Goa Live Update 04 December 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Update 14 December 2023: गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

नाताळसाठी वाहतूक प्लॅन तयार - मुख्यमंत्री

Pramod Yadav

बेतोड्यात खून!

काझरवाडा बेतोडा येथे मातीत पुरलेल्या अवस्थेत मिळाला स्थानिकाचा मृतदेह. खून करून मृतदेह पुरवल्याचा संशय.पोलिस घटनास्थळी दाखल. पुढील तपास सुरू.

sankalp amonkar

आमदार संकल्प आमोणकरांनी केला खेळाडू मनिषा गिरप हिचा सत्कार 

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी हेडलँड सडा येथील मनिषा गिरप हिचा सत्कार केला. मनिषाने बंगळूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ क्लासिक बेंच प्रेस चँपियनशिप 2023 मध्ये 84 किलो वजनी गटात ब्राँझ पदक पटकावले.

दरम्यान, वर्ल्ड क्लासिक बेंच प्रेस चँपियनशिपमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली महिला आहे. जागतिक स्पर्धा अमेरिकेतील टेक्सास येथे मे ते जून 2024 या काळात होणार आहे.

ऊस तोडणीचे पैसे मास्कारेन्हास वेळेवर देतात - शेतकरी

सांगेतील कोठाली रेन्जच्या शेतकऱ्यांनी कंत्राटदार आवेतीन मास्कारेन्हास यांच्यावर ऊस तोडून नेण्याची दिली जबाबदारी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकरी म्हणतात, ऊस तोडणीचे पैसे मास्कारेन्हासच वेळेवर देतात. अन्य कोणावरच आम्हाला विश्वास नाही. मास्कारेन्हास यांचे नाव विनाकारण बदनाम करुन आपले काम साध्य करू पाहणाऱ्याने दूसऱ्यांवर बोट दाखवू नये. असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. तसेच संजीवनी साखर कारखाना लवकर सरकारने उभा करावा, अशी मागणीही करण्यात आली.

नाताळसाठी वाहतूक प्लॅन तयार - मुख्यमंत्री

नाताळसाठी वाहतूक प्लॅन तयार असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

हणजूण पोलिसांकडून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

हणजूण पोलिसांकडून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश. दोन विदेशी नागरिकांसह चार दलालांना अटक. केनियाच्या दोन युवतींची सुटका.

आसगाव येथे 1.35 लाखांच्या अंमलीपदार्थासह मणिपूरच्या एकाला अटक

आसगाव येथील फिश पॉईंट बार अँड रेस्टॉरंटजवळ 1.35 लाखांच्या एमडीएमए अंमलीपदार्थासह आयनाव डिक्शन सैझा (41, मणिपूर) याला अटक. गुन्हे शाखेकडून बुधवारी मध्यरात्री कारवाई. संशयित गेल्या काही वर्षापासून नाईकवाडा - कळंगुट येथे भाडेतत्वावर राहत आहे.

दुचाकी अपघातात तरुणीचा मृत्यू, आगशी पोलिसांकडून तरुणाला अटक

दुचाकी अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आगशी पोलिसांकडून ओमकार नवींद्र आरोसकर (18) याला अटक. पिलार - आगशी येथे दुचाकींची समोरासमोर झालेल्या टक्करीत संजना सावंत हीचा झाला होता मृत्यू.

समंथा फर्नांडिस मृत्यू प्रकरण; सासूला अटकपूर्व जामीन

समंथा फर्नाडिस मृत्यू प्रकरणी सासू पेट्रोसिना फर्नांडिस यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. डुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्यावर आहे

कोलवा बीचवरील प्रस्तावित पे पार्किंगला ग्रामस्थांचा विरोध

कोलवा समुद्रकिनाऱ्यावरील प्रस्तावित पे पार्किंगला दर्शवला ग्रामस्थांनी विरोध. विशेष ग्रामसभेत पे पार्किंग विरोधात एकमताने ठराव. बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांचीही उपस्थिती.

रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच उपाययोजना - मुख्यमंत्री

रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी पुढील दोन महिन्यात उपाययोजना हाती घेणार. सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खात्याला दिले निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

करंझाळे येथे एकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोन संशयित ताब्यात

करंझाळे येथे एकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सूर्यकांत कांबळी असे जखमी इसमाचे नाव असून, याप्रकरणी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT