Today's Goa Live News 18 Feb 2024 | Goa Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa News 18 Feb 2024: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Breaking News 18 February 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या घडामोडी

Kavya Powar

रणजी क्रिकेटमध्ये गोव्यावर नामुष्की

रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट क गटात पर्वरी येथे गुजरातविरुद्ध गोवा 7 विकेटने पराभूत, स्पर्धेतील पाचव्या पराभवामुळे गोव्यावर 2024-25 मोसमातील प्लेट गटात पदावनतीची नामुष्की, 7 लढतीतून गोव्याचे फक्त 4 गुण.

पोरस्कडे पेडणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात

पोरस्कडे पेडणे राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीत अपघात. दुचाकी चालक गंभीर जखमी. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू.

खाण ब्लॉकची जनसुनावणी रद्द करा!

खाण ब्लॉकच्या जनसुनावणीवरून अडवलपाल ग्रामसभा तापली. नियोजित जनसुनावणी रद्द करा ग्रामस्थांची मागणी. 'ईआयए' अहवाल खोटा आणि गाव उद्ध्वस्त करणारा असल्याचा ग्रामस्थांचा दावा.

वेळसाव ग्रामसभेत रेल्वे दुहेरी मार्गाच्या मुद्द्यावर चर्चा!

वेळसाव पंचायतीच्या ग्रामसभेत रेल्वे दुहेरी मार्गाच्या मुद्द्यावर चर्चा. मात्र याबाबत पंचायतीकडे कोणतेच अधिकार नसून हा मुद्दा केंद्र आणि राज्य सरकार पाहणार असल्यामुळे यावर कोणतेच समाधान मिळाले नाही.

... तर पक्षाने लोकसभा उमेदवारीसाठी माझा विचार करू नये!

मी दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज केला. पण यासाठी माझी एक अट आहे. दक्षिणेत अल्पसंख्याकांसाठी निवडणूक लढवण्याची पक्षाची परंपरा आहे. या निवडणुकीसाठी अल्पसंख्याकांना प्राधान्य द्यायचे असेल तर पक्षाने माझ्या अर्जावर विचार करू नये. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे वक्तव्य.

दोडामार्ग पोलीस चौकीच्या दुरुस्ती कामाला सुरुवात! 

गोवा-महाराष्ट्र सीमेवरील दोडामार्ग पोलीस चौकीला मिळणार नवा साज. 44 लाख रुपये खर्चून इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते कामाची पायाभरणी.

हरमल अपघातातील संशयित स्विफ्ट चालकाला अटक!

हरमल येथील अपघातप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारचालक नरेश गंठुला (24) आणि बंदी राजशेखर (24) या तेलंगणामधील दोन पर्यटकांना अटक. या अपघातात काल (ता. 17) साहील नाईक व दीप नाईक या दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

मडगाव ट्रॅफिक सेलचा होमगार्डचा प्रामाणिकपणा!

मडगाव ट्रॅफिक सेलचे होमगार्ड संदेश गावणकर यांना बाणावलीत राहणाऱ्या ओमानच्या महिलेची पर्स सापडली. पर्समध्ये महिलेले कागदपत्रे आणि रोख रक्कम होती. गावणकर यांनी तिच्या घरी जाऊन पर्स महिलेच्या स्वाधीन केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT