Lineman Death Sattari Dainik Gomantak
गोवा

Ex-Gratia: शॉक लागून मरण पावलेल्या लाईनमनच्या कुटुंबीयांना 12 लाखांची मदत, राणे दाम्पत्य उचलणार मुलांच्या शिक्षणाचा खर्च

Morlem Lineman Death: सरकारतर्फे चंद्रू गावकर यांच्या कुटुंबीयांना ७ लाखांची मदत देण्यात आली असून दोन दिवसांत ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Sameer Panditrao

वाळपई: होंडा - सत्तरी येथे विजेचा धक्का बसून मरण पावलेले लाईनमन चंद्रू ऊर्फ सूर्या गावकर (वय ३५, रा. मोर्ले-घोडेमळ) यांच्या कुटुंबीयांची रविवारी (२५ मे) संध्याकाळी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी सरकारतर्फे देण्यात आलेला ७ लाखांच्या मदतीचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

यावेळी डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, की चंद्रू गावकर हे मेहनती व कष्टाळू होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आलेले संकट व दुःख आम्ही समजू शकतो. त्यांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही कमरता भासू देणार नाही.

आज सरकारतर्फे चंद्रू गावकर यांच्या कुटुंबीयांना ७ लाखांची मदत देण्यात आली असून दोन दिवसांत ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यापूर्वी आरोग्यमंत्री व आपण ५ लाखांची मदत त्यांना दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च आम्ही उचलणार आहोत. चंद्रू यांचा मृत्यू कर्तव्य बजावताना ड्युटीवर असताना झाला आहे.

त्यामुळे त्यांची नोकरी त्यांच्या पत्नीला देण्याचा प्रयत्न करणार असून सरकारकडे तसेच मुख्यमंत्र्यांकडे बोलून पुढील सोपस्कार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असेही डॉ. राणे यांनी सांगितले.

...तर युवक नोकरीस घाबरतील

दोन वर्षांपूर्वी ठाणे - सत्तरी येथील संजय गावकर यांचासुध्दा असाच विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला त्यानंतर आपण पुढाकार घेऊन त्यांची नोकरी दिली. अशाप्रकारे सत्तरीतील तरुण अपघातात मरण पावत असतील, तर यापुढे वीज खात्यात नोकरी करण्यास युवा वर्ग घाबरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT