Goa Liquor Smuggling Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Smuggling: बटाट्यांच्या नावाखाली दारूची तस्करी! पोळे येथे 18.72 लाखांचा मद्यसाठा जप्त

Goa Liquor Smuggling Latest News: गोव्यातून कर्नाटकात बेकायदा मद्य तस्करी उघड झाली असून सुमारे ३०० मद्याच्‍या पेट्या काणकोण अबकारी विभागाच्या पथकाने पोळे तपासणी नाक्यावर जप्त केल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

चावडी: गोव्यातून कर्नाटकात बेकायदा मद्य तस्करी उघड झाली असून सुमारे ३०० मद्याच्‍या पेट्या काणकोण अबकारी विभागाच्या पथकाने पोळे तपासणी नाक्यावर जप्त केल्या.जप्त केलेल्या मद्याची किंमत तब्बल १८ लाख ७२ हजार रुपये असून बटाट्यांच्या पिशव्यांखाली मद्याच्या पेट्या लपवलेल्या होत्या. हा ट्रक कर्नाटकच्या दिशेने नेण्यात येत होता.

अबकारी विभागाने मद्यासह ट्रक ताब्यात घेतला, मात्र या ट्रकचे चालक आणि मदतनीस पसार झाले. पोळे चेकनाक्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास अबकारी कर्मचाऱ्यांनी संशयावरून एका ट्रकला अडविले. ट्रकमध्ये बटाटे असून ते कर्नाटकात नेण्यात येत असल्याचे चालक व हेल्परने सांगितले. मात्र, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात बटाटे गोव्यात येतात. त्याउलट गोव्यातून कर्नाटकात बटाटे नेण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला.

त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली, त्या हा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई काणकोणचे अबकारी निरीक्षक रोहित देसाई, उपनिरीक्षक प्रदीप खोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. मंत्री रमेश तवडकर यांनी एका कार्यक्रमात पोळे चेकनाक्यावरील कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसातच अबकारी विभागाने मोठ्या प्रमाणात दारू पकडल्याने पोळे चेकनाक्यावरील कारभार पुन्हा चर्चेत आला आहे.

सीसीटीव्ही नादुरुस्त?

चेकनाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही दोघे पळून जाण्यात यशस्वी कसे झाले? त्यावेळी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत होती का? याची चौकशी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. परिसरात माकडांचा वावर असून त्यांच्या उपद्रवामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड होत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तपासणी यंत्रणेच्य कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT