Fisheries Dainik Gomantak
गोवा

Fisheries : मत्स्यपालनावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल

राज्‍य सरकारने मत्स्यपालनासाठी बंदी घातलेल्या प्रतिजैविकांचा वापर रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तसेच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्यासाठी कृती दल समिती स्थापन केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्‍य सरकारने मत्स्यपालनासाठी बंदी घातलेल्या प्रतिजैविकांचा वापर रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तसेच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्यासाठी कृती दल समिती स्थापन केली आहे.

प्रतिबंधित प्रतिजैविक आढळल्यास कृती दल ते जप्त करेल. पहिल्‍यांदा हा अपराध करणाऱ्यांकडून 25 हजार रुपयांचा, तर दुसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्यास 50 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. तसेच दुकानाचा परवाना रद्द केला जाईल. याचबरोबर संबंधितांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला जाईल.

कृती दलाला सर्व दुकाने, उत्पादन युनिट्स आणि कंपन्या, औषधे, रसायने, फीड्स, फीड सप्लिमेंट्स, फार्म्स, हॅचरी इत्यादींच्या पुरवठादारांवर छापे टाकण्याचे तसेच तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. अनधिकृतपणे उत्पादने बाळगळल्‍यास ते ताब्यात घेण्याचेही अधिकार कृती दलाला देण्यात आले आहेत.

राज्‍यातील एक्वा शॉप्समध्ये कोस्टल एक्वाकल्चर ऑथॉरिटीकडे नोंदणी असलेली उत्पादनेच विकली जातात. या ठिकाणी पशुवैद्यकीय दर्जाची उत्पादने विकली जात नाहीत, याची खात्री करण्याची जबाबदारी या कृती दलाकडे असेल.

त्‍यांच्‍याकडून एक्वा शॉपमधून नमुने घेतले जातील. सीलबंद नमुने औषध नियंत्रण प्राधिकरण आणि अन्न सुरक्षा विभाग किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेकडे विश्लेषणासाठी पाठवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT