सालेली, सत्तरी येथे एका दुचाकीची रस्त्याच्या संरक्षक भिंतीला धडक बसून अपघात घडला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून दुचाकीस्वार नेहाल उल्हास गावडे (वय २३, हेदोडे सत्तरी) हा युवक जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
मोपा विमानतळ पोलिसांकडून 195 लिटर बेकायदा मद्य जप्त केले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीसह वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
बाणावलीत युकेतील पर्यटकाला बैलाने जोराची धडक दिली. या धडकेत पर्यटक युवोनी मोरिश (79) यांच्या मांडीला शिंग लागल्याने जखम झालीय, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळे-फोंडा येथे घरात चोरी झाली असून, चोरट्याने घरातील दागिने लंपास केले आहेत. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पोलीस तपास करीत आहेत.
'आम्हाला मत फोडायची नाहीत, त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही,' गोवा फॉरवर्डचे सुप्रिमो विजय सरदेसाई यांचे स्पष्टीकरण.
पारंपरिक रेती व्यवसाय सुरू होत नाही तो पर्यंत इतर राज्यातून होणारी रेती वाहतूक अडवून धरणार अशी आडमुठी भूमिका पेडणेच्या रेती व्यावसायिकांनी घेतली आहे. पत्रादेवी चेक नाक्यावर रेतीचे ट्रक अडवून धरण्याची रेती व्यावसायिकांनी धमकी दिली आहे
महिलेला सरकारी नोकरीचे आमिष देऊन तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सत्तरीतील एकाला अटक करण्यात आली आहे. अमर मांद्रेकर असे आरोपीचे नाव असून, म्हापसा पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने त्याचे सरकारमध्ये बड्या लोकांशी संबंध असल्याचे महिलेला सांगितले.
मनोज परब यांचा रिव्हॉल्युशनरी गोवन्स हा पक्ष इंडिया आघाडीचा भाग नाही, असे गोवा काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. काँग्रेस येत्या लोकसभेत दोन्ही जागा जिंकेल असा विश्वास ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.