पाटवळ सत्तरी येथे बेकायदेशीररित्या जनावरांची शिकार तसेच गोळी लागून समद खान (22) याच्या मृत्यू प्रकरणी बाबू उमर संघार व गाऊस नूर अहमद पटेल यांच्या पोलिस कोठडीत डिचोली न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे.
गोमंतकीयांना गंडा घालणाऱ्या तन्वी वस्त आणि आनंद जाधव यांना न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला. न्यायालयाने तन्वी आणि आनंद जाधव यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कळंगुट-बागा परिसरातील दुकांनाची FDA च्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. एका दुकानातून ई-सिगारेटचे बॉक्स अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आले. दरम्यान, नियमांना तिलांजली देवून ई-सिगारेटची विक्री सुरु असल्याचे समोर आले.
राजा राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एफडीए अधिकाऱ्यांनी कळंगुट-बागा परिसरातील बिर्याणी स्टॉल्स आणि हॉटेल्सची अचानक तपासणी. बिर्याणीचे सामान तसेच काही भांडी जप्त.
पर्यटकांना त्रास देणाऱ्या 25 टाउट्संना कळंगुट पोलिसांनी टुरिस्ट पोलिसांच्या मदतीने पकडले.
गोवा वजन आणि माप खात्याने सोमवारी वास्को व फोड्यात कमी वजनाचे सिलिंडर जप्त केले. स्वयंपाकाचे सिलिंडर एक ते दोन किलो कमी असल्याचे आढळून आले.
नवीन वर्ष तोंडावर असताना कुंकळ्ळी ते बाळ्ळी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. नागरिक या समस्येला कंटाळले आहेत.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी "सायबच्या" पवित्र अवशेष प्रदर्शनाच्या निमित्ताने जुने गोवा येथे सायबाची प्रार्थना केली.
सोनू कुमार चौहान याला गोवा पोलिसांनी २ लाख ४१ हजार रुपये किमतीचा २.४०१ किलो गांजा बाळगल्या प्रकरणी अटक केली. अटक करण्यात आलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.
PWD सहाय्यक अभियंता कार्यालय मिरामार येथे दरोड्याचा प्रयत्न करण्यात आल्याची नोंद झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
रात्री उशिरा घडलेल्या घटनेत दुचाकीस्वाराला टाळण्याच्या प्रयत्नात शिरोडा येथे ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक घरावर धडकला. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.