Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa News: वाळपई हिट अँड रन प्रकरणी ट्रकचालकास अटक; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Today Latest News Live Update: गोव्यातील राजकारण, समाजकारण, गुन्हे, कला -संस्कृती - क्रीडा, पर्यटन, अपघात यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

"दारु पिणारा, तंबाखू खाणारा वस्तुस्थिती कधीच टाळू शकत नाही...

"प्रसाद, दोरा बांधला, बाबाकडे गेलात म्हणून आजार बरा होणार नाही"

वाळपई हिट अँड रन प्रकरणी ट्रकचालकास अटक

रेडीघाट-वाळपई येथे शुक्रवारी रात्री दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याप्रकरणी ट्रकचालक कनिफनाथ गायकवाड (३९, पुणे) याला वाळपई पोलिसांकडून अटक. या अपघातात साखळीतील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

टार्झन पार्सेकर, सागर पाटील आणि सनिष घाटवाल यांना ११ दिवसांची कोठडी

टार्झन, सागर आणि सनिष यांना ११ दिवसांची जेसी टार्झन पार्सेकर, सागर पाटील आणि सनिष घाटवाल यांना खंडणी प्रकरणात म्हापसा न्यायालयाने ११ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

"गोवा सरकार कृषी क्षेत्रासंबंधी गंभीर नाही" आमदार विजय सरदेसाई

गोवा सरकार कृषी क्षेत्रासंबंधी गंभीर नाही. म्हणून कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पडीक शेतात शॅक सुरु करून पर्यटना आकर्षित केल्यास त्याचा लाभ युवकांना होईल - आमदार विजय सरदेसाई

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सर्व बसेसमध्ये ५०% सवलत

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सर्व बसेसमध्ये ५०% सवलत दिली जाईल: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नशा मुक्त भारत; नशा मुक्त गोवा; मुख्यमंत्र्यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशा मुक्त भारतासाठी पुढाकार घेतला आहे, त्या प्रकारे राज्यातील लोकप्रतिनिधींनी नशा मुक्त गोव्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

अनमोड घाटात बस आणि कारचा अपघात, कारमधील प्रवासी जखमी

अनमोड घाटात बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून, यात कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

होमगार्डच्या भरतीसाठी सादर केले दहावीचे फेक मार्कशीट; दोघांवर गुन्हा

गेल्यावर्षी झालेल्या होमगार्डच्या भरतीसाठी दहावीचे खोटे मार्कशीट सादर केल्याप्रकरणी शायदा आणि अशोक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघेही केपे येथील रहिवासी असून, त्यांनी भरतीसाठी खोटे गुणपत्रक सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्यावर्षीय २५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी खोटे गुणपत्रक सादर केले होते.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आंध्रप्रदेशच्या दोघांना अटक

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आंध्रप्रदेशच्या दोघांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. शिवा प्रकाश (२६) आणि विश्वनाथ राजू (२६) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडे १.५५ ग्रॅम ईक्सटसी पाऊडर आढळून आली आहे. पोलिसांनी नाईकवाडा येथे छापेमारी करत ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT