वेर्णा येथे पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करुन नंतर लंडनला गेलेला संशयित आरोपी व्हिल्सन डिकॉस्ता (वय वर्ष 46) याला आज (3 नोव्हेंबर) मोपा विमानतळावर उतरल्यानंतर इमिग्रेशन पोलिसांनी अटक केली.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराने केळशी येथे एनडीझेडमध्ये रस्ता बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही. पंचायतीने या प्रकरणाबाबत सीआरझेडला पत्र पाठवले असून नेहराला यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे.
डिचोलीत बसस्थाननकाजवळ दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात तरुण थोडक्यात बचावला. किरकोळ जखम सोडल्यास दुचाकीस्वार तरुण सुदैवाने सुखरुप. रविवारी दुपारी अपघात घडला.
टुरिस्ट पोलिस युनिटचे पीआय जतीन पोतुदार यांनी कळंगुट येथून आरिफुल सैदुल मोंडल नावाच्या एका संशयिताला ताब्यात दिले. चौकशीदरम्यान आरिफुल हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. कळंगुटमधील अनेक चोरीच्या घटनांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. ASI कृष्णा गुरव आणि BNSS च्या 84 च्या टीमने आरिफुलला अटक केली.
फोंडा फर्मागुडी येथील आयआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या जिव्या विजयकुमार खती (19, मध्यप्रदेश) या विध्यार्थीने गर्ल्स हॉस्टेल मधील खोलीत गळफास घेवून जीवन संपवले. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात. फोंडा पोलिंसाकडून तपास सुरु आहे.
धनगर बांधवांचा सामूहीक 'पवा' उत्सव डिचोलीत दिमाखात साजरा. गोव्यासह महाराष्ट्रातील धनगर बांधवांचा सहभाग. शनिवारी रात्रभर घडला गजानृत्य आदी लोकनृत्यांचा आविष्कार.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुळे दूधसागर जीप टुर ऑपरेटर्सच्या मागण्यावर तोडगा काढला. काल (2 नोव्हेंबर) सुरु केलेले साखळी उपोषण रितसर घेतले मागे. मोठ्या प्रमाणात कुळे येथे पर्यटक पोहोचले.
कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेला अल्प प्रतिसाद. चार पंचसदस्यांची दांडी. रविवारी झालेल्या ग्रामसभेत भाडेकरु आदी विविध विषयांवर झाली चर्चा. एका तासात आटोपली ग्रामसभा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.