Goa Live Update 15 December 2023:
Goa Live Update 15 December 2023: Dainik Gomantak
गोवा

Goa Update 15 December 2023: गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Akshay Nirmale

'ऊर्जा संवर्धनात' गोव्याला द्वितीय पारितोषिक

 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कारांमध्ये गोव्याने लहान राज्यांच्या श्रेणीत दुसरे पारितोषिक पटकावले असल्याची माहिती गोव्याचे ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिलीय. या श्रेणीत आसाम पहिल्या क्रमांकावर आहे.

स्वस्त दर्जाची वीज, वीज वितरणातील पायाभूत सुधारणा आणि वीज विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आम्हाला हे यश मिळू शकले असल्याचे ढवळीकर म्हणाले.

कुंकळ्ळीत शनिवारी मेणबत्ती मोर्चा; सरकारसमोर समस्या मांडण्याचा स्थानिकांचा प्रयत्न

कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीतील प्रदुषणाच्या समस्येवर शनिवारी (16 डिसेंबर) मेणबत्ती मोर्चा आयोजित केला आहे. संध्याकाळी 6.30 वाजता कुंकळ्ळी बसस्थानक येथे सुरूवात होऊन चिफटेन मेमोरीयल येथे मोर्चाची सांगता होणार आहे.

घरफोडीप्रकरणी चिमा पॉल याला साथीदारासह अटक

फातोर्डा येथील घरफोडीप्रकरणी कुख्यात गुन्हेगार चिमा पॉल याला त्याचा साथीदार अर्जुन देसाई याच्यासह अटक केल्याची माहिती प्राप्त झालीय. चोरी केलेल्या ५० लाखांच्या दागिन्यांसह बरेचसे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आलेय.

पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी युवकाला अटक; आगोंद येथे घडली घटना 

 गोव्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी काणकोण पोलिसांनी आगोंद येथील युवकाला अटक केली आहे. बुधवारी (दि.13) रात्री हा प्रकार उघडकीस आला.

नेरूळच्या सरपंचपदी राजेश कळंगुटकर बिनविरोध

राजेश कळंगुटकर यांची नेरूळ पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुदेश गोवेकर यांनी शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर कळंगुटकर यांची निवड करण्यात आली. आमदार केदार नाईक यांच्या सहकार्याने पाणी आणि वीजेचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे, असे नूतन सरपंच राजेश कळंगुटकर यांनी सांगितले.

रूमडामळ येथे दुकानात चोरी; 15 हजार रोकड, 2 लॅपटॉप लंपास

रूमडामळ दवर्ली सासष्टी येथील रिलायन्स इलेक्ट्रिकल्स या दुकानात चोरी झाली आहे. 14 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला आहे. यात दुकानातील 15000 रूपयांची रोकड आणि अंदाजे 2 लॅपटॉप असे साहित्य चोरीला गेले आहे.

निवृत्त सरकारी कर्मचारी महादेव मंगेश कोमारपंत (वय 61) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी तपास करत आहेत.

दाबोळी, वास्कोत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 16 युवकांना अटक

दाबोळी व वास्कोत रात्रीच्या वेळी मिळेल त्याठिकाणी बसून मद्यपान करणाऱ्या १६ युवकांना वास्को पोलिसांनी भा.द.स (३४) सी कलमाखाली अटक केली. ही मोहिम सुरुच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.

Vasco police

कर्नाटकातील मोबाईल चोरट्यास अटक, वास्को पोलिसांची कारवाई 

वास्को पोलिसांनी मोबाईल चोरट्याला अटक केली आहे. मोहम्मद युसून हुसैन शेख ( वय ४८) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९ फोन जप्त करण्यात आले आहेत. तो मूळचा कर्नाटक येथील असून यापुर्वीही त्याला मुरगाव पोलिसांनी २० मोबाईल चोरल्या प्रकरणी अटक केली होती.

म्हाऊस येथे ब्राम्हणी माया देवस्थानच्या सभागृहाची पायाभरणी

पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते म्हाऊस येथील देसाई वाडा येथे ब्राम्हणी माया देवस्थानच्या सभागृहाची पायाभरणी झाली. यावेळी जि. प. सदस्य देवयानी गवस, सरपंच मौसी सोमनाथ काळे, पंच सुलभा देसाई, प्रिती गावकर, गुरुदास गावस आदी उपस्थित होते. या हॉलच्या बांधकामासाठी सुमारे 10 लाख निधी मंजूर झाला आहे.

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आयटीआय काकोडामध्ये

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आयटीआय काकोडा येथे स्टेम मल्टीडिसिप्लिनरी टिंकरिंग इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स लॅबचे उद्घाटन केले. यानिमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते.

New Zuari Bridge Car Accident

नवीन झुआरी पुलावर कारचा अपघात

नवीन झुआरी पुलावर आज, शुक्रवारी सकाळी एका कारचा स्वयं अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट बॅरीकेडवर जाऊन आदळली. या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही.

चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या शुल्कात 40 टक्के सवलत

राज्य सरकारने नवीन गोवा चित्रपट शूटिंग नियम अधिसूचित केले आहेत, त्यानुसार गोव्यातील चित्रपट निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसना फीमध्ये 40 टक्के सवलत मिळेल.

नियमानुसार पंचायती आणि नगरपालिकांना करांव्यतिरिक्त 25,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याची परवानगी असेल, तर पणजी महानगरपालिका (CCP) 1 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT