पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, संसदीय कामकाम मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोव्याचे उपसभापती जोशुआ डिसोझा व्हॅटिकन सिटीला रवाना झाले.
भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आलेले अमोल काणेकर यांची केपे नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी अध्यक्षा दीपाली नाईक, दक्षिण गोवा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, नगरसेवक दयेश नाईक, सुचिता शिरवाईकर, चेतन हळदणकर, गणपत मोडक आणि प्रसाद फल देसाई यांच्या उपस्थितीत कणेकर यांचे अभिनंदन केले.
गोव्यात दोन दिवस (२५, २६ एप्रिल) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या वेधशाळेने याबाबत यलो अलर्ट जारी केला आहे.
साखळी बाजारातील एका कॉस्मेटिक दुकानामागील घराचे दार फोडून आतील एक लाख रोख चोरट्यांनी केली लंपास. पोलीस घटनास्थळी दाखल.
'ज्यांना मराठी पाहिजे त्यांनी महाराष्ट्रात जावे' ह्या फेसबुक पोस्टवर म्हार्दोळ पोलिस स्थानकात डॉ.मधू घोडकिरेकरांच्या तक्रारीवर कोंकणी लेखक प्रकाश नाईक ह्यांच्या विरोधात म्हार्दोळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद.मी काहीही चुकीचे बोललेलो नाही.कोंकणी गोव्याची राज्यभाषा. मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा.लेखक प्रकाश नाईकांचा पुनरोच्चार.
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेतर्फे डिचोलीतील बागवाडा आणि साळ येथे 'मॉक ड्रिल'. पुराच्या आपत्तीवेळी बुडणाऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रात्यक्षीकाद्वारे मदतकार्या संबंधी मार्गदर्शन.
ताकार- दावकोण येथ दूधसागर नदीवर आंघोळीसाठी गेलेला अनिल बाळेगाळ (३२, वास्को) युवक बेपत्ता होता त्याचा मृतदेह शुक्रवारी (२५ एप्रिल) सकाळी कुडचडे अग्नीशामक दलच्या जवांनानी पाण्यातुन बाहेर काढला. कुळे पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरिक्षक विभावरी गांवकर यांनी पंचनामा करुन मृतदेह मडगाव येथे शवचिकित्सा करण्यासाठी पाठविला.
काणका येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिकांनी उधळून लावला. मुलगी मोठ्याने रडायला लागल्यानंतर स्थानिक गोळा झाले आणि अपहरण करण्यासाठी आलेले संशयित घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.