Accident Dainik Gomantak
गोवा

Goa News: मोले येथे भीषण अपघात, कर्नाटकातील एकजण ठार; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, मनोरंजन, सांस्कृतिक आणि इतर घडामोडी

Akshata Chhatre

मोले येथे भीषण अपघात, कर्नाटकातील एकजण ठार

पळसकट्टा मोले येथे भीषण अपघात झाला, ज्यामध्ये कर्नाटकातील हल्ल्याळ मंगलवाडा येथील सचिन बंदीगनवार याचा मृत्यू झाला. पोलिस तपास सुरु.

अडवलपाल येथे पारंपरिक घोडेमोडणी आणि शिमगोत्सव उत्साहात साजरा

अडवलपाल, डिचोली येथील पारंपरिक घोडेमोडणी आणि शिमगोत्सव उत्साहात साजरा.

लोकवस्ती असणाऱ्या भागात मोबाईल टॉवरला राय ग्रामस्थांचा विरोध

राय ग्रामसभेने लोकवस्ती असलेल्या भागात मोबाईल टॉवरला विरोध करण्याचा ठराव केला. ग्रामसभेने टॉवरसाठी पर्यायी जागा सुचवली. याशिवाय, ग्रामसभेने अनावश्यक स्पीड ब्रेकर काढून गावातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याचा ठरावही पारित केला. तसेच, रायमधील काही भागांना पाणथळ जागा म्हणून घोषित न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

केरी सत्तरी चेकपोस्टवर 300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त

सत्तरीतील केरी चेकपोस्टवर दोन कारमधून 300 किलो बेकायदेशीर गोमांस जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या गोमांसची किंमत साधारण दीड लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस उपअधिक्षक जिवबा दळवी आणि वाळपईचे पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकारांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे.

कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी डीवायएसपी कर्पे यांच्याविरुद्ध गोवा राज्य पोलीस प्राधिकरणाकडून नोटीस जारी

गोवा राज्य पोलीस प्राधिकरणाने ड्युटीवर असताना कथित गैरवर्तन केल्याबद्दल डीवायएसपी कर्पे यांच्याविरुद्धच्या तक्रारीबाबत नोटीस जारी केली आहे. बार्देश येथील तक्रारदार गाडेकर यांना 16 एप्रिल 2025 रोजी पणजी येथे प्राधिकरणासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नियोजित तारखेला पुढील कार्यवाहीसाठी खटला हाती घेतला जाईल. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, ड्युटीवर असताना डीवायएसपींनी अपशब्द वापरुन गोळीबार केला.

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा. आवश्यकता भासल्यास राज्याबाहेरही उपचार करण्याची ग्वाही.

108 रुग्णवाहिका सेवा मजबूत करणार; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा

आपत्कालीनवेळी तातडीने उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रात हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्याची आवश्यकता. 108 रुग्णवाहिका सेवा मजबूत करणार. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा. डिचोलीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन.

डिचोलीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन

सेटलायट 'ओपीडी' सुरु करण्याचा विचार. 108 रुग्णवाहिका सेवा मजबूत करणार. डिचोलीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन.

ताळगाव येथे मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

ताळगाव येथील एका बांधकाम साइटवर २४ वर्षीय राजीव सहानी या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. चौथ्या मजल्यावर विश्रांती घेत असताना, तो पंखा चालू करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला.

बोर्डे-डिचोली येथील होमकुंड उत्सव उत्साहात

बोर्डे-डिचोली येथील होमकुंड उत्सव उत्साहात. शनिवारी मध्यरात्री व्रतस्थ धोंड भक्तगणांसह देवीने केले अग्नीदिव्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीत आकाश दीप चमकला! न्यूझीलंडविरुद्ध रचला नवा इतिहास; 5 बळी घेत केला खास रेकॉर्ड

Daily Horoscope: नात्यात गोडवा अन् कामात उत्साह! 'या' राशींसाठी शनिवारचा दिवस आनंदाचा; आर्थिक स्थितीही सुधारणार

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

SCROLL FOR NEXT