Liquor Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Made Liquor Seized: पोलिसांना तपासणीत ट्रकमध्ये एकूण देशी दारुच्या एकूण सातशे बॉक्स आढळून आले त्यात प्रत्येक एका बॉक्समध्ये ४८ बाटल्या आहेत.

Pramod Yadav

सिंधुदुर्ग: गोवा बनावटीच्या देशी दारुच्या बाटल्यांवर महाराष्ट्राचे लेबल लावून होणाऱ्या दारु तस्करीचा वैभववाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याचा मदतनीस याला ताब्यात घेण्यात आले आहे. करुळ तपासणी नाक्यावर पहाटे साडे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी ट्रक चालक राकेश राजू हडपद आणि मदतनीस निलेश साहेबराव साळुंखे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नोटीसवर सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून २३.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १८ लाख रुपये किंमतीचा (एमएच ०९ – सीव्ही – ६२६२) ट्रक देखील ताब्यात घेण्यात आला आहे. वैभववाडी पोलिसांनी केलेली ही कारवाई आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुळ नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी संशयित ट्रकची चौकशी केली. चालकाला विचारणा केली असता त्याने ट्रकमध्ये तेलाचे डबे असल्याचे सांगितले. डबे तपासून पाहिले असता त्यात गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. धक्कादायक बाब म्हणजे या दारुच्या बाटल्यांवर महाराष्ट्राचे लेबल लावण्यात आले होते.

पोलिसांना तपासणीत ट्रकमध्ये एकूण देशी दारुच्या एकूण सातशे बॉक्स आढळून आले त्यात प्रत्येक एका बॉक्समध्ये ४८ बाटल्या आहेत. ही दारू गोवा बनावटीची असून, त्याची बाजारातील किंमत २३ लाख ५२ हजार रुपये असल्याचे समोर आले आहे. वैभववाडीत महिनाभरात तिसऱ्यांदा अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: "अंतराळ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत" रोहन खवंटे, पर्यटन मंत्री

Sacorda Shiva Temple: 6 दशकांनी उजळला महादेव लिंगाचा परिसर! उखळ - आगळो मंदिर परिसरात पथदीपांची सोय

Goa Crime: 200 कोटींचे कर्ज देतो म्हणून 1.85 कोटींचा गंडा! सांगेच्या उद्योजकाची फसवणूक; कर्नाटकातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi Language: मराठी राजभाषा आंदोलनाची ताकद वाढवणार! 40 संमेलनाचे आयोजन; मराठी युवकांचा सहभाग

Sadolxem: सादोळशे परिसरात अनोळखी युवकांचा वावर! ग्रामस्थांत चिंता; पोलिस व मामलेदारांकडे कारवाई करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT