Goa Live Updates 08 December | Goa Breaking News | Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News Update 08 December: जाणून घ्या, गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी...

दोन वर्षांनंतर कला अकादमीत पुन्हा कार्यक्रमांना सुरवात; मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Pramod Yadav

गोव्याच्या कला अकादमीत स्वर मंगेश हा कार्यक्रम होत आहे. नुतनीकरणानंतर होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. यानिमित्ताने तब्बल दोन वर्षानंतर कला अकादमीत पुन्हा कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यावेळी उपस्थित होते.

धावत्या कारचा टायर फुटून गाडी गटारात. मुस्लिमवाडा-डिचोली येथे मुख्य रस्त्यावरील घटना. कारच्या दर्शनी भागाची मोडतोड वगळता अनर्थ टळला.

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; 1 लाख 25 हजार रूपयांचे ड्रग्ज जप्त

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 25 हजार रूपयांचा चरस जप्त करण्यात आला आहे.

आयटीचे पथक गोव्यात, आय.ए.एस अधिकारी रडारावर?

आयटीचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. एक बडा आय.ए.एस अधिकारी रडारवर असल्याची सुत्रांची माहिती.

गोव्यातील दाम्पत्याने बनावट कागदपत्रांद्वारे २.२० कोटींना विकला दुसऱ्याचा प्लॉट; दिल्लीतील एकाची फसवणूक

गोव्यातील आग्नेलो डिसुझा आणि मॅकिलन डिसुझा या दाम्पत्याने दुसऱ्याच्या नावावरील प्लॉट बनावट कागदपत्रांच्या आधारे विकला होता. 2017 मध्ये दिल्लीतील एकाला हा प्लॉट 2 कोटी 20 लाख रूपयांना विकला होता. या प्रकरणी या दाम्पत्यावर मायणा कुडतरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'काणकोण'मधील प्रकल्पांचे समर्थन करावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सरकार जेव्हा काणकोणमध्ये प्रकल्पासाठी प्रस्ताव घेऊन येईल त्यावेळी नागरिकांना त्याचे समर्थन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लोकोत्सवावेळी केले.

वास्को ते कुळे लोकल पॅसेंजर ट्रेनचा मुद्दा राज्यसभेत

वास्को ते कुळे पर्यंत धावणाऱ्या लोकल पॅसेंजर ट्रेन क्र. 07380 आणि 07379 सध्या सुरू असलेल्या रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पामुळे रद्द केल्या आहेत. यामुळे दक्षिण गोव्यातील कुळे, काले आणि आसपासच्या गावातील रहिवाशांना अडचणी निर्माण होत आहेत.

याचा विशेषत: विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक प्रवाशांना अधिक त्रास होत आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत शुन्य प्रहरात रेल्वे मंत्र्यांकडे केली.

कोलवा येथील पे पार्किंगला विरोध, मच्छिमारांनी मंत्री सिक्वेरांची घेतली भेट

कोलवा येथील पे पार्किंगला विरोध होत असून, मच्छिमारांनी पेलेच्या नेतृत्वाखाली पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेतली. मंत्री सिक्वेरा या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

कुडचडे पेडामळ येथे सात वाहनांवर दगडफेक करुन नुकसान

कुडचडे पेडामळ येथे सात वाहनांवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करुन नुकसान करण्यात आले आहे. केपे पोलीस याचा तपास करत आहेत.

नुवे-आर्ले बायपास मार्गावर कोळसावाहू ट्रक पलटी

Nuvem-Arlem Bypass Road Accident

नुवे-आर्ले बायपास मार्गावर कोळसावाहू ट्रक पलटी झाला आहे. कोळसा रस्त्यावर विखुरल्याने मार्गावर वाहसुकीस आडथळा निर्माण झाला आहे.

स्कूटरला स्टार्टर मारला, 9 वर्षीय मुलगा अपघातात जखमी

नवे वाडे येथे पार्क केलेल्या स्कूटरला अचानक स्टार्टर मारला, सुरु झालेल्या स्कूटरने 10 मीटर फरफटल्याने 9 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाला चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT