Maje Driver App Dainik Gomantak
गोवा

Maje Driver App: खासगी दुचाकींवर भाडे वाहतूक केल्यास थेट जप्ती! 50 वर्षांवरील मोटारसायकल पायलटांना 'DSSY'चा लाभ; CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Goa Motorcycle Pilots: वाहतूक खाते आणि मोटारसायकल पायलट संघटनेतर्फे पायलटांसाठी सुरू केलेल्या ‘माझे ड्रायव्हर’ या मोबाईल ॲपच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: खासगी दुचाकींचा भाडी मारण्यासाठी वापर केल्यास अशा दुचाकी जप्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे सांगत, वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या मोटारसायकल पायलटांना येत्या १ ऑगस्टपासून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा (डीएसएसवाय) लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

वाहतूक खाते आणि मोटारसायकल पायलट संघटनेतर्फे पायलटांसाठी सुरू केलेल्या ‘माझे ड्रायव्हर’ या मोबाईल ॲपच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.पणजीत आयोजित या कार्यक्रमाला वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्यासह वाहतूक खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मोटारसायकल पायलट हे गोव्याच्या पर्यटनाचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ आहेत. अशा पायलटांचा आकडा पाच हजारांहून दोन हजारांवर आला आहे. या व्यवसायात अधिकाधिक जणांनी यावे, यासाठी सरकारने पायलट व्यवसायातही डिजिटल क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून ‘माझे ड्रायव्हर’ ॲप सुरू करण्यात आले आहे.

या ॲपमुळे सर्वसामान्य जनता तसेच पर्यटकांना आवश्यक तेथे पायलट सेवा मिळवता येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इलेक्ट्रिक दुचाकीवर ५० टक्के सबसिडी ज्या मोटारसायकल पायलटांना इलेक्ट्रिक दुचाकींचा वापर करायचा आहे, त्यांना इलेक्ट्रिक दुचाकींवर ५० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. त्याचाही पायलटांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रमोद सावंत यांनी केले.

‘रेनकोट घ्यावे, घरी जावे’

‘‘माझे ड्रायव्हर’ ॲप अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. ज्यांना ॲपअंतर्गत यायचे नसेल, त्यांना पूर्वीप्रमाणे भाडी मारता येईल. असे असतानाही या ॲपबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. ज्यांना ॲपमध्ये यायचे नाही, त्यांनी ‘रेनकोट घ्यावे आणि घरी जावे’,’’ असा सल्लाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT