Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa News: अवकाळी पावसामुळे सुपारीचे पीक उद्ध्वस्त, वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News Live Updates In Marathi: गोव्यातील राजकारण, समाजकारण, कला - क्रीडा - संस्कृती, पर्यटन, अपघात यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

Goa Rain: अवकाळी पावसामुळे सुपारीचे पीक उद्ध्वस्त

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. आगापूर, फोंडा येथे मुसळधार पावसामुळे सुपारीचे पीक उद्ध्वस्त झाले.

Margao: 'मॉडीफाईड' सायलेन्सर असणाऱ्या दुचाकींवर मडगाव पोलिसांची कारवाई सुरूच!

मडगाव वाहतूक पोलिसांनी शहरातील तरुणांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या मॉडिफाइड बाईक सायलेन्सर वापरावर कठोर कारवाई सुरू केली आहे. या संदर्भात वाहतूक पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी चेतावणी देताना सांगितले की, “मॉडिफाइड सायलेन्सरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण हे केवळ समाजासाठी त्रासदायक नाही, तर तो कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.”

Goa Rain: राज्यात १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सरासरी १४.७८ इंच पाऊस

राज्यात यंदा ऑक्टोबर महिन्यात चांगलाच पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान गोव्यात सरासरी १४.७८ इंच पाऊस झाला असून, हा गेल्या ९७ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Ola EV Bike: गोव्यात ओला ईव्ही बाईकची विक्री रोखली

गोव्यात ओला ईव्ही बाईकची विक्री रोखली आहे. सहाय्यक परिवहन संचालकांशी झालेल्या बैठकीनंतर ओला वापरकर्त्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

GTET Exam: डिसेंबरमध्ये होणार गोवा शिक्षक पात्रता परीक्षा

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ डिसेंबर २०२५ साठी गोवा शिक्षक पात्रता परीक्षा (GTET) घेणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोव्यात एकता दौड

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गोव्यात एकता दौड आयोजित करण्यात आली. काम्पाल ते पणजी आयोजित या दौडमध्ये मुध्यमंत्री प्रमोद सावंतही सहभागी झाले होते.

जबडा तुटला, पाळीव कुत्र्याच्या तोंडावर झाडली गोळी, गुन्हा दाखल

पाळीव कुत्र्याला जवळून गोळी घातल्याची घटना हळदोणा येथे घडली आहे. यात कुत्र्याचा जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच, गोळी झाडल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

कोलवाळ तुरुंगात पुन्हा राडा; पाच कैद्यांकडून कैदी मोहम्मदला मारहाण

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. कैदी मोहम्मद रेहानला पाच कैद्यांनी जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच कैद्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

Couple Viral Video: बाईकच्या टाकीवर बायकोला बसवलं अन्... लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवघेणा स्टंट; जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल

व्हाळशीच्या तळ्यात मगरींची दहशत, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; कुत्रे, लहान प्राण्यांवर हल्ले

SCROLL FOR NEXT