गोवा

Goa News: हळदोण येथे कर्करोग तपासणी अभियान, 255 जणांनी केली तपासणी; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Today's News Update: गोव्यातील राजकारण, क्रीडा, कला - संस्कृती, पर्यटन, अपघात, गुन्हे यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

हळदोण येथे कर्करोग तपासणी अभियानात 255 रुग्णांनी (96 पुरुष, 160 महिला) केली तपासणी. 2 महिलांमध्ये संशयित स्तनाच्या कर्करोगाची गाठ आढळली : नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर.

म्हादई बाबत गोवा सरकार अपयशी, निर्मला सावंत यांचा आरोप

म्हादई बाबत गोवा सरकार अपयशी. म्हादई बचाव अभियानाचा सरकारवर आरोप. सरकार जाणून बुजून वेळकाढू पणा करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात 17 जणांची टीम घेऊन जायची गरजच काय होती. कर्नाटक सरकारचे वकील सुनावणीसाठी दिल्लीला पोचलेच नाही कारण त्यांना याबाबत आधीच माहिती होते. गोवा सरकार पूर्णपणे अनभिज्ञ: निर्मला सावंत यांनी सांगितले.

भटक्या श्वानाचा महिलेवर हल्ला; डिचोली शहरातील धक्कादायक प्रकार

डिचोली शहरात कुत्र्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पायासह तीन ठिकाणी कुत्र्याने चावे घेतले. उपचारानंतर महिला आता सुखरुप आहे.

म्हापसा नगरपरिषदेच्या अध्यक्षांचा राजीनामा

म्हापसा नगरपरिषदेच्या अध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी परस्पर सामंजस्यातून राजीनामा दिला.

डॅनियली मॅकलॉग्लीन लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी विकट भगत दोषी, सोमवारी होणार शिक्षा

ब्रिटीश नागरीक डॅनयली मॅकलॉग्लीन लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी विकट भगतला मडगाव सत्र न्यायालयाने दोषी करार दिला. भगतला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी यावेळी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने विकटला कलम 302 खून, 376 बलात्कार आणि 201 पुरावे नष्ट करणे या कलमांखाली दोषी ठरवले.

धारबांदोड्यात एका भाड्याच्या घरात सापडले धोकादायक रेडीएशन मशीन

पणसुली धारबांदोडा परिसरात एका भाड्याच्या घरात सापडले धोकादायक रेडीयेशन मशीन. हे धोकादायक मशीन घरात दीड मीटरचा खड्डा मारुन त्यात ठेवण्यात आले होते. पोलिस घटनास्थळी दाखल. तपास सुरू. घरमालकाची आणि घरात भाड्याने राहणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, धारबांदोडेचे सरपंच बालाजी गावस यांची मागणी.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांना मोठा दिलासा; खाण घोटाळ्यातून मुक्तता

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची खाण घोटाळ्यातून मुक्तता करण्यात आली आहे. पणजीतील सत्र न्यायालयाने आणखी १६ जणांची यातून सुटका केलीय. २०१८ मध्ये एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात कामत यांचे नाव होते.

धक्कादायक! 42 टक्के शॅक्स दुसरेच चालवतायेत; 35 जणांना बजावली नोटीस

राज्यातील २५५ पैकी १०८ शॅक्स मूळ मालकांनी दुसऱ्याला चालवायला दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पर्यटन खात्याने ३५ शॅक मालकांना नोटीस बजावली आहे. हरमल, कळंगुट बीचवर खुनाची घटना घडल्यानंतर पर्यटन खात्याने राज्यातील शॅक्सचा सर्व्हे हाती घेतला आहे.

कुंकळ्ळीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण, आई - वडील कामावर असताना घडली घटना

कुंकळ्ळीत अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आई - वडील कामावर असताना दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी व्यक्तीने मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, गोव्यासह शेजारच्या राज्यात वायरलेसद्वारे माहिती देण्यात आली आहे. तसेच, सर्व रेल्वे स्थानकांवर देखील माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT