करीचा पर्दाफाश. गोव्यातून तस्करी करण्यात आलेला 25 लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त. बेळगाव जिल्हा उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी बिहारमधील दोन संशयितांना पकडले असून महाराष्ट्र नोंदणीकृत ट्रक ताब्यात घेतला.

गोवा शिक्षण विकास महामंडळाची सुधारीत व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजना जाहीर

गोवा शिक्षण विकास महामंडळाची सुधारीत व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे. देशातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा १२ लाख तर विदेशातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुधारीत योजना २७ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून २९ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी दिली.

कथित नोकरभरती घोटाळ्याबाबत दक्षता खात्याकडे तक्रार!

सार्वजनिक बांधकाम खात्यातील कथीत नोकरभरती घोटाळा. कॉंग्रेसच्या जॉन नाझारेथ आणि एड.श्रिनिवास खलपांनी दक्षता खात्याकडे केली तक्रार. सखोल चौकशीची केली मागणी.

मडगाव नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांविरोधात बाणावली पंचायतीकडून पोलिसांत तक्रार

बाणावली पंचायत क्षेत्रात कचरा टाकल्यावरून पंचायतीने मडगावचे पालिकेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

सरकारकडून 'बजेट मॅन्युएल' प्रसिद्ध!

नागरीकांना, अधिकाऱ्यांना व पत्रकारांना अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया समजावी, या उद्देशाने सरकारकडून 'बजेट मॅन्युएल' प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Goa Live Update:

झॅन टॅक्नोलॉजीला जमीन हस्तांतरीत!

तुये इलेक्ट्रॉनिक सिटीत उद्योग सुरू करण्यासाठी झॅन टॅक्नोलॉजी लिमीटेडला जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. तुये इलेक्ट्रॉनिक सिटीतील ही ८ वी कंपनी आहे. झॅन टॅक्नोलॉजी कंपनी भारत, युएई आणि युएसए मध्ये बिझनेस करते.

डिचोली-साखळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

डिचोली-साखळी रस्त्यावरील गोकुळवाडा येथे गुरूवारी रात्री झालेल्या अपघात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. अज्ञात वाहनाने या दुचाकीस्वाराच्या धडकेत स्कुटरस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले आहे.

पर्वरीत पेंटींग साहित्याच्या गोदामाला आग

पर्वरी येथील रंगकामाचे साहित्य ठेवलेला गोदाम आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेत अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच पर्वरी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT