Ashish Nehra: आशिष नेहराला धक्का; केळशी पंचायतीने पुन्हा बजावली नोटीस

Quelossim Gram Panchayat: केळशी समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्‍या आपल्‍या मालमत्तेत जाण्‍यासाठी वाळूचा पट्टा कापून बेकायदेशीर रस्‍ता तयार केल्‍याचा आरोप नेहरावर आहे.
Ashish Nehra: आशिष नेहराला धक्का; केळशी पंचायतीने पुन्हा बजावली नोटीस
Ashish NehraDainik Gomantak
Published on
Updated on

Quelossim Panchayat Issues Notice Ashish Nehra

राज्यात गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा स्टार माजी गोलंदाज आशिष नेहरा चर्चेत आहे. कारणही तसचं आहे. केळशी समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्‍या आपल्‍या मालमत्तेत जाण्‍यासाठी वाळूचा पट्टा कापून बेकायदेशीर रस्‍ता तयार केल्‍याचा आरोप नेहरावर आहे. याच पार्श्वभूमीवर आज (3 नोव्हेंबर) केळशी पंचायतीची ग्रामसभा चांगलीच गाजली.

केळशीतील नो डेव्हलपमेंट झोनमधील आशिष नेहराच्या रस्ते बांधकामाच्या विषयावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली. पंचायतीने या प्रकरणाबाबत सीआरझेडला पत्र पाठवून पुन्हा एकदा नेहराला नोटीस बजावली. पंचायतीला मर्यादित अधिकार असल्याचे देखील यावेळी पंचायत मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीला आवश्यक ती कारवाई करण्याचे विनंती पंचायत मंडळाकडून करण्यात आली.

झाडांची कत्तल

दरम्यान, नेहराने रस्ता तयार करण्यासाठी पंचायतीची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. त्यामुळे या प्रकरणी स्थानिकांनी पंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. हा विषय गंभीरतेने घेऊन सरपंच डिक्सन वाझ यांनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. हा रस्ता तयार करतेवेळी वाळूच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी आत शिरत आहे. तसेच, स्थानिकांच्या घरांना आणि त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

Ashish Nehra: आशिष नेहराला धक्का; केळशी पंचायतीने पुन्हा बजावली नोटीस
Quelossim Panchayat: केळशीतील आशिष नेहराच्या अवैध रस्त्यावरुन सरपंच-आमदार यांच्यात खडाजंगी; एकमेकांना हमरी-तुमरी करत...

दुसरीकडे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा विद्ध्वंस होत असतानाही सरपंच गप्प का, असा सवाल आमदार व्हिएगस यांनी केला होता. ही जमीन पूर्वस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न झाले, असा सवाल केला तर सरपंच डिक्सन वाझ यांनी हा रस्ता अवैध असल्याने काम बंदचा आदेश पंचायतीने जारी केला असे म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com