Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa News: खांडेपार येथील उड्डण पुलावर स्कूटर आणि कार यांच्यात अपघात, स्कूटरचालक जखमी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Today's 11 July 2025 Live News Updates: गोव्यातील राजकारण, गुन्हे, अपघात, मान्सून, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

Goa Accident: खांडेपार येथील उड्डण पुलावर स्कूटर आणि कार यांच्यात अपघात, स्कूटरचालक जखमी

खांडेपार येथील उड्डण पुलावर स्कूटर आणि कार यांच्यात अपघात झाला. जखमी स्कूटर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Goa Politics: काँग्रेसशी काही वाद नाही, फक्त काही लोकांना असुरक्षित वाटतंय, सरदेसाई स्पष्ट बोलले

आमची काँग्रेसशी 2027 पर्यंत युती असून आम्ही त्यावर ठाम आहोत. कुडचडे येथे आमच्या पक्षाचा आणि काँग्रेसचा एकाच दिवशी कार्यक्रम झाला. जर अमित पाटकरांनी मला एक फोन केला असता तर मी आमच्या पक्षाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ठेवला असता. काही लोक आहेत ज्यांना असुरक्षित वाटत आहे, पण मी त्याबद्दल काय करु शकतो? काँग्रेस हा 125 वर्षे जुना पक्ष आहे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

Goa Accident: धारगळ येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनात जोरदार टक्कर

धारगळ येथील रेडकर रुग्णालयाजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास एक दुचाकी आणि चारचाकी वाहनात जोरदार धडक झाली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

काँग्रेससोबत कोणतेही मतभेद नाहीत, 2027 मध्येही युती कायम राहणार; विजय सरदेसाई

माझे काँग्रेससोबत कोणतेही मतभेद नाहीत, आमची काँग्रेससोबत युती आहे आणि २०२७ मध्येही ती कायम असेल. व्यक्तिगत काही स्थानिक नेत्यांना निश्चित माझ्यापासून काही समस्या असतील, पण काँग्रेस खूप मोठा पक्ष आहे त्यामुळे व्यक्तिगत स्थानिक नेत्यांमुळे काही अडचण नाही, असे विजय सरदेसाई म्हणाले.

पहिल्यांदा आमदार झालेल्या मंत्रीपद न देणे हा राऊतांच्या कार्यकाळातील निर्णय

पहिल्यांदाच पक्षाचा आमदार झालेल्या व्यक्तीला शक्यतो पाच वर्षे मंत्रीपद न देणे हा पांडुरंग राऊतांच्या काळातील निर्णय. सुदीन आणि दिपक दोघांनाही पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मंत्रीपद देण्यात आले नव्हते. मगो समर्थक पंच,सरपंच आणि जिल्हा पंचायत सदस्यांच्या पत्रकार परिषदेत पक्षाचे खजिनदार प्रताप फडतेंचे प्रतिपादन.

ओल्ड गोवा – पणजी महामार्गावर अपघात, मार्गावर वाहतूक कोंडी

ओल्ड गोवा – पणजी महामार्गावर अपघात झाला असून, यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कदंब पठारावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रात गणेशोत्सव आता 'राज्य महोत्सव'

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा 'राज्य महोत्सव' म्हणून ओळखला जाईल अशी घोषणा केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात घोषणा.

दोन जीव गेल्यानंतर बांधकाम खात्याला जाग, बेतोडा सिग्नलचे टेस्टिंग सुरु

बेतोडा येथे गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, यानंतर आता बांधकाम खात्याला जाग आली असून, सिग्नलचे टेस्टिंगचे काम सुरु करण्यात आले आहे.

पेडण्यात ज्येष्ठ टॅक्सी ड्रायव्हरवर हल्ला, प्रवासी महाराष्ट्रात फरार

मालपे – पेडणे येथे टॅक्सी ड्रायव्हरवर प्रवाशांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. यात टॅक्सी चालक संजीव वेंगुर्लेकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत. संजीव यांनी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT