Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: वाद मिटवा... मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा क्रीडा संघटनांना निर्देश; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 15 July 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

मी बैठकीत नाही, पण जेवणासाठी सहभागी झालो : सभापती तवडकर...

आगामी पावसाळी विधानसभा अधिवेशनाबाबत चर्चा; आमदार आणि मंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी पावसाळी विधानसभा अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी आघाडीतील भागीदार, आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली.

चेतना स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनने दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी नवीन ब्रेल लायब्ररी केली सुरू

चेतना स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनने दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी नवीन ब्रेल लायब्ररी सुरू केली आहे. आमदार निलेश काब्राल यांच्या हस्ते लायब्ररीचे उद्घाटन झाले.

वाद मिटवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा क्रीडा संघटनांना निर्देश

गोवा क्रीडा केंद्र म्हणून विकसित करावा. २०३६ च्या ऑलिंपिक आणि आगामी राष्ट्रीय खेळांची तयारी त्वरित सुरू करावी. क्रीडा संघटनांमध्ये काही वाद असतील तर त्यांनी ते सोडवावेत आणि एकजुटीने काम करावे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद

८ दिवसांत ब्लू कॅब टॅक्सीचा प्रश्न सुटणार

येत्या ८ दिवसांत ब्लू कॅब टॅक्सीचा प्रश्न सुटेल : प्रवीण आर्लेकर

आंघोळ करताना महिलेचा व्हिडिओ काढला; १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

६४ वर्षीय फ्रेंच नागरिक पॅट्रिक अल्बर्ट मृतदेह आढळल्याने खळबळ

वर्णा येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी (१४ जुलै) एका ६४ वर्षीय फ्रेंच नागरिक पॅट्रिक अल्बर्ट मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अल्बर्ट हे नागवा येथील कमाक्षी कॉलेज ऑफ कलिनरी आर्ट्समध्ये प्राध्यापक आणि हेड शेफ म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन वर्षांपासून ते गोव्यात एकटेच राहत होते.

Goa News: स्मारक स्थळांच्या नूतनीकरणासाठी सरकारने १.५ कोटी मंजूर

सरदारांच्या स्मारक स्थळाच्या नूतनीकरणासाठी सरकारने १.५ कोटी मंजूर केले आहेत; १५ जुलै २०२६ पर्यंत सर्व प्रमुखांचे पुतळे तेथे असतील: युरी आलेमाव

Goa Theft: ४.५ लाख रुपयांचा ऐवज लंपास; पेडणे तालुक्यातील कोंडळवाडा येथे चोरट्यांनी केला हात साफ

उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यातील कोंडळवाडा येथे सोमवारी (दि. १४) सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान एका घरात अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला. या घरफोडीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंसह सुमारे ४.५ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती मिळाली आहे.

Goa Rain: संततधार पावसामुळे सोनाळचा रस्ता पाण्याखाली

संततधार पावसामुळे सोनाळचा रस्ता पाण्याखाली, विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल, पाण्यातूनच नागरिकांची काढली वाट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro-Ro Service: मुंबईहून 4 तासांत मालवण, तर 3 तासांत रत्नागिरी! लवकरच सुरु रो-रो सेवा, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Mariage Astrology: तुमचं लग्न टिकणार की मोडणार? कुंडलीतील '36 गुणां'मागे दडलंय काय?

गोव्यातील गुहेत दिला बाळाला जन्म, गोकर्णच्या जंगलात केले वास्तव्य; पती आहे उद्योगपती; ‘त्या’ रशियन महिलेबाबत नवीन खुलासा

ICC Test Rankings: आयसीसी कसोटी क्रमवारीत जो रुट पुन्हा नंबर वन; ब्रूकची घसरण, भारतीय फलंदाजांनाही फटका!

Goa live News: पणजीतील कसिनो जेटीखाली वाहून आली मृत म्हैस

SCROLL FOR NEXT