जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला पोलिस कोठडीतून पलायनास मदत केलेला बडतर्फ आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याने पणजी प्रथमश्रेणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारी (20 डिसेंबर) सकाळी ठेवण्यात आली आहे.
लोलयेत भगवती पठारावर फिल्म सिटीसाठी कोमुनिदादकडून इएसजीला 10 लाख स्क्वेअर मीटर जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्णत्वाच्या दिशेने. पीपीपी तत्वावर होणार फिल्म सिटी. अंदाजे तीन हजार रोजगार होणार निर्माण. पुढील सहा महिन्यातही प्रत्यक्ष काम सुरु होऊ शकते. काणकोणचे आमदार सभापती रमेश तवडकरांची माहिती.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुलेमान खान फरार प्रकरण चांगलंच गाजत आहे. क्राइम ब्रांचच्या कोठडीतून पलायन करुन हुबळीत बसलेल्या सुलेमानला कर्नाटक पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना पत्र लिहून केली.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गुरुवारी (19 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गोव्यातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
सिंधुदुर्ग येथील भेडशी जवळ तिळारी कॅनल येथे अपघात झाल्याची माहिती, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात पेडणे येथील महिलेचा मृत्यू झाला.
"गोव्याला भाजपपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नव्या चळवळीची गरज आहे, ज्याची सुरुवात आझाद मैदान पणजीपासून करणे आवश्यक आहे. मी पुढाकार घेईन आणि येणाऱ्या काळात गोवेकरांनी सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे." विजय सरदेसाई
जमीन घोटाळ्यात कोणाचा संबंध आहे हे माहिती असायला मी काही मी काही शेरलॉक होम्स नाही, सुलेमानच्या अटकेनंतर सगळ्याचा उलघडा होईल असं पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले आहेत.
मागील 50 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास आम्ही केवळ या 10 वर्षात करू शकलो, केवळ डबल इंजिन सरकारमुळे हे सर्व शक्य झाले : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
आजच्या दिवशी 1961 साली गोव्याला पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीतून कायमची मुक्तता मिळाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.